- ✍️ सौ. शिवानी श्री. वकील
नमस्कार बालमित्रांनो, आज आपण एक गोष्ट वाचणार आहोत, ती आहे एका छोट्या मुलीची. सानिका तिच नावं, ती एका छोट्याशा गावात रहात असे. ती, वडिल, सावत्र आई, एक भाऊ व दोन सावत्र बहिणीं सोबत रहात असे. तिचे वडिलच फक्त तिच्याशी प्रेमाने बोलत, आई आणि बहिणी खुप जाचं करीत. घरातील सर्व कामे ती करीत असे पण भावंडाना शाळेत जाताना पाहून तिलाही जावेसे वाटे. पण दिवसभर घरातील कामे कोण करणार ? म्हणून आईने तिला शाळेत घातले नाही. घरातील स्वयंपाक, झाडलोट, कपडे धुणे त्याला इस्त्री, भांडी आणखी कितीतरी कामे आई तिच्या कडून करुन घेई, पहाटे पासूनच ती घरात राबत असे तरी आईचा बहिणींचा ओरडा खावा लागत असे, वडिलांना वाईट वाटत असे पण ते काहिच करु शकत नव्हते. वडिल तीला सोनू म्हणत.
एक दिवस वडील कामासाठी गावी गेले होते, नेहेमीप्रमाणेच सावत्र आईने बडबड सुरु केली, आणि सोनुला तिचा मारही बसला. सोनू खुप रडू लागली. तिला रडू आवरेना. मग तिने ठरवले की शेजारच्या गावातील मावशी कडे जायचे, तिचे गाव खुप लांब होते तसेच जाण्यासाठी सोनुकडे पैसेही नव्हते. तरीही दोन-तिन कपडे घेऊन ती निघाली चालतच!!
दहा बारा वर्षाची सोनू दुपार पर्यंत चालून दमली. आणि वाटेत चालता चालता तीने एक गाव पार केले. आता तिला तरी रस्ता कुठे निट माहीती होता?, सावत्र आईपासून सुटका तर हवी होतीच, मग वाट फुटेल तिथे चालत राहिली. चालता चालता ती दोन गावं पार करून पुढे आली. तीला असे पटपट चालताना त्या गावात एका बाईने पाहिले आणि विचारले कोण ग तू ? आणि ईकडे कुठे आलीस? तीने त्या बाईला सर्व हकीकत सांगितली. त्या बाईचे नाव काशी होते, तीने सोनुची हकीकत ऐकली व म्हणाली "अगं इथून पुढे सगळं रान आहे. ईथेच या गावाची हद्द संपते, आणखी पुढे जाशील तर थोड्या वेळात सायंकाळ होईल रानात अडकुन बसशील, दिवसा जातात लोक, पण तु अशी एकटी कशी जाशील? आणि तुझी मावशी कुठे रहाते? चल मी पोहोचवते तुला." पण सोनुला ना गावाचे नाव माहीत होते ना तीचा पत्ता. मग काय करणार? काशी म्हणाली "अशीच चालत राहिलीस तर वाट चुकशील, आणि काही खाल्लं तरी आहेस का? " तेव्हा सोनू "नाही" म्हणाली. काशीला तीची दया आली. तीने सोनुला खायला भाकरी आणि दुध दिले. सोनुला खुप भूक लागली होती. तीने पोटभर खाल्ले. काशी म्हणाली इथून पुढे सगळं रान आहे. रान पार केले की पुढे एक गाव आहे. मी आणि माझा मुलगा सतिश ईथे रहातो. तु सुद्धा ईथे राहू शकतेस, पण काम करावे लागेल. सोनू "चालेल" म्हणाली. काम काय तर रोज शेळ्यांना थोडं पुढे रानात चरुन आणायचं. सोनुला कामाची सवय होतीच. काशी प्रेमळ होती आणि सतीशही शांत मुलगा होता. तो अभ्यास करीत असे. दुसर्या दिवशी सोनु लवकर उठली, आवरले. काशीने सांगितलेली कामे केली. काशीने तीला व सतीशला गरम चहा - भाकरी दिली. काशीही मिळेल ते काम करुन मुलाला शिकवत असे. सोनुने बघीतले काशीही गरीब होती पण तीचा स्वभाव फार प्रेमळ होता. सोनुला आपली मावशी भेटली असेच वाटले. तीने पोटभर नाष्टा केला.
काशीकडे चार शेळ्या होत्या. सकाळीस तीने सोनुला शेळ्यांना चरायला न्यायचे रान दाखवले. तशी त्यांना चरायला सोनू रानात जाऊ लागली. तिलाही बरोबर खायला काशीने चार केळी दिली होती. रानात शेळ्या हिरवं हिरवं गवत चरु लागल्या. तसे सोनुसाठी रान नविन होते. सोनू तिथली एक एक गोष्ट निरखू लागली. शेळ्या चरण्यात अगदी मग्न झाल्या होत्या. तिथे की नाही एक गुहा होती. ती होती हत्तींची गुहा, दोन हत्ती तिथे रहात असत. सोनुने हत्तींना बघितले पण ती घाबरली नाही. त्यांना तीने केळी खायला दिली. हत्तींनीही ती खाल्ली. तीने त्यांच्या अंगावरून हात फिरवला. रोजचा तीचा असा दिनक्रम सुरु झाला. रोज रानात येऊन ती बर्याच गोष्टी शिकली. हत्तीही तीला चांगले ओळखू लागले होते. ती त्यांना रोज फळे देत असे, तसेच रोज पारवे, खारी, चिमण्या, कावळे, मधमाशी, वानर, ससे, हरणं, आणखीही बरेच प्राणी रोज तीला दिसत. खारुताईही दाणे, शेंगा, बोरं खाऊ आणून देत असे. ती ही प्राण्यांवर प्रेम करत असे, हत्तींबरोबर फिरून तिने जंगल पाहीले. जंगलातली चांगली वाईट ठिकाणे तीला माहिती झाली होती. थोडे सरपणही ती काशीसाठी आणत असे. पाणीही ती भरुन ठेवे. रोज सरपण आणायला हत्तींची मदत होत असे, तसेच जास्त सरपणाच्या ती मोळ्या करुन ठेवत असे काशी त्या विकत असे. काशीला सोनुची खुप मदत होई. काशी तीला थोडे पैसेही देत असे. असे तिने थोडे पैसेही साठवले होते. त्यातून ती आवश्यक गोष्टी विकत आणतं असे. हत्तींसाठी आवडीची केळी ती नक्कीच विकत घेत असे. रोज जंगलात जाऊन ती प्राण्यांकडून खुप काही शिकली.
मधमाशांकडून ती समुहाबरोबर कसे रहायचे हे शिकली, तसेच मुंग्यांकडूनही एकत्र राहून समुहासाठी अन्नपुरवठा कसा करायचा ह्याचे निरीक्षण केले. ससे तीला गाजरं, कंदमुळे आणून देत. तीचा हात पाठीवरून फिरला की प्राणी आनंदीत होत. त्यांच्या दुखण्या खुपण्यात ती त्यांच्या कडे लक्ष देत असे. खारुताई वेगवेगळ्या बिया आणून जमिनीत लपवून ठेवत असे, त्यामुळेही वेगवेगळी झाडं उगवतात हे ही तिने बघीतले. लहान पक्षांना मोठे पक्षी आधी दाणे खाऊ देतात हे ही तीने पाहीले. हिंस्त्र प्राणी लांबूनच येताना दिसले तर झाडावरची वानरे, पक्षी, चित्रविचित्र आवाज काढून ईतर प्राण्यांना सतर्क करतात व ते आवाज ऐकून सर्व प्राणी ढोलीत अथवा कुठेतरी सावध ठिकाणी आश्रय घेतात व जीव वाचवू शकतात, तसेच प्राण्यांना विविध झाडांचे औषधी गुणधर्मही माहिती असतात हे ही तिच्या लक्षात आले. रोज रानात जाऊन रानात प्राणी, पक्षांचे नियम तिच्या लक्षात येऊ लागले.
प्राणी, पक्षी नेहेमी एकमेकांना मदतच करतात, ते एकमेकांसाठी अन्न गोळा करतात, तसेच कारणाशिवाय एकमेकांवर हल्ला करत नाहीत. एकमेकांचा जीव वाचवतात. त्यांच्या जगातले कायदे हे माणसाच्या जगापेक्षा वेगळे आहेत. शिवाय त्यांना प्रेमाची भाषा समजते. आपण माया लावली तर ते आपल्यासाठी जीवही देतात हे ही तीला समजले.
पावसाळ्यात मात्र रानात पाणी जमत असे. पाऊस थांबला की निघुन जाई. तरीही कमी पाऊस असेल तर ती शेळ्यांना घेऊन रानात येई. तीला रानातील शांतता, किलबिल पक्षांचे आवाज, तिथली हिरवी कुरणे खुप आवडत असतं, तसेच रोज ताजे हिरवे गवत खाऊन शेळ्याही धष्टपुष्ट झाल्या होत्या. पावसाळ्यानंतर खुप सुंदर सुंदर फुलझाडे उमलली. अबोली, पिवळी, लाल, केशरी, सफेद, निळी, गुलबक्षी, रंगांची फुलेच फुले, ताजी ताजी, दवबिंदू टप टप करुन फुलांवर दिसत होते, अनेक रंगीबेरंगी फुलं, फुलपाखरही कीती!!, रानातील हे रम्य वातावरण बघून सोनुला खूप नवल वाटले, जणू फुलं हसत तिला बोलवत होती. शेळ्या चरत असताना एक दिवस तिने खुप फुले तोडली व त्यापासून एक गजरा, हार तयार केला. तरीही खुप फुले शिल्लक होती, त्याचे तीने गजरे केले. वेगवेगळ्या सुगंधी फुलांचे गजरे व हार घेऊन सकाळी तीने काशीला दाखवले. काशीला खुप नवल वाटले, "कीती ग हुशार माझी बाई" म्हणून तीने सोनूचे लाड केले. काशीने तीला जवळच्या बाजारात ते विकायला सांगितले. जवळच्या गावतील बाजारात तीने ते विकले. तिला बरेच पैसे मिळाले. त्यातून तिने एक टोपली, धागा सुई, केळी आणि हव्या असलेल्या वस्तू खरेदी केल्या. हत्तीही आता तिच्या बरोबर येत होतेच. फुले विकून ती घरी आली. हत्ती रानात निघून गेले. मग ती रोजच बाजारात जाऊन हार फुले, गजरे विकू लागली. लोकांना निरनिराळ्या रंगाची सुमधूर वासाची फुले बघून आनंद होत असे. बाजारात जायचा अवकाश तीचे गजरे, हार, फुलं विकली जात. यातच २-३ वर्षे आनंदात गेली. काशीचा मुलगा सतीशला सुद्धा हत्तींची ओळख झाली. तो ही त्यांच्यात मिसळू लागला, सोनुमुळे त्यालाही सवंगडी मिळाले. सकाळी शेळ्या चरायला रानात जाऊन हार गजरे करुन दिवसभर सोनु फुले विकून दुपारनंतर घरी परतत असे. तीचा, हत्ती व सतीश यांच्याबरोबर दिवस अगदी मजेत जात असे. काशीला तिने भरपुर पैसे मिळवून दिले. ती किती कष्टाळू आहे हे काशी व सतीश बघत होते. ते तीची काळजी घेत. काशी कामावर गेली की हत्ती व सतीश तीचे रक्षण करत. कधीही तीला एकटे सोडत नसत. त्यांची एक नविन सुंदर दुनियाच तयार झाली होती.
एक दिवस नेहेमीप्रमाणेच तीने सर्व आवरले व हार फुले घेऊन हत्तींबरोबर ती बाजारात गेली. अचानक बाजारात तिला तीचा सावत्र भाऊ दिसला त्यानेही तीला पाहिले. तो तिच्या जवळ येऊ लागला तशी ती घाबरुन मागे पळू लागली. हत्तींने पुढे येणार्या सोनुच्या भावाला रस्त्यात अडवले तसा तो घाबरला मागे फिरला. सोनू सगळी फुलं सतीश जवळ देऊन घरात पळाली , आत जाऊन दडून बसली. त्यानंतर दोन दिवस ती बाहेर गेलीच नाही. हत्ती रानात तीची वाट पाहू लागले.
प्राणी पक्षी एकमेकांची काळजी घेतात तसेच कोणी हल्ला केला तर कसे संरक्षण करतात हे ही तीने बघीतले होते.
तिसर्या दिवशी मात्र ती तयार झाली व शेळ्या घेऊन रानात गेली. फुले हार गजरे घेऊन बाजारात गेली. आज मात्र तिचे वडील तीला बाजारात दिसले. ते एकटेच होते. तीला बघताच "सोनू सोनू" अशी हाक मारत ते तिच्या जवळ आले. वडिलांना बघून तीलाही भरुन आले. हत्तींचे लक्ष होतेचं. पण सोनु सुरक्षित आहे हे बघून ते शांत होते. "सोनू कुठे होतीस ग ईतके दिवस? " असे वडील तीच्या डोक्यावर हात फिरवून म्हणाले "चल घरी चल! तुझी आई आजारी आहे व तिला दवाखान्यात न्यायलाही पैसे नाहीत " असे ते म्हणाले. " तिला बघायला तरी घरी चल" असे काकुळतीला येउन म्हणाले. तेव्हा ती, हत्ती, सतीश सर्व जण तीच्या घरी आले. खरचं आई आजारी होती. तसे सतीश च्या मदतीने तीने तीला दवाखान्यात नेले व पुर्ण बरी होईपर्यंत खर्चही केला. घरात फळे, भाजी भरपुर धान्य भरुन ठेवले, भावा बहिणींची चौकशी केली. आई पुर्ण खडखडीत बरी झाली. तसे घरी आल्यावर तिने सोनुची रडत रडत क्षमा मागितली. व तीला घरीच आपल्याबरोबर रहाण्यास सांगितले.
सोनू म्हणाली "आई मी तुला माफ करण्याइतकी मोठी नाही, पण प्राण्यांच्या बरोबर व काशीताई सारख्या प्रेमळ माणसांत राहून मी उगाचच कोणालाही त्रास देऊ नये हे शिकले, तसेच एकमेकांना मदत करुन आपण आपले जीवन किती आनंदी करु शकतो, इतरांना संकटात पाडून आपणही एक दिवस संकटातच पडतो. माणसांच्या दुनियेईतक्या सोयी या मुक्या प्राण्यांकडे नाहीत पण त्यांना माया लावली तर एकमेकांचं मन जपण्याईतकी माणूसकी नक्कीच त्यांच्याकडे आहे. तुमच्यावर कोणावरही काहीही अडचण आली तर मला हक्काने बोलवा मी रात्रीसुद्धा तुमच्या मदतीला येईन पण आता मी त्यांना सोडून व ते मला सोडून राहू शकणार नाही. येते मी !! असे म्हणत ती, हत्ती व सतीश बरोबर आनंदाने घरी परतली.
घडलेला प्रकार तीने काशीला सांगीतला. खरतरं काशीला तिच्यामुळे पैशांची खुपच मदत झाली होती. आणि आयुष्याच्या शाळेनेही सोनुला खुप काही शिकवले होते. स्वतःच्या पायावर तर ती ऊभी होतीच. पण काशीने तिलाही शाळा शिकवायचे ठरवले. सकाळची सर्व कामे करुन, शेळ्या चरून, फुले आणुन, दुपारी ती शाळेतही जाऊ लागली. हत्तींनाही ती रोज रानात भेटत असे.
अशारितीने एकमेकांना मदत केल्यानेच, एकमेकांच्या ऊपयोगी पडता येऊ शकते हा प्राण्यांच्या राज्याचा नियम तीने आयुष्यात कायम लक्षात ठेवला. व सर्वांना शिकवला.
मग मुलांनो आवडली का ही गोष्ट तुम्हाला?, मग करणार ना सोनुसारखी मदत तुम्ही सगळ्यांना......?
- ✍️ सौ. शिवानी श्री. वकील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा