Login

साथ दे तु मला (पुनर्विवाह)

साथ दे तु मला (पुनर्विवाह)

नमस्कार वाचकांनो मी सोनाली पंकज शेजाळे.... चुकीला माफी नाही,अविश्वास त्याचा,माझे कुटुंब माझा श्वास ह्या माझ्या कथांना तुम्ही जसा भरभरून प्रेम दिल म्हणुन पुन्हा एकदा मी घेऊन आलेली आहे प्रेमाची कथा मालिका....मला खात्री आहे की तुम्हाला जशा माझ्या इतर कथा आवडल्या तशी ही सुद्धा कथा आवडेल....तर चला मग सुरू करूया माझ्या कथेला)
------------------------------------------------------------

नीलिमा  (अक्षय ची आई): आहो ऐकलं का ...आज पण अक्षय काही न खाताच गेला ऑफिस ला...

रामचंद्र (अक्षयचे वडील) : हम्म....(पेपर मध्ये डोकं घालुन म्हणाले...त्यांच्या अशा वागण्याने निलिमाला राग येतो)

नीलिमा : (रागात) तुम्ही माझं बोलणं कधी मनावर घेणार....तो घरात काहीच खातपित नाही....कुणाला माहीत हा ऑफिस मध्ये तरी काही खातो का नाही

रामचंद्र : (पेपर मध्ये बघत) तो ऑफिस मध्ये वेळेवर सगळं खातो...तू काळजी नको करुस....

नीलिमा ; तुम्ही नेहमी नेहमीं मला हेच का उत्तर देतात....तुम्हाला कळत कस नाही...अश्याने त्याची तब्येत अजुन बिघडेल(चिडचिड करत)

रामचंद्र शेवटी पेपर बाजूला ठेवतात....आणि निलिमाकडे बघतात.....ये इकडे....बस.....अग ये म्हणतोय ना मी तुला....बस माझ्या बाजूला..…..(निलिमाचा हात धरून त्यांच्या बाजुला बसवतात.....तिला असा अस्वस्थ बघुन तिच्या काळजीच कारण त्यांना कळत तरी सुद्धा तिच्या तोंडातुन त्यांना ऐकायचं असत.....बोल काय झालं....का तू नेहमी अशी बोलतेस.....तुला काय वाटतं मला अक्षय ची काळजी नाही का.....अग नीलिमा आपला मुलगा आहे तो.....मी बाप आहे त्याचा ....समजत मला सगळं....पण तूच मला  सांग काय करू मी....आता....मी असा हा हताश झालेलो आहे....

नीलिमा (काळजीने) : मला माफ करा....मी जशी आई आहे तर मला असं वाटलं तुम्हाला का माझं दुःख समजत नाहीये....आता तुम्हीच बघा...जेव्हा पासुन सोनिया त्याला सोडुन गेली तेव्हा पासुन हा असा वागतोय....त्या दिवशी डॉक्टर जोशी पण आपल्याला बोले....की अक्षय ला हहा दुःखातून लवकर बाहेर काढा नाहीतर खुप मुश्कील होईल आपल्या सगळ्यांसाठी.... आता तुम्हीच सांगा मला कस वाटल असेल हे सगळं ऐकुन.... माझा ....नाही आपला मुलगा एवढा त्रासात आहे .....मला त्याच्या प्रत्येक मिनिटाला काळजी वाटते.....मन माझं खुप अस्वस्थ होत ओ....

रामचंद्र : (उठुन थोडे पुढे चालतात....आणि भिंतीवर लावलेल्या हसऱ्या सोनियाच्या फोटोला बघतात....हळुच त्यांच्या डोळ्यातुन पाणी येत..)...काय करू मी .....तुझी जी अबस्था आहे तीच अवस्था माझी सुद्धा आहे....किती वेळा त्याला समजावलं.....तरी सुद्धा तो ह्यातुन बाहेर येत नाही....काय जादु होती ह्या मुलीच्या हातात देव जाणे....काय ग मुली....एवढी कसली ग तुला आम्हाला सगळ्यांना सोडुन जाण्याची घाई.....आमचा नाही तर निदान परी आणि अक्षयचा तरी विचार करायचा ना....(रामचंद्र तसेच डोळ्यांवरील चष्मा काढुन डोळे पुसतात)

नलिमा ला त्यांना अस बघुन खूप वाईट वाटत....ती त्यांच्या जवळ येते.....नका ओ अस नका रडु.... तुम्ही असे वागलात तर कस होईल.....(तेवढ्यात आतल्या खोलीतुन बाळाचा रडण्याचा आवाज येतो)

चंद्रकांत : बघ आत जाऊन... परी उठकी वाटत..

नीलिमा डोळे पुसतंच आत निघुन जाते ...आणि थोड्या वेळातच त्यांच्या नातीला म्हणजे सहा महिन्यांच्या परीला बाहेर घेऊन येतात..... हे बघा कोण आलं....कोणीतरी परीची वाट बघत बसलं आहे....

चंद्रकांत : अरे वा....माझं बाळ उठलं... अरे वा वा वा वा....या चला....आजोबांन कडे या बघु ....(परीला हातात घेतच बोलतात)अरे वा... पिलू आज जरा लवकरच उठलीना ही....

नीलिमा :हो ना आज-काल नेहमी ह्या वेळेवर उठते ( हसत म्हणाली)

चंद्रकांत  : काही हरकत नाही मी ही ला घेऊन देवळात जातो तोपर्यंत तू हिच्या जेवणाचं काहीतरी बनवून ठेव ... चला आम्ही निघतो

चंद्रकांत आणि त्यांची नात दोघेही मंदिरात जाण्यासाठी निघतात त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघून नीलिमा परत विचारात गुंतून जाते ती मनातच म्हणते( अक्षय आमचा नको रे निदान या बाळाचा तरी विचार कर आणि त्या तशाच किचनमध्ये निघून जातात)

--------------------------------------------------------------

इथे अक्षय त्याच्या ऑफिस मध्ये येतो थोड्यावेळ तो असाच खुर्ची वरती टेकून डोळे बंद करून बसलेला असतो तेवढ्यात दारावरती कोणीतरी नोक करत

मी येऊ का आत मध्ये

अक्षय काहीच उत्तर देत नाही दरवाज्याच्या इथे उभी असलेली व्यक्ती त्याच्या परमिशन ची वाट न बघता सरळ आत मध्ये निघून येते

अक्षय ... अक्षय हे बघ मी काही फाईल्स आणले आहेत त्या नीट बघून घे कदाचित दोन दिवसांनी आपल्याला पुण्याला जावे लागेल मी लीली ला सांगितला आहे तसं ती आपल्या दोघांचे शेड्युल लिहून देईल ....आणि हो उद्या मी पुण्यालाआपल्याला जे मुलं होता खाली कामाला हवी होती त्यांचा इंटरव्ह्यू सुद्धा उद्याच आहे ....त्या इंरव्ह्यू ला तुला असणं गरजेचं आहे....( ती व्यक्ती तशीच फाईल ठेवून निघणार तेवढ्यात अक्षय त्या व्यक्तीला आवाज देतो)

अक्षय : आशुतोष थांब एम सॉरी यार( थोडा नाराज होतच बोलतो)

आशुतोष अक्षय चा चेयर जवळ जातच बोलतो  : काय यार तू पण ना ह्यात सॉरी वगैरे काय रे मला नाही काही वाईट वाटलं..... तू पण ना पहिलं ....सांग तू घरून काही खाऊन आलास का ...??? सोड मी पण काही प्रश्न विचारतोय मला माहित आहे तू आज पण काहीच खाऊन आला नसशील हे बघ मित्रा वहिनी ला जाऊन सहा महिने होत आलेत तू अजून किती दिवस असा वागणार आहेस तू स्वतःचा नको निदान आई-वडिलांचा आणि तुझ्या परि चा  तरी विचार कर

( अक्षय चं आशुतोष च्या बोलण्याकडे काहीच लक्ष नसतं.... तो तसाच शांत बसून असतो आशुतोष च्या हे सगळ लक्षात येत तो केबिनमधून सेक्रेटरीला अक्षय साठी पोहे आणायला लावतो.....)

थोड्याच वेळात केबिन मध्ये पोहे येतात आशुतोष बळजबरीने अक्षयला ते पोहे खाऊ घालतो आणि तो निघायला लागतो

आशुतोष गेल्यानंतर अक्षय त्याच्या टेबलवर असलेल्या सोनियाचा फोटो कडे बघतो नकळत तिच्या आठवणी मुळे त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावतात

कोण आहे हा अक्षय ....???असं काय घडलं त्याच्या आयुष्यामध्ये त्यामुळे तो पूर्णपणे शांत झाला..... चला तर मग जाणून घेऊया अक्षय बद्दल

अक्षय ...अक्षय चंद्रकांत पटवर्धन( चंद्रकांत आणि निलीमाचा एकुलता एक मुलगा) नामवंत फार्मसी कंपनीतील डायरेक्टर.... त्यांची स्वतःची नेचुरल ग्रो फार्मसी होती .....त्यात ते लहान मुलांचे बेबी फुड बनवायचे ....अक्षय ची कंपनी एवढी नामवंत आणि गाजलेली होती की ती फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा प्रसिद्ध होती.... कमीत कमी दहा देशांमध्ये त्याची कंपनी होती..... अक्षयने त्याची दहावी..... पूर्ण केल्यानंतर त्याच्या पुढील मेडिकल शिक्षणासाठी त्याने दिल्ली हे शहर निवडल..... त्याने तिथे  b pharma +MBA(pharma tech ) च शिक्षण पूर्ण केलं ....अक्षय हा मुळचा पुण्याचा ...तो लहानाचा मोठा पुण्यालाच झाला कारण फार्मसी ही त्याच्या वडिलांकडून त्याला मिळालेली जबाबदारी होती... त्याचे वडील सुद्धा फार्मसीमध्ये होते ....अक्षयला त्याची कंपनी उभी करण्यासाठी त्याच्या वडिलांनीच मदत केलेली.... अक्षयने त्याचं मेडिकल दिल्लीला पूर्ण केल्यानंतर त्याने पुढील शिक्षण हे बाहेर गावी म्हणजे फ्रान्सला केलं फ्रान्सला तो कमीत कमी पाच वर्ष राहून पुन्हा आपल्या शहराकडे वळाला..... नंतर पुण्यालाच राहून त्याने वडिलांच्या हाताखाली काम करून फार्मसी कंपनी मध्ये काम केलं आणि त्यातच त्याची आवड निर्माण होऊन तो खूप पुढे गेला....पण कालांतराने त्याची प्रगती जशी जशी होत गेली तसा तो त्याच्या परिवारासह मुंबई ला शिफ्ट झाला )

(पण असं काय घडलं त्याच्या आयुष्यत की तोपूर्णपणे शांत झाला......चला तर पाहूया पुढील भागात
(कथा आवडल्यास नक्की कमेंट करा......धन्यवाद.....)






🎭 Series Post

View all