साथ दे तु मला(पुनर्विवाह भाग 6 अंतिम)

साथ दे तु मला(पुनर्विवाह भाग 6 अंतिम)

थोड्याच वेळात मीरा अक्षयच्या केबिन मध्ये येते.....

मीरा :(शांतपणे) सर तुम्ही मला बोलावलं....

अक्षय : बस ....मीरा आय एम सॉरी...मगाशी महेश  जे बोला ते सगळं ....आय मिन एम रिअली सॉरी.....

मीरा : इट्स ओके सर.....

अक्षय : मीरा लाईफ मध्ये असे खुप प्रॉब्लेम येतील त्याला फेस करायला तयार रहा तू....

मीरा : पण सर....एक विचारू....तो जे बोला ते पटलं तुम्हाला....

अक्षय : म्हणजे.....

मीरा : माझं प्रेम आहे तुमच्यावर .....

अक्षय : ते शक्य नाही मीरा .....(रागात)

मीरा : रागावून फायदा नाही.....मला माहितीये....तुमचं पण माझ्यावर प्रेम आहे.....

अक्षय : कोण बोल तुला ....???

मीरा : कोणी बोलायला कशाला पाहिजे....माझं खरच प्रेम आहे तुमच्यावर आणि तुमचं सुद्धा.....

अक्षय : हे सगळं खोटं आहे......

मीरा अक्षयच्या जवळ जात....हे बघा सर....तुम्हाला। काय चिंता आहे हे समजतंय मला ...मला आपल्या ह्या नात्याला काहीच हरकत नाहीये....मी परिसकट तुम्हला स्वीकारते.... फक्त साथ हवी तुमची मला....फक्त साथ द्या तुम्ही मला.....

अक्षय : मी एकाच मुलीवर प्रेम केलं आहे......मला परत प्रेम होणं शक्य नाही......माझ्या मनात फक्त सोनिया आहे....आणि दुसरं कोणीच नाही....


सोनियाच नाव घेतल्यावर मिराच हृदय धडधडू लागत......ती तशीच खाली कोसळते......तिच्या बाजूला असलेला टेबल तिला लागतो.....त्यामूळे अक्षयला तिच्या हालचालींची जाणीव होते......अक्षय पळतच तिच्या जवळ येतो....मिराच्या डोक्यातुन  रक्त येत...अक्षय घाबरतो....

अक्षय : मीरा ....मीरा उठ....मीरा ....लिसन टू मी.....मीरा....हे बघ.....यार शीट...... तो बाजूलाच असलेल्या पाण्याच्या ग्लासतील पाण्याने  तिच्या चेहऱ्यावर हबका मारतो......तरी मीरा उठायला तयार नाही.....तो तसाच गडबडीने मिराला त्याच्या दोन्ही हातात उचलुन घेतो आणि सरळ हॉस्पिटलमध्ये निघतो....सगळा स्टाफ त्या दोघांना बघत असतो....कुणाची पर्वा न करता वेड्या प्रेमासारखा तो मिराला घेऊन निघाला

अक्षय : डॉक्टर.... मीरा इज फाईन.....आय मिन शी इस ऑलराईड

डॉक्टर : तुम्ही कोण त्यांचे.....

अक्षय ला काय नात सांगावं काहीच कळत नाही....मीरा माझ्या कंपनीमध्ये काम करते.....

डॉक्टर : ठिके तुम्ही त्यांच्या घरच्यांना बोलवा....कारण मला त्यांच्या मध्ये काही तरी कॉम्प्लेकेशन वाटताते....

अक्षय : (काळजीत) म्हंजे...के झालं मिराला....

डॉक्टर: त्यांचा बीपी....लो आहे....सध्या....कदाचित त्यांच्यावर कोणती तरी शस्त्रक्रिया झालेली आहे आधी.....त्यांच्या हार्ट च्या साईड ला स्टीचेस आहे.......

अक्षय हे सगळं ऐकून जागीच बसतो.....सर्जरी..... आणि मिराची.... मला काही बोली नाही ती.....कधी हे सगळं.....

डॉक्टर : तुम्ही लवकरात लवकर त्यांच्या घरच्यांकडून त्यांची माहिती घ्या मी येतो....

तेवढ्यात आशुतोष हॉस्पिटलमध्ये येतो....

आशुतोष : अक्षय.....मीरा कुठे.....

अक्षय काहीच उत्तर देत नाही


आशुतोष : मी काय विचारतोय तुला अरे मीरा कुठे....?(त्याच्या दोन्ही दंडाला धरून आशु अक्षयला हलवतो...तेव्हा कुठे तो भानावर येतो)

अक्षय  मित्राच्या गळ्यात पडुन लहान मुलासारखा रडतो....त्याच अस रडणं बघुन आशुतोष ला सुद्धा वाईट वाटत.....

अक्षय : अरे हे डॉक्टर म्हणतायत....मिराची कोणती तरी  सर्जरी झालीये.....तिची तब्येत थोडी नाजूक आहे...पण मला नाही कधी तिने हे सगळं सांगितलं.....

आशुतोष : अरे नसेल तिला काही सांगावस वाटलं....आणि आपल्याला तिने कधी जाणवुन पण नाही दिल......हे बघ तू आधी शांत हो.....मी येतो डॉक्टर बरोबर बोलुन.... आणि तिच्या घरच्यांना कळवलं का....

अक्षय : हो मी आपल्या ऑफीस मधुन तिचा नंबर घेतला....आज कळवलं सुद्धा.....

आशुतोष : ठिके तू बस इथे......मी आलोच

थोड्याच वेळात मिराचे घरचे येतात.....ते सगळे डॉकटरांच्या केबिनमध्ये जातात

डॉकटर : मिराची ह्या आधी कोणती सर्जरी झालीये का.....


मिराची आई : हो ...दीड वर्षा आधी तिच्या हृदयाची हार्ट ट्रान्सप्लांट झालाय.....त्याच्यामुळे तिला घाबरून चक्कर येते.....

हे सगळं ऐकून अक्षय ला वाईट वाटतं तो तसाच बाहेर निघुन जातो.....

डॉक्टर : नक्की काय झालेलं....तिच्या बरोबर...?

मिराचे वडील :  तीच एकसिडेंट झालेलं....एका गाडी बरोबर.... त्यामध्ये आमची मीरा आणि समोरील गाडी मधील व्यक्ती....दोघांना गंभीर दुखापत झालेली....माझ्या मिराच्या जगण्याचे खुप कमी चान्स होते...डॉक्टरांनी सांगितले...हिच्या हार्ट मध्ये होल आहे आणि तिचा अर्जंट ऑपरेशन करावं लागेल...कोणी तिला हार्ट ट्रान्सप्लांट करून देताय का बघा....

तसा मिराला आधी श्वास घ्यायला त्रास व्हायचा पण आम्ही कधी लक्ष नाही दिल.....नंतर जेव्हा हे असं घडलं तेव्हा कळल.....हा सगळा प्रकार....त्यावेळेस ज्या व्यक्तीच्या गाडीला आमच्या मिराची गाडी ठोकली त्या व्यक्तीने आम्हला म्हणजे आमच्या मिराला जीवनदान दिले....ती व्यक्ती तर गेली कायमची निघुन पण मिराला तीच हृदय देऊन गेली

मिराच्या वडिलांची सगळी गोष्ट आशुतोष ऐकत होता...

आशुतोष : एक एक मिनिट...मला सांगा.....हा मिराचा एकसिडेंट कुठे झालेला.....

मिराची आई : ठाकुर रोड वर..  ती कुठल्यातरी मैत्रिणी ला भेटायला चालली....आणि समोरच्या व्यक्तीच्या गाडीचा ब्रेक फेल झाला....आणि मिराच्या गाडीला येऊन ती गाडी ठोकली...

आशुतोष तडक उठून बाहेर जातो....तो काहीतरी विचार करतो.....आणि अक्षय कडे जातो....

आशुतोष : अक्षय मला एक सांग....सोनिया वाहिनी च एकसिडेंट ठाकुर रोड लाच झालेलं.... ना......

अक्षय : त्याचा  काय इथे संबंध....??

आशुतोष मगाशी मिराचे आई वडील जे बोले ते सगळं सांगतो...तसा तो पळत मिराच्या आई वडिलांनाकडे जातो...

मिराचे आई वडील डॉक्टरांच्या केबीन बाहेर बसलेले असतात.....

अक्षय : मगाशी तुम्ही डॉकटरांना काय सांगितलं....

मिराचे वडील मिराबरोबर झालेली सगळी हकीगत सांगतात....अक्षयला एक एक गोष्ट.....त्याच्या मनाला चिरून जात होती....डोळ्यातुन झरझर पाणी वाहत होत.....

मिराचे वडील: पण तुम्ही मला हे सगळं का विचारतायत...??

अक्षय : मिराला दुसरं कुणाचं नाही तर माझ्या सोनियाच हृदय दिलेलं आहे....

आई : म्हणजे.....(तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये परीला घेऊन अक्षयचे आई वडील येतात)

अक्षय : आमच्या परीला म्हणजे माझ्या मुलीला ह्या जगात येऊन 1 महिना होत आलेला...... सोनियची अशी इच्छा होती की परीचा दर महिन्याला आपण सगळ्यांनी तिचा वाढदिवस करायचा ...परी ला एक महिना व्हायला दोन दिवस बाकी होते....मी कामा निमित्ताने बाहेर गेलेलो...मी दोन दिवसांनी येणार होतो....त्यामुळे परीच्या वाढदिवसाची सगळी तयारी सोनिया वर पडली.....ती तिच्या शॉपिंग साठीच कार घेऊन बाहेर पडली ....आणि नंतर ठाकुर रोड ला तिच्या गाडीचा ब्रेक फेल होऊन तिचा एकसिडेंट झाला...मला ही सगळी गोष्ट माझ्या आईवडिलांकडुन कळाली...... मी बाहेर असल्यामुळे काहीच करू शकत नव्हतो.......

आता जो काही डीसीजन व्हायचं होता तो फक्त माझ्या आईवडिलांच्या हातात होता....कारण माझ्या येण्याचा सगळा मार्ग आता बंद झालेला.... फ्लाईट सगळ्या फुल होत्या

माझी इकडे सोनियाला भेटण्याची धडपड सुरू होती....आणि सोनियची मृत्यूशी झुंज सुरू होती....
थोड्यावेळाने डॉकटराणी सांगितलं की आम्ही तिला नाही वाचवू शकणार...तिच्या डोक्याला जबर मार लागलाय...काही तासच तिच्या जवळ आहेत....माझ्या वडिलांनी मला फोनकरून सगळी हकीगत सांगितली...मी त्यांना सांगितलं कीं आपण सोनियाचे अवयव दान करू ....मला बाबा म्हणाले होते ज्या गाडीबरोबर सोनियाच एकसिडेंट झालं आहे तिला हृदयाची गरज आहे....मी तोच विचार केला....आणि सोनीयाचा तो भाग दान केला..पण मला माहित नव्हतं की ही तीच मुलगी आहे.....

अक्षयचे बाबा : जे झालं ते झालं....आपल्याला एक मुलगी आधीच सोडुन गेलीये....अरे ज्या मुलींमध्ये सोनियाच हृदय आहे ते अजून पण तुझ्यासाठी वाजतय.... ती मुलगी आपली सोनियाच आहे रे....मग कसली वाट बघतोयस....जा वाचावं तिला...

आशुतोष : अक्षय बाबा बरोबर बोलतायत....जा तिला वाचलं...तिला गरज आहे तुझी....ती फक्त तुझ्या एका हाकेसाठी तिथे मरण्याच्या दारात जगण्यासाठी लढत आहे.....निदान आता तरी तू तिला तुझ्या मनातलं बोल....

अक्षय तसाच पळत मिराच्या वोर्ड मध्ये जातो....

मीरा शांत पने झोपलेली असते....अक्षय तसाच बाजूला बसुन तिचा हात त्याच्या हातात घेतो....

अक्षय : मीरा....हे बघ मी आलो....तुझा अक्षय आला आहे तुझी साथ मागायला....उठ ....उठणा(रडत)तू मला असं एकटं परत सोडुन नाही जाऊ शकत....माझ्यासाठी नाही तर निदान आपल्या परिसाठी तरी उठ....(तिच्या डोक्यावरून हात फिरवतो)
तो हळूच तिच्यासाठी गातो.....


पाहिले स्वप्न जे साजरे व्हायला
चांदणे उमलले चंद्रही उगवला
जागण्या रात दे साथ दे तू मला…
हात हातात दे साथ दे तू मला…

स्पर्श नात्यातले दरवळू लागता
मोहरू दे मला पांघरू दे तूला
भान हे हरपू दे साथ दे तू मला…
हात हातात दे साथ दे तू मला

तो परत तिच्या जवळ बसतो आणि त्याच डोक तो खाली तिच्या हाताजवळ टेकवतो....तिकडे उभे असलेले सगळे त्याची अवस्था बघुन रडतात....

मीरा मधेच मोठा श्वास घेते.....अक्षय...........

अक्षय त्याची मान वर करतो

मीरा : अक्षय ......

अक्षय : डॉकटर ......आशु कॉल द डॉकटर.....फास्ट.....कॉ द डॉक्टर...... मीरा हे बघ मी अक्षय तुझा अक्षय.... उठ ना ....प्लिज....

मीरा हळुच तिचे डोळे उघडते.....अक्षयला तिच्या जवळ बघुन तिच्या डोळ्याच्या कडा ओलावतात...... ती हळूच त्याला आपल्या जवळ येण्यासाठी इशारा करते....तो तसाच तिच्या जवळ जाऊन तिच्या कुशीत जोरजोरात रडतो.....

अक्षय : तू परत मला अशी सोडुन जाणार होतीस....

मीरा : नाहीतर ....मी कशाला कुठे जाऊ.....

अक्षय तिच्याओठांवरती बोट ठेवतो....तू काहीच बोलू नकोस

डॉकटर मिराला येऊन तपासुन जातात...ती आता डेंजर झोनमधुन बाहेर असल्याचं सांगतात ...सगळे खुश होतात....काही दिवसानंतर मिराला डिस्चार्ज दिला जातो.....मीरा सुद्धा हळूहळू रिकव्हर होत होती....सगळे अगदी नीट तिची काळजी करत ....अक्षय काम आवरून मिरावर लक्ष द्यायचा.....तो तिला कधीच एकटा सोडत नव्हता....चार महिनानंतर अक्षय स्वतः मिराला तिच्या घरच्यांसमोर लग्नासाठी मागणी घालतो... मीरा सुद्धा जास्त आढेवेढे न घेता त्याला होकार देते...

दोघेही एकमेकांच्या संमतीने रजिस्टर लग्न करतात....परीसुद्धा खुप खुश असते.....तिला आज तिची आई मिळते....आणि मिराला तीच प्रेम.....दोघेही अगदी आनंदाने त्यांचा संसार करतात......

(कसा वाटला आजचा शेवटचा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट्स द्वारे)





















🎭 Series Post

View all