सासू सुनेच्या नात्यातील नवी मैत्री...
लघुकथा
ऋतुजा वैरागडकर
लघुकथा
ऋतुजा वैरागडकर
वर्षानुवर्षांच्या परंपरा, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि दोन वेगळ्या पिढ्यांमधील तणाव… या सगळ्याचा अनुभव घेत आलेली शकुंतला आणि तिची सून प्रिया...
शकुंतला म्हणजे शिस्तप्रिय, परंपरावादी आणि थोडीशी कठोर सासू. तर प्रिया म्हणजे आजच्या युगातील आत्मविश्वासू, आधुनिक विचारांची आणि करिअरला प्राधान्य देणारी सून. दोघींच्या स्वभावांमुळे त्यांच्यात सतत वाद व्हायचे.
"घरातल्या स्त्रियांना सासरच्या माणसांची जबाबदारी घ्यायची असते, त्यांच्यासाठी वेळ द्यायचा असतो, तुझ्यासारखं ऑफिस ऑफिस करायचं नसतं." शकुंतला कधीही संधी मिळाली की प्रियाला टोमणे मारायची.
तर प्रिया स्वतःच्या विचारांवर ठाम होती.
"आई तुमच्या काळात तसं असेल, पण आता स्त्रियांना स्वतःचं स्वातंत्र्य हवंय. मला माझ्या कामाचा अभिमान आहे."
एक दिवस प्रियाला ऑफिसमध्ये उशीर झाला. शकुंतला खूप नाराज झाली. तिने मनाशी ठरवलं, यावेळी तिला चांगलंच सुनावायचं.
एक दिवस प्रियाला ऑफिसमध्ये उशीर झाला. शकुंतला खूप नाराज झाली. तिने मनाशी ठरवलं, यावेळी तिला चांगलंच सुनावायचं.
प्रिया दमून घरात आली. हातातल्या फायली बाजूला ठेवत ती म्हणाली,
"आई आज मी एक मोठा प्रोजेक्ट पूर्ण केला. माझ्या मेहनतीचं फळ मिळालं."
शकुंतलाच्या तोंडून काहीच निघेना. ती प्रियाच्या डोळ्यांतील चमक पाहत होती. तिला अचानक आपल्या तरुणपणीची आठवण झाली. नवऱ्याच्या व्यवसायासाठी तिने स्वतःच्या इच्छांना मुरड घातली होती. शिक्षण सुरू असतानाच लग्न झालं आणि घर सांभाळत ती नवऱ्याला मदत करत राहिली. तिला स्वतःचं काही करायचं होतं पण ते कधीच शक्य झालं नव्हतं.

त्या रात्री ती बराच वेळ विचार करत होती. कदाचित प्रियाची वाट चुकलेली नव्हती… कदाचित तिच्या यशात संपूर्ण कुटुंबाचा अभिमान असायला हवा.
दुसऱ्या दिवशी सकाळी,
प्रियाला स्वयंपाकघरात चहा करताना पाहून शकुंतला म्हणाली,
"काय मग यशस्वी प्रोजेक्ट मॅनेजरसाठी एक कप चहा मी करायला नको का?"
प्रिया आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. शकुंतलाच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य होतं.
प्रियाला स्वयंपाकघरात चहा करताना पाहून शकुंतला म्हणाली,
"काय मग यशस्वी प्रोजेक्ट मॅनेजरसाठी एक कप चहा मी करायला नको का?"
प्रिया आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. शकुंतलाच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य होतं.
त्या दिवशी, सासू-सुनेचं नातं बदललं. एक जाणीव, एक स्वीकार, आणि एक नवीन मैत्री निर्माण झाली होती.
समाप्त: