सासू हवी तर अश्शी...

सासू हवी तर अश्शी... सोनालीच काहीच दिवसापूर्वी लग्न झाल होत.....पहिल्यांदाच माहेरी जाऊन ती सासरी

सासू हवी तर अश्शी...

सोनालीच काहीच दिवसापूर्वी लग्न झाल होत.....पहिल्यांदाच माहेरी जाऊन ती सासरी आली होती.....आल्या नंतर पण मनात एक भीती होतीच....घरातील लोक कसे असतील त्यांचा स्वभाव कसा असेल....मला समजून घेतील ना...मी ह्या घरात रुळेल ना.....असे बरेच प्रश्न तिच्या मनात होते.....सगळ्यात महत्वाच म्हणजे सासूबाई आपल्याला समजून घेतील कि नाही ह्याची भीती जास्त होती....कारण लग्नानंतर सगळ्या मैत्रीणी शेजारीपाजारी सगळ्यांनीच त्यांचे अनुभव सांगितले होते...शेजारच्या काकू तर म्हणायच्या किती ही जीव लावला तरी सासू ही सासुच असते ती कधी आई नाही होत...त्यामुळे सोनाली सासूबाईशी बोलताना वगेरे थोड सांभाळूनच बोलायची....

सोनाली दिसायला सुंदर, देखणी, हुशार सगळ्या कामात सरस....तिच्या सासरी तिचे सासू सासरे व तिचा नवरा....एकुलता एक म्हंटल्यावर नवऱ्याकडून घरच्यांच्या खूप अपेक्षा असायच्या..आणि आता सुनेकडून ..तिचा नवरा ही कामानिमित्त मुंबईला असायचा....लग्नाची सुट्टी संपल्यामुळे त्याला मुंबईला जाव लागल होत....त्यामुळे आपला नवरा ही आपल्या सोबत नाही त्यामुळे तर सोनालीला जास्तच टेंशन अल होत....

ती सकाळी लवकर उठून अंगण साफ करून घरची साफसफाई करून तीच आवरून मग स्वंयपाक करायची....स्वंयपाक करताना सुद्धा जेवणात काय बनवायचं हे सासूबाईना विचारूनच करत असे....तरी सासूबाई तिला म्हणायच्या अग मला कशाला विचारतेस तुला जे बनवू वाटत ते बनव मला काहीच हरकत नाही....पण परत केलेलं आवडल नाही तर...म्हणून ती त्यांना विचारूनच करायची.....स्वयंपाक करताना तिला वाटायचं कि बनवलेलं जेवण आवडेल ना..... नाही आवडल तर काही बोलणार नाहीत ना...अशी एक भीती असायचीच

सासूबाईना तिची तारांबळ कळायची त्यामुळे त्या तिला समजून घ्यायच्या....ज्यावेळी ती चुकतेय अस त्यांना वाटायचं त्यावेळी त्या शांत प्रेमाने समजून सांगायच्या....काहीही आणल तर सोनालीला पण घेऊन यायचं ...साडी आणल तर तिलाही घेऊन यायचं.......पण सोनालीच्या डोक्यात सासू ती सासुच असते हेच बसल होत...त्यामुळे सोनालीला त्या मागची माया प्रेम कळत नव्हत......

एके दिवशी सगळी काम आवरल्यावर सोनाली तिच्या रूममध्ये बसली होती..सासूबाई कुठे बाहेर गेल्या होत्या..त्यावेळी तिच्या मैत्रिणीचा फोन आला ती तिच्याशी बोलत होती.....पूजा तू म्हणायचीस कि सगळ्या सासवा सारख्याच असतात फक्त काम करण्यासाठी गोड बोलत असतात पण माझ्या सासूबाई अश्या आहेत अस नाही ग वाटत मला......सोनाली तुला अस का वाटत आहे.....सोनालीची मैत्रीण अश्च्यार्याने विचारते ....अग पूजा बग ना काहीही आणल्या तर मला पहिला घेतात आजपर्यंत कधीच ओरडल्या नाहीत काही चुकल तर व्यवस्थित समजून सांगतात.....

हा फक्त देखावा असतो..तुझा नवरा इथे नसतो ना..मग त्या वाईट वागल्या आणि तू त्यांना सांगितलीस तर ते तुला त्यांच्या सोबत घेऊन जातील ना..मग इथे काम कोण करणार म्हणून त्या तुझ्याशी गोड बोलत असतील....कुठली सासू चांगली नसते हा.....पूजा

ह्या दोघींचं बोलण सुरु असत इतक्यात सासूबाई येतात व त्या हॉल मधून सोनालीला हक मारतात.....पूजा सासूबाई आल्या आहेत मला बोलवत आहेत मी फोन ठेवते....सोनाली खाली येते..आई तुम्ही बोलवल का.....

आग हो इकडे ये....हे बग तुला आवडत का....सासूबाई हातात सोन्याचे कानातले सोनालीला दाखवत बोलल्या....खूप सुंदर आहेत आई...कोणासाठी आणलात.....

अग कोणासाठी काय तुज्यासाठीच की.......सासूबाई

माझ्यासाठी अहो कशाला आणलात परवाच तर लग्नात घेतला होत की

अग मला आवडले मग म्हंटल तुला चांगले दिसेल म्हणून घेऊन आले....सासूबाई

काही सणवार नाही काही नाही तरी सुद्धा घेऊन आल्या आहेत..पूजा म्हणत होती तसच असाव बहुतेक...सोनाली मनातल्या मनात विचार करत असते ...

अग काय विचार करत आहेस हे घे..हे ठेव तुझ्या जवळ सासूबाई कानातले सोनालीकडे देत बोलतात

सासूबाईचा आवाज येताच ती भानावर येते....हो आई ठेवते.....

रात्रीची जेवण आटपून सोनाली तिच्या रूममध्ये तिच्या नवऱ्याशी बोलायला गेली......रात्री नवऱ्यासोबत उशीर बोलत बसल्यामुळे सोनालीला उठायला वेळ झाला....आता सासूबाई काही तरी बोलतील किवा रागावतील म्हणून ती गडबडीने जिन्यावरून भरभर खाली उतरत होती.....घाईगडबडीत येताना तिचा पाय सटकतो व ती जिन्यावरून खाली पडते....उजव्या हाताला व पायाला लागत ती जोरात ओरडते......सोनालीचा आवाज ऐकुन सासूबाई किचन मधून धावत येतात....सोनालीला अस खाली पाडलेल पाहून त्या खूप घाबरतात त्या धावत तिच्याजवळ येतात....

सोनाली......काय झाल हे कशी पडलीस तू....ए उठ चल सोफ्यावर बस चल...सासूबाई तिला आधार देत उठवत होत्या

आई ग...सोनाली झोरात ओरडते.....आई मला नाही उठता येत खूप दुखत आहे.....

सासूबाईना काहीच कळेना काय कराव...त्यांनी शेजारच्या वाहिनीच्या मदतीने सोनालीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातात.....

सोनालीच्या उजव्या हाताला व पायाला जोरात मार बसला होता.....त्यामुळे तिच्या हाताला व पायाला प्लास्टरकरण्यात आल....महिनाभर रेस्ट घ्यावी लागणार होती काहीच हालचाल करायची नव्हती.....सोनालीला घरी घेऊन आले.....व तिला तिच्या रूममध्ये नेहून झोपवले....

सोनाली तू आराम कर मी आलेच..अस म्हणून सासूबाई बाहेर आल्या व त्यांच्या मुलाला फोन करून सांगितल्या...हे ऐकल्यावर त्यांचा मुलगा लगेच यायला निघाला..त्याने ऑफिस मध्ये तसा अर्ज दिला पण लग्नात सुट्ट्या जास्त झाल्यामुळे त्याला सुट्टी मिळाली नाही..आता काय कराव त्याला कळतच नव्हते....त्याने त्याच्या आई ला फोन केला व सुट्टी मिळत नसल्याचे सांगितले...

बाळा तू काळजी नको करू.... मी व्यवस्थित  काळजी घेईन सोनालीची.....अस म्हणून त्यांनी फोन ठेवला

आता आपल्याला काहीच हालचाल करता येणार नाही...काही हवं असेल तर सारखं सासूबाईना कस सांगायचं..म्हणून तिने आपल्या आई ला फोन केला....पण तिच्या आईचीच तब्बेत बिघडली होती त्यामुळे तिलाही जमणार नव्हते...आता सोनालीकडे सासूबाईशिवाय दुसरा पर्याय नव्हता.आपला नवरा हि नाही आणि आपली आई पण नाही त्यामुळे तिचा चेहरा पडला.....

सासूबाई त्यांच्या मुलाशी बोलून सोनालीच्या रूममध्ये येतात....मी आत्ता तुझ्या नाव्र्याशीच बोलत होते....तुझ्या बद्दल सांगितल तो तत्काळ निघत पण होता..... पण लग्नात सुट्टी भरपूर झाल्यामुळे त्याला सुट्टी मिळाली नाही...हे ऐकल्यावर सोनालीचा चेहरा पडला...

सोनालीचा पडलेला चेहरा पाहून त्या सोनाली जवळ जातात....सोनाली नको काळजी करू...मी आहे ना.....मी घेईन तुझी काळजी तुला काय हवं नको ते मी बघेन...चल आता झोप मी स्वयंपाकाच बघते.....

जेवण बनून झाल्यावर सासूबाई सोनालीला जेवण घेऊन तिच्या रूम मध्ये येतात.....आणि समोर बघतात तर काय सोनाली स्वताहून बाथरूम कडे जात असते...त्या पटकन हातातील ताट खाली ठेवतात व सोनालीकडे जात असतात इतक्यात सोनालीच्या पायात जोरात कळ येते व तिचा तोल जातो सासूबाई पटकन धावत जाऊन तिला पकडतात...अग काय हे सोनाली मला हाक नाही का मारायची...काही झाल असत तर..चल मी घेऊन जाते तुला...

बाथरूम मध्ये जाऊन आल्या नंतर सासूबाई सोनालीला भरवत असतात....हे बग सोनाली अस परत नको करू..काहीही लागल तर मला बोलवत जा संकोच नको करू....

दोन दिवस सगळ हौसेने कराल आणि नंतर टोमणे माराल तुझ्यासाठी एवढ केलो आणि तेवढ केलो...... सासूबाईचं बोलन ऐकुन सोनाली मनातल्या मनात बोलते....मैत्रिणीच्या आणि शेजारी पाजार्यांच्या  बोलण्याचा सोनालीवर इतका परिणाम झाला होता कि आपली सासू आपल्या आई सारखी आपली सेवा करतेय हे सुद्धा तिला कळत नव्हत....

असेच दिवस जात होते सासूबाई सोनालीला अंघोळ घाल्यानापासून तिला जेवण भरवण वेळवर गोळ्या देन सगळ्या गोष्टी करत होत्या तीच मन रमवण्यासाठी इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगायच्या......आपला नवरा सोबत नाही ह्याची सुद्धा त्या कमतरता भासू द्यायच्या नाहीत .....

मैत्रीणी शेजारच्या काकू जस म्हणायच्या तस नाहीये..माझ्या सासूबाई खरच चांगल्या आहेत..एका मुलीप्रमाणे सगळ माझ करत आहेत कुठली सासू आपल्या सूनेच एवढ करते ...पण मी मूर्ख बाकीच्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या बद्दल गैरसमज करून घेतला .....सासूबाईचं हे वागण बघून सोनालीला तिच्याच वागण्याची लाज वाटू लागली

नंतर सोनाली सुद्धा सासुबींशी प्रेमाने वागू लागली...त्यांच्याशी मनातील सगळ सांगू लागली....बघता बघता दोघी चांगल्या मैत्रीणी कधी झाल्या कळलच नाही....

सोनालीला आता बर्यापैकी हालचाल करता येऊ लागली होती....बघता बघता कधी महिना झाला कळलच नाही...

सोनाली आवरल का ग डॉक्टरांच्याकडे जायचं आहे.....सासूबाई

हो आई आले...सोनाली सासूबाईच्या जवळ येत बोलते....

सोनालीचा हात व पाय बरा झाला होता.... आता थोडी हालचाल करता येत होती.....दोघी दवाखान्यात जाऊन प्लास्टर काढून येतात...घरी आल्यावर सोनाली समोर पाहते तर...खूप खुश होते....अहो..............तुम्ही.......सोनाली भरभर चालत जाते...तिचा नवरा आलेला असतो....आग हळू आत्ता प्लास्टर काढून आलेस लगेच धावतच काय येत आहेस....

तुम्ही केव्हा आलात..आणि मला सांगितल का नाही...सोनाली

तुझ्यासाठी सरप्राईज होत....नवरा

माझ्यासाठी म्हणजे आई ना माहित होत....सोनाली सासूबाईच्याकडे पाहत बोलली

हो....अग तुला सांगितल असत तर..आता जो तुज्या चेहऱ्यावर आनंद आहे तो पाहायला मिळाला असता का....

सगळे थोडा वेळ हॉलमध्ये बोलत बसले होते...सोनाली सासूबाईशी जशी वागली ते तिला खात होत ती सासूबाईशी बोलायचं ठरवते..ती उठते व सासूबाईजवळ येते...

आई मला माफ करा....सोनाली

अग काय झाल अस का बोलतेयस....सासूबाईना काही कळेनाच

आई मी आजपर्यंत तुमच्याशी फक्त तुम्ही एक सासू आहात म्हणून वागत होते...माझ्या मैत्रीणी व शेजारच्यांनी मला सासू बद्दल जे सांगितल होत माझा तसाच गैरसमज झाला होता कि सगळ्या सासवा सारख्याच असतात..पण तस काहीच नव्हत तुम्ही माझ्याशी कायम लेकी सारख वागलात..पण मी मात्र तुमच्याशी सून म्हणूनच वागत राहिले मला माफ करा....

बाळा माफी नको मागू तुझा ह्यात काही दोष नाहीए...तू जे ऐकलस तुला जे सांगण्यात आल तस तुला वाटत गेल...पण अस नसत एक सासू वाईट निघाली म्हणून बाकीच्या सासवा वाईटच असतात अस नसत....मला लेक नाहीये...त्यामुळे तू जेव्हा पहिल्यांदा ह्या घरात आलीस तेव्हाच मी तुला माझी लेक मानले आहे...आणि कायम माझी लेक राहशील कळल का....सासूबाई सोनालीला मिठी मारत बोलतात.....

आणि इथून पुढे एका माय-लेकीच नात सुरु झाल .....

***

(ही कथा काल्पनिक आहे ह्याचा काही सबंध अढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....