भरलेले डोळे माझे
साद घालती तुला
एकदा तरी ये ना बाबा
भेट द्यायला मला
साद घालती तुला
एकदा तरी ये ना बाबा
भेट द्यायला मला
आवाज तुझा ऐकण्याची
ओढ खूप लागली
तुला हाक मारण्याची
इच्छा मनी जागली
ओढ खूप लागली
तुला हाक मारण्याची
इच्छा मनी जागली
डोक्यावरती हात तुझा
वाटे मला हवाहवा
जीवनप्रवाह आज माझा
सुकून गेला तुझ्याविना
वाटे मला हवाहवा
जीवनप्रवाह आज माझा
सुकून गेला तुझ्याविना
भरलेले डोळे माझे ......
गर्दीत हरवू नये म्हणून
हात धरायचास तु माझा
आज स्वत:हाच हरवून
कोणत्या गर्दीत घुसलास
हात धरायचास तु माझा
आज स्वत:हाच हरवून
कोणत्या गर्दीत घुसलास
भरलेले डोळे माझे
साद घालती तुला...........
साद घालती तुला...........
पाटाचा झोपाळा करून
द्यायचा तु मला
अन बोट पुढे करून
दाखवायचा तु मार्ग
पण आज स्वत:हा मात्र
कोणत्या मार्गावर तू गेलास
आतापर्यंत शोधूनही
न पुन्हा सापडलास
द्यायचा तु मला
अन बोट पुढे करून
दाखवायचा तु मार्ग
पण आज स्वत:हा मात्र
कोणत्या मार्गावर तू गेलास
आतापर्यंत शोधूनही
न पुन्हा सापडलास
भरलेले डोळे माझे
साद घालती तुला
एकदा तरी ये ना बाबा
भेट द्यायला मला
साद घालती तुला
एकदा तरी ये ना बाबा
भेट द्यायला मला
©®Prajakta kalpana raghunath panari
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा