सापळा

नारायणरावाच्या मनातल्या खलबळीबरोबर तिकडे चंदा च्या मनातही विचाराचा महासागर उसळला होता.आज आप?

सापळा
पोलीस स्टेशन शिरूर चे सब इन्स्पेक्टर आमले जुने रेकॉर्ड फाईली चाळत बसले होते.एखादा तपास न लागलेल्या गुन्ह्याचा तपशील वाचण्याचा प्रयत्न करीत होते.एवढ्यात हवालदाराने येऊन सांगितलं.
" साहेब एक म्हातारा तक्रार घेऊन आलाय.त्याची तरुण मुलगी हरवली आहे"
" तरुण मुलगी?मग ती हरवली कसली?पळून गेली असेल कोणाबरोबर तरी.बरं पाठवून दे त्या म्हाताऱ्याला आत."
" नमस्कार साहेब..."हवालदार बरोबर खोलीच्या दारात तो म्हातारा शिरत म्हणाला.
फाईली तून डोकं नि विचारातून मन बाहेर काढून आमलेनी म्हाताऱ्याला विचारलं.
" काय तुझे नाव ?"
" नारायणराव जोशी " म्हातारा म्हणाला.
" काय तक्रार आहे "
म्हातारा समोर खुर्चीवर बसला.आणि म्हणाला.
" त्याचं असं आहे साहेब..."आणि त्याने आपली तक्रार सांगितली.
नारायणराव ची मूळ वस्ती रांजणगावची.पुणे नगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर शिरूर तालुक्यातील अष्टविनायक गणपती पैकी एक तीर्थक्षेत्र म्हणजे रांजणगाव. गणपती मंदिराजवळ पूजेचं साहित्य विकण्याचं एक छोटंसं दुकान नारायणराव गेल्या वीस वर्षांपासून चालवित होते.आपल्या तीन अपत्यापैकी चंदा ही थोरली मुलगी.वय होते जवळपास सोळा वर्षे आणि ही मुलगी घरातून पसार झाली होती.
वयात आलेली पोरगी घरातून  एकाकी निघून गेली म्हणजे आई बापाला केवढा धक्का!पोटचा गोळा तो आणि त्यातून मुलीची जात.तिने अश्याप्रकारे एकदा बापाचं घर सोडलं की समाज तिच्याकडे चांगल्या नजरेने पाहत नाही आणि आई बापाला तोंड दाखवायला जागा राहत नाही.
" किती दिवस झाले पोरगी नाहीशी झाली त्याला" इं आमले नी चौकशीच्या दृष्टीने प्रश्न केला.
 "दोन महिने झालेत साहेब" म्हातारा म्हणाला.
" मग इतके दिवस स्वस्थ का बसलात?पोलीस ठाण्यात तक्रार का दिली नाही?मुलगी नकोशी झालीय का?"
" साहेब वाटलं ,येईल आज उद्या घरी काम पडायचं पुष्कळ.चांगलं खायला नाही,नेसायला नाही,म्हणून रागाने गेली असेल कुठं!येईल आली की!" म्हाताऱ्या चे डोळे आता भरून आले होते.आणि पाहता पाहता डोळ्यातून अश्रू झरू लागले.
आणि मग त्यानं पोरगी बद्दल सारं सविस्तर सांगितलं.शेवटी म्हणाला.
"साहेब पोरगी लहानच आहे.कोणी फूस लावून पळवली असेल तर...?"
" ठीक आहे आम्ही तक्रार नोंदवली.आता आम्ही तपासायला सुरुवात करू.तिचा एखादा फोटो असल्यास द्या म्हणजे जास्त बरं पडेल . तसा तपास लागला की कळवू ."
आणि म्हातारा हात जोडून नमस्कार करत निघून गेला.
आमले विचारात पडले.महिना भरापूर्वी घरातून निघून गेलेली ही अजाण मुलगी नि बाप स्वस्थ कसा? त्याने पूर्वीच तक्रार का दिली नाही?महिना भर आई बापाला काहीच कसं वाटलं नाही?की एवढंच एक तोंड खायला कमी म्हणून चूप बसले.असतील.नात्या गोत्यात तपास करून स्वस्थ बसले असतील.
सब इन्स्पेक्टर आमलेच्या डोक्यात अनेक तर्क धावू लागले.उलटसुलट विचारांनी डोकं भरून गेले. तपासायला कुठून नि कशी सुरुवात करायची याचे  आडाखे ते बांधू लागले.
थोडे दिवस असेच गेले.तेवढ्या काळात नारायणराव दोनदा पोलीस स्टेशनमध्ये येऊन गेले.तपासाचं काम चालू आहे अद्याप काही बातमी लागली नसल्याचं इंस्पेक्टर साहेबांनी सांगितलं.
एवढ्यात दुकानाच्या सामान खरेदीसाठी नारायणरावने पुण्याला जायची तयारी चालविली .त्याने आपल्या मित्राकडून थोडे हात उसने  पैसे घेतले होते.थोडी बायको मुलांसाठी खरेदी करायची त्यानं ठरवलं आणि स्वतःही थोडी चैन करणार होता.
शिवाजीनगर स्टेशनवर तो उतरला.पुण्याची त्याला बरीचशी माहिती होती.त्याचा एक लांबचा नातेवाईक कसबा पेठेत राहत होता.त्याच्याकडे रात्री थांबायचं त्याने ठरवलं होतं.एक हॉटेलात तो गेला.हवं ते पोटभर खाल्लं नि बाहेर पडला.हॉटेलच्या बाहेरूनच त्याने एक रिक्षा ठरवली.रिक्षा वाल्याने बुधवारपेठेत एका मुख्य रस्त्यावर त्याला उतरवून दिले.
मुख्य रस्त्यावर थोडं पुढे जाऊन एका बोळीतून तो पुढे जाऊ लागला.एक चार मजली जुन्या पण मजबूत वाटणाऱ्या बिल्डिंग पाशी तो थांबला.तिथूनच वर जाण्याचा रस्ता जीना होता.सारखी ये जा चालली होती.नारायणराव जिन्याच्या पायऱ्या चढू लागला.एकेक पायरी वर जात होता तशी त्याच्या छातीची धडधड वाढत होती.पण हा अनुभव त्याला नवीन नव्हता.पुण्याला आल्यावर अश्या माड्या तो अनेकदा चढलेला होता.काही तासांच्या उपभोगाची मजा त्याने घेतली होती.नारायणराव माडी चढून वर आला.दोन मिनिटातच एक जाड पोक्तशी बाई त्याच्या समोर येऊन उभी राहिली.मग म्हणाली.
" या माझ्या मागे .."
एक मोठा दिवाणखाना ओलांडून ती एका लहान खोलीत शिरली.तिथं दहा बारा पोरी नीटनेटके कपडे,रंगरंगोटी करून बसल्या होत्या.
बाई म्हणाली " खास आवड असली तर सांगा म्हणजे तसा माल देता येईल ."
नारायणराव खोलीचं निरीक्षण करीत होते.ठिकठिकाणी सुगंधी फ्लावर पॉटस होते.छतावर झुंबर लोंबत होती.खिडक्यांना निळे काचं असल्याने दिव्याच्या प्रकाशाला एक वेगळेपण प्राप्त झाले होते.भिंतीवर नग्न,अर्धनग्न,ओल्या वस्त्रातील स्त्रियांचे फोटो लावले होते.नारायणराव तिकडे टक लावून पाहत होता.त्यांच्याकडे पाहून बाई मोठ्यांदा हसली नि म्हणाली.
" नुसतं पाहून मनाची तहान भागत नाही.घसा कोरडा पडला की तो ओला करायला पाण्याची आवश्यकता असते.आपल्या विहिरीला खूप चांगलं गोड पाणी आहे.ते जाऊ द्या.अगोदर पैशाचं बोला."
नारायणराव विचारात पडले.
" विचार कसला करता पाव्हणं ? पैसा वाया जाणार नाही." बाई परत म्हणाली.
आणि मग नारायणरावनं खिशातून नोटा काढून बाईच्या हातावर ठेवल्या.घरचा, पोरीचा सगळ्याचा त्याला विसर पडला.बाई उठून आत गेली.आणि पाच मिनिटातच त्याच्यासमोर ओळीत दहा बारा मुली येऊन उभ्या राहिल्या.
एकेका  मुलीच्या चेहऱ्यावरून नजर फिरवतांना त्याला घाम सुटला.छातीत धडधडत होतं. त्याच्या मनात आलं,चांगल्या बऱ्या दिसायला या तरुण पोरी इथं या नगरीत का आल्या असतील? परमेश्वराने दिलेला चांगला मनुष्य जन्म पण हया नरकात फुकट चालला आहे.
" हं आटपा लवकर " बाई म्हणाली.
"नारायणराव विचार तंद्रीतून जागे झाले. आणि प्रत्येक मुलीकडे पाहू लागले.नारायणराव ऐका मागून एक मुलगी पाहत होते.
आणि ...आणि अचानक...?
अंगावर वीज कोसळावी तसं त्यांना झालं.उकळत्या तेलात हात पडावा तसं दुःख त्याच्या पुढ्यात उभं राहिलं.वठलेल्या वृक्षाला अचानक पालवी फुटावी किंवा वांझोट्या स्त्रीला दिवस लोटावेत जस भयंकर आश्चर्य वाटेल अस आश्चर्य नारायणरावला वाटलं.
त्यांनी अंगाला चिमटा घेऊन पहिला.डोळ्याची उघडझाप करत तो पुन्हा समोर पाहत होता.त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना.समोर दिसतंय ते सत्य की भास? माझे डोळे मला फसवत तर नाहीना?नारायणरावला ते सारे नको वाटत असलं तरी त्याच्या मर्जीची ती गोष्ट नव्हती.सत्य उघड होतं आणि ते सत्य असलं तरीही अप्रिय होतं.
नारायणराव ने एक आवंढा गिळला .सारं बम्हांड त्याच्या पुढे आठवलं आणि तीव्र वेदनेची कळ हृदय कापत गेली.नारायणराव ला वाटलं मोठ्यांदा किंचाळून याचा जाब विचारावा.
त्यानं पुन्हा त्या तरुणीकडे निरखून पाहिलं.त्याला वाटलं ,बेंबीच्या देठा पासून ओरडून हिला विचारावं .
' चंदा तू?तू इथे कशी?या नरकात तू कशी आलीस?बापाच्या घरी तुला चैन करायला मिळत नव्हती म्हणून हा चैनीचा मार्ग! अब्रूची नासाडी झाल्यावर आज तुझा शोध मला लागतोय! अशा ठिकाणी.अश्या अवस्थेत!'
नारायणराव चा सारा उत्साहच संपला.त्याचे हात पाय थरथरू लागले.वाटलं चंदाचा हात धरून याक्षणी तिला इथून बाहेर काढावं. फाड फाड तोंडात मारून इथं का आलीस म्हणून खडसून विचारावं.नरडं दाबून तिचा प्राण घ्यावा.आणि ती आपल्याला मेली असं समजून याक्षणी इथून निघून जावं.
नारायणरावाच्या मनातल्या खळखळी बरोबरच इकडे चंदाच्यामनातही विचाराचा महासागर उसळला होता.डोळ्यासमोर अशा नको त्या ठिकाणी आपले जन्मदाते दिसावेत ! इथे अशा ठिकाणी सहा महिन्यांनी आपली गाठ पडावी! किती दुर्भाग्य! तिचं अंग थरथरू लागलं.चेहरा पांढरा फट पडला.याक्षणी भूमी आपल्याला पोटात घेईल तर फार बरं होईल.असं ही तिला वाटलं .पण वेश्यागृहात राहून धंदा करण्याऱ्या स्त्रीला भूमाता तरी कशी पदरात घेणार?
चंदाचा जीव घाबरू लागला.आपल्या आयुष्याची झालेली ही दशा,लागलेली काळीमा, विटाळलेला  देह ! अशाच अवस्थेत आपण उभ्या आहोत एक वेश्या म्हणून आणि वडील समोर एक गिऱ्हाईक म्हणून!
चंदाच्या  डोळ्यात गच्च पाणी भरलं.मोठ्या प्रयासाने तिने आवंढा गिळला.खाली मान घालून पदराच्या टोकाशी चाळा करीत राहिली.नारायणरावाने स्वतःला सावरलं.तिथे काहीच न दाखवता त्याने चंदाची निवड केली.आणि बाईने चंदाला नारायणराव बरोबर खोलीत जायला सांगितले.
दोघेही खोलीत येताच नारायणरावाने दाराला कडी घातली.
" बाबा..." चंदाने नारायणरावाला मिठी मारली.तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता.काय बोलावं हे तिला समजत नव्हते.आवेगाचा पहिला बहर ओसरल्यावर तिने बापाचे पाय धरले.
" बाबा मला इथून सोडवा.मी इथं खुशीने नाही आली .मला इथे आवडत नाही.मला इथे नाही राहायचं.मला विष देऊन टका,विहिरीत ढकलून द्या. पण मला इथून घेऊन जा ...."
ती हुंदके देऊन रडू लागली.बापाने तिला जवळ बसवलं,पाठीवर मायेचा,धीराचा हात ठेवला.तिला पुन्हा जोराचा उमाळा आला.वडिलांना घट्ट मिठी मारून ती म्हणत होती.
5" जीव देण्याचा ही प्रयत्न केला पण इथलं आयुष्य फार वाईट आहे.तुम्ही मला जन्म दिला,तुम्हीच माझ्या आयुष्याचा शेवट करा पण मला इथे सोडून जाऊ नका."
" शांत हो पोरी !शांत हो ! तू इथं कशी आलीस ,कोणी आणली.घर का सोडलंस.हे सारं मला सांग.घाबरू नकोस.सारं व्यवस्थित सांग." नारायणराव तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत होते.त्यांचा राग आता दूर झाला होता.
चंदाने एक आवंढा गिळला आणि सगळी कर्म कथा सांगायला सुरुवात केली.
" आपल्या घराच्या शेजारी यशवंतरावांचा पानाचा ठेला आहे.तिथे हा मोहन काही करत होता.येता जाता माझ्याकडे पाहून हसायचा .हळूहळू त्याने माझ्याशी ओळख वाढविली.माझ्याशी काही वेळ बोलत रहायचा ,पलीकडच्या कोपऱ्यावर रहदारी नसायची तिथे.मला त्यात काही फारसं चूक वाटलं नाही."
एकदा त्यानं मला सिनेमाची दोन तिकिटं दाखविली म्हणाला 'तुला यायचंय'
मला खूप आनंद झाला.सिनेमाला कधी जाणं होतच नव्हतं.पण वाटलं आईला काय सांगू.? तिला आवडणार नाही.
तो म्हणाला ' मैत्रिणी सोबत जाते म्हणून सांग'. मग मी तसंच केलं आणि आम्ही दोघे सिनेमाला गेलो,वेगवेगळे ,कोणाला समजू नाही म्हणून.
सिनेमाला तो माझ्याशी खूप चिकटून बसला.एकदा त्याने त्या अंधारात माझा मुका ही घेतला.मग मी वेळ मिळेल तेव्हा त्याच्या बरोबर माळरानावर जाऊ लागले.तो मला आवडू लागला.
आणि एक दिवस तो म्हणाला.
' मला पुण्या जवळच एक फॅक्टरी मध्ये नोकरी लागली आहे.मी तुझ्याशी लग्न करीन आपण छान संसार करू .'
' तू माझ्या बाबांना विचार ?' मी म्हटलं .
' आपण पुण्याला पळून जाऊ नि मग लग्न करू.मी नोकरी करेन.तुला सुखात ठेवेन' असं तो म्हणाला.
आम्ही इथे पळून आलो.त्यानं मला इथे आणून सोडलं. म्हणाला.
' राहायची जागा मिळाली की तुला घेऊन जाईन '
" बाबा त्याने मला फसवलं.पुरतं फसवून इथे आणून या नरकात सोडलं.माझं सगळं लुटलं " 
" तो कुठे आहे?तुला कधी भेटतो?" नारायणरावाने विचारले. ' 
" केव्हातरी येतो.त्याच्या फॅक्टरी चा पत्ता आहे माझ्याकडे" असं म्हणत  तिने एक कागदाचा तुकडा वडिलांकडे दिला.
चंदा ने सारी माहिती बापाला दिली.बराच वेळ झाला होता.नारायणराव बाहेर जाण्यासाठी उठले.जाता जाता पोरीला म्हणाले.
" घाबरू नकोस,कोणाला काही बोलू नकोस.तुझं माझं नातं कोणाला सांगू नकोस.काय करायचं ते मी पाहतो. तो पर्यंत इथं शांत रहा.मी लगेच गावी जातो."
" पण बाबा मला इथून लवकर .." ती पुन्हा रडू लागली.
नारायणरावाने तिच्या पाठीवरून हात फिरवला.त्याचं सारं लक्ष आता गावाकडे लागलं होतं.कधी एकदा घरी जातो.पोलीस स्टेशनला जाऊन सारं सांगतो.असं त्याला झालं होत.
पुण्याची ट्रिप त्याने इथेच संपवली.गावी पोहोचताच घरी न जाता तो सरळ पोलिस स्टेशनवर आला.
" साहेब पोरीचा तपास लागला" पोलीस स्टेशनला येऊन त्यानं सर्व हकीगत सविस्तर सांगितली.
आणि मग इंस्पेक्टर साहेब,दोन कान्स्टेबल नि नारायणराव यांनी पुण्याला जायचं ठरवलं.
पुण्याला जाण्यापूर्वी  यशवंतराव पान ठेले वाल्याकडे काही बातमी समजते का म्हणून पोहोचले. बरोबर इंस्पेक्टर साहेब होतेच.
सारेजण ठेल्याजवळ येताच पान वाला थोडा दचकला.इंस्पेक्टर साहेबांना नमस्कार करून तो म्हणाला.
" तुझ्याकडे मोहन नावाचा कोणी नोकर होता ? " इंस्पेक्टर साहेबांनी विचारलं.
" हां हां होता.तसा नोकरीला नव्हता.माझी कामं करायचा नि त्याबद्दल मी त्याला पैसे ही देत होतो" पान वाला म्हणाला.
" कुठे काम करत होता तो?" साहेबांचा दुसरा प्रश्न.
" पुण्याजवळ चिंचवड ला.कुठल्यातरी फॅक्टरीत मला नोकरी मिळाली असं सांगून तो गेला."
" किती दिवस होता तुझ्याकडे?"
" असेल एक दोन महिने"
या सगळ्यावरून एक समजून आलं की चंदा ने सांगितल्या प्रमाणे खरोखरच मोहन तिला घेऊन पुण्याला गेला होता.
पुढचा तपास करण्यासाठी मग इंस्पेक्टर साहेब,दोन  हवालदारसह नारायणरावला घेऊन पुण्याला आले.नारायणराव ने सांगितल्याप्रमाणे सगळे जण खाजगी पोषाखात त्याच बिल्डिंगपाशी आले.नारायणराव सर्वांना घेऊन वर आले.तीच वयस्कर बाई ऐका सोफ्यावर बसली होती.
 नारायणरावाने शंभराच्या काही नोटा तिच्या पुढ्यात ठेवल्या .हसत हसत तिने सर्वांकडे पाहिलं नि आत उठून गेली.पाच मिनिटातच दहा बारा पोरी समोर येऊन उभ्या राहिल्या. इंस्पेक्टर साहेबांनी नारायणरावला खुणेने विचारलं पण त्यात चंदा नव्हती म्हणून नारायणरावाने खुणेनंच नकारार्थी मान हलवली.
" यातली नको,अजून पोरी दाखवा ".इंस्पेक्टर साहेबांनी बाईला म्हटले.
" इतक्याच आहे.होत्या त्या सर्व समोरच आहे." बाई म्हणाली.
आणि मग इंस्पेक्टर साहेबांनी तिला आपलं ओळख कार्ड दाखवलं.आणि सर्व खोल्या पहायला सुरुवात केली.तेव्हा एका खोलीत चंदा ला लपवून ठेवलेली दिसली.नारायणरावला बाईनी ओळखलं होतं. गेल्या खेपेला त्यानं चंदा ला खोलीत नेलं होतं नि आता पुन्हा तोच दुसऱ्या लोकांना घेऊन इथं आला म्हणजे काहीतरी भानगड आहे.असा संशय बाईला आला होता.बाई वस्ताद होती.धंद्यातले डावपेच तिला पूर्ण माहीत होते.
थरथर कापत चंदा समोर उभी होती.इंस्पेक्टर साहेब तिला म्हणाले.
" घाबरू नकोस,मी तुला सोडवण्यासाठीच इथे आलो आहे."
तिला मोहनबद्दल विचारल्यावर ती म्हणाली.
" त्यानेच मला इथं आणलं,केव्हातरी भेटायला येतो.लग्न करायला टाळाटाळ करतोय".
" हो आहे ना.थांबा आणून देते." असं म्हणत ती आत गेली.
मोहन ने स्वतःचा पत्ता दिलेला होता .तिथे तो भेटणार नाही.हे इंस्पेक्टर साहेबांनी ओळखले होते आणि त्याचा खरा पत्ता ही बाई देऊ शकते.म्हणून त्याने तिला पोलिसांचा हात दाखवला.बाई पोपटासारखी बोलू लागली.तिने पुढे हे ही सांगितलं की तो फॅक्टरी मध्ये नोकरी करत नसून रेल्वे स्टेशनवर हमाली करत असल्याचे कळले.
तेवढ्यात चंदा ने मोहन चा फोटो आणून दिला.
इंस्पेक्टर साहेब दोन्ही हवालदार सोबत रेल्वे स्टेशनवर गेले.हमाली करणारा हमाल,भेटणार कुठे?सगळ्या ठिकाणी पाहण्याचं ठरवलं.तेवढ्यात कुठलीतरी पॅसेंजर गाडी आवाज करीत स्टेशनात शिरत होती.हमालाची धावपळ चालली.गाडी थांबली.हमाल डब्याकडे धावत सुटले.सगळी एकच गडबड.
" साहेब समोरची ढकलगाडी घेऊन येतोय ना तो, तोच मोहन आहे असं वाटतंय "एका हवालदाराने साहेबांना खुणावलं .पुढचं ऐकायला इंस्पेक्टर साहेब तिथे थांबले नाहीत.मोहन ला हटकत ते विचारत होते.
" तू रेल्वेचा हमाल दिसत नाही! ड्रेस कुठेय तुझा?"
" ड्रेस नाही साहेब,पोटासाठी हमाली करतो."
" इथे कधीपासून आहे?"
" चार महिने झाले."
"तुझं नाव?"
तो गप्पच होता.मग दोन्ही बाजूने पोलिसांनी त्याला धरलं.तो घाबरला.सगळं अनपेक्षित होतं.
" मोहन आहे ना तुझं नाव?" साहेबांनी दरडावून विचारलं.
अशा रीतीने  मोहन पोलिसांना सापडला.मोहनला घेऊन सगळेजण पुन्हा बाईच्या माडी कडे आले.
"आण तुझ्या सगळ्या पोरींना समोर"साहेब करड्या आवाजात ओरडले.
समोर मोहन दिसताच चंदा परत घाबरली.
" हाच तो माणूस आहे ना,तुला इथे आणणारा?"साहेब तिला विचारत होते.
ती एकदा वर,एकदा खाली घाबरून पाहत होती.
" बोल लवकर"
"हो! यांनच मला फसवलं."चंदा धीर करून म्हणाली.
चंदा बरोबर च्या दोन मुलीही सांगत होत्या.ह्यानेच चंदा ला इथे आणलं.मावशी जवळ दिलं. जाताना मावशीबाई ला म्हणाला होता.
" मी तिला लग्न करतो म्हणून बोललो आहे.तिची तीच समजूत असू द्या."
" पोरगी अज्ञान आहे.तिच्यावर सक्ती करून इथं आणणारा तू नि तिला विकत घेऊन धंद्याला लावणाऱ्या ह्या बाई...तुम्ही दोघेही गुन्हेगार आहे.मी तुम्हा दोघांना अटक करतोय."
साहेबांचं हे ऐकून बाई पळून जाण्यासाठी दाराकडे धावली पण दारातच पोलीस उभे होते.तिची वाट बंद होती.
अखेरीस चंदा आपल्या घरी परतली. तिचा यात काही दोष नसला तरी ती सर्वस्व गमावून बसली होती.याला जवाबदार मोहन नि मावशीबाई असल्यानं त्यांना तुरुंगाची वाट धरावी लागली.

समाप्त
उज्ज्वल कोठारकर
वर्धा.