इकडे सगळे छान पैकी पार्टी चा आनंद घेत असतात....मीरा जेवढं होईल तेवढ अक्षय पासुन लांब रहाण्याचा प्रयत्न करत होती....
मिराच लक्ष नसताना अचानक वेटर कडुन तिच्या अंगावर कोल्ड्रिंक्स सांडते
वेटर (घाबरत) : सॉरी मॅडम.... माफ करा मला
मीरा : काही हरकत नाही....मला सांगा इकडे वोशरूम कुठे....
वेटर : सरळ जाऊन डावीकडे वळा.... तिकडेच आहे ....
मीरा : ठिके ...थंक्यु....
मीरा तिच्या कपड्यांवर सांडलेली कोल्ड्रिं धुवायला अक्षय च्या घरात जाते....तिथल्या वोश्रुम मध्ये तिचे कपडे स्वच्छ करून ती निघणारच तर तिला बाळाच्या रडण्याचा आवाज येतो....
मीरा तशीच त्या जागेवर थांबते....तीच मन त्या रडणाऱ्या बाळाकडे नकळत ओढल्या जात होतं....
बाळ खुपच जोरजोरात रडत होत ...आता न राहवुन ती समोरच्या रूमच्या दिशेने गेली....तिकडे अक्षयची आई परीला झोपवण्याचा प्रयत्न करत होती....पण काही केल्या आज परी मात्र काही झोपत नव्हती
मीरा : (काळजीने) काकु मी झोपवु का हिला...
अक्षय ची आई : अ... अग नको नको...तू नको काळजी करूस...झोपेल ती थोड्या वेळात....तुला काही हवं होतं का ?
मीरा : नाही ते कपड्यांवर कोल्ड्रिंक्स सांडली म्हणुन साफ करायला आलेले....तेवढ्यात हीचा आवाज माझ्या कानावर पडला आणि मी इथे आले.....
परी अजुन जोरजोरात रडते...काही केल्या आज ती थांबायला तयार नाही.....
अक्षय ची आई : काय झालं माझ्या बाळाला...आज का एवढी रडते ही....काहीच कळत नाही मला....नजर लागलीका हिला....(तेवढ्यात रामचंद्र राव येतात)
रामचंद्र : अग काय झालं हिला...ही का रडते आज एवढी....बाहेर परेनंतर रडण्याचा आवाज त्येतोय हिच्या....काय झालं....काही दुखत्याबक हिला
नीलिमा (आई) : आहो बघाना.... काहीच समजत नाहीये मला ...किती रडते ही आज....
मीरा : काकु ....मला देता का तिला ...काकु... मी बघते
नीलिमा रामचंदरांकडे बघते ते तिला डोळ्यांच्या इशाऱ्याने परीला दे म्हणुन सांगतात...तेवढ्यात.मागुन अक्षय आणि आशुतोष काळजीने येतात...
मीरा परीला घेते.....हे मेरा बच्चा....काय झालं माझ्या परीला....का रडते ही.....पोट दुखतंय का माझ्या बाळाचं.....मिराच बोलणं जस सुरू झालं तस बाळ शांत एकटक तिला बघत होत....अक्षय थोडा तोंड वाकड करतच निघणार तोच त्याचा कानावर गाण्याचे बोल ऐकू येतात
लोरी-लोरी-लोरी
चंदनिया छुप जाना रे
छण भर को लुक जाना रे
निंदिया आँखों में आये
बिटिया मेरी सो जाये
ले के गोद में सुलाऊँ
गाऊँ रात भर सुनाऊँ
मैं लोरी-लोरी...
अक्षय तसा तिला मागे वळुन बघतो....मीरा एक एक पाऊल त्याच्या जवळ जात होती.....आशुतोष सुद्धा थोडा वेळ सुन्न होत...हे गाणं सोनिया बाळाला झोपवताना बोलायची...तिचेच हे बोल होते.....
कर्धनिया छुम-छुम बाजे
पलकन में सपना साजे
धीमे-धीमे, हौले-हौले
पवन बसंती डोले
ले के गोद में सुलाऊँ
गाऊँ रात भर सुनाऊँ
मैं लोरी-लोरी...
बाळ शांत पणे झोपुन जात.....
मीरा बाळाला तशीच पाळण्यात झोपवते.....
अक्षय : तुला हे गाणं कस माहीत....(रागात)
मीरा : घाबरून ते मी कुठेतरी ऐकलं असावं.....
अक्षय : तुला हेच गाणं गायचं होत...(.रागात).....
मीरा : ते मी....
आशुतोष : ते सगळं सोडा ...परी झोपलीये...आपण बाहेर जाऊन बोलूया
सगळे बाहेर निघुन जातात....
अक्षय : आता बोल हे गाणं तू कुठे ऐकलेलं....
मीरा : ते वॉश रूम मध्ये कोणी तरी तिकडे ह्या गाण्याचे बोल लिहुन लावले आहे ते मी वाचले आणीत मग इकडे बोले
आशुतोष : काही हरकत नाही....अक्षय...सगळे जण तुझी वाट बघतायत तू त्यांना निरोप देण्यासाठी बाहेर जा.....मी बघतो इकडच
अक्षय रागाने निघुन जातो.....
मीरा रडत असते...अक्षयचे बाबा तिला समजावत असतात....
मीरा बेटा आम्हाला माफ कर......आमचा मुलगा असा नव्हता ग कधी ...ते त्याच्या आयुष्यतुन सोनिया....म्हणजे आमची सुन अशी अचानक। निघुन गेली...आणि हा स्वतःला दोषी समजतो बघ.....किती वेळ त्याला समाजवला....की ह्यातुन बाहेर ये ....पण तो काही ऐकायला तयार नाही बघ.....खरच आम्हाला माफ कर...पोरी
मीरा :अस नका बोलु... मी समजु शकते.....सरांवर आता काय वेळ आलीये ते.....पण थोडा वेळ द्या त्यांना ते नक्की सवरतील ह्यातून..... आणि आज जे काही घडलं त्याच मला काहीच वाईट नाही वाटलं.....आपल्या माणसाला आपण नाही समजुन घेणार तर कोण घेणार.....मी येते.....
आणि मीरा निघुन जाते....
नीलिमा : किती गुणी मुलगी आहे ही.....अशीच मुलगी आपल्या अक्षय ला मिळो देवा....
---------------------------------------
दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे सगळे ऑफिस ला पोहोचले.....
सगळे मिळून व्यवस्थित काम करत होते....मीरा सुद्धा सगळं काम मन लावुन करत होती......दिडमहिन्याच्या ट्रेनिंग नंतर तिने कुणालाच बोलण्याचा साधा चान्स सुद्धा दिला नव्हता.....तिच्या हसऱ्या खेळक्या स्वभावाने तिने सगळ्यांना आपलंसं केलं होतं.....शिवाय ती अक्षय ने दिलेले काम सुद्धा अगदी चोख पणे पुर्ण करीत.....अक्षय तिच्या कामाने खुश होता....मिराला जवळ जवळ दोन वर्ष झाले ह्या कामात...पुण्याची फार्मसी परीच्या नावाने उघडुन अक्षय खुप खुश होता त्या साठी मिरची दिवस रात्र एक केले होते आणि तब्बल एक वर्षाने ती फार्मसी उभी केली.....तिकडच सगळं काम मीरा एकटी हँडल करायची.....त्यात तिने निवडलेले....सगळे जण मन लावुन काम करायचे...मीरा अक्षय आणि आशुतोष नेहमी कामा निमित्ताने बाहेर असायचे.....ह्या सगळ्यात मिराच अक्षय वर कधी प्रेम जडलं हे तिलाच कळलं नाही....त्याचा सहवास तिला हवाहवासा वाटू लागला....त्याच्या नकळत ती त्याच्या मध्ये वाहत जाऊ लागली.....परंतु तो तिच्यापासून होईल तेवढी दुरी ठेवायचा....त्याला सुद्धा तिचा सहवास आवडू लागला...पण काय माहित तो का असा लांब रहायचा...त्याव्य मनात अजूनही सोनिया होती....त्याच्यावर परीची जबाबदारी होती...त्यामुळेच तो मोरपासून लांब रहायचा...मिराचा स्वभाव अक्षय च्या आई वडिलांना सुद्धा आवडू लागलेला.... नीलिमा ने तर कितीतरी वेळा अक्षयच्या बाबांजवळ मीरा बद्दल विषय सुद्धा काढलेला पण काय फायदा त्याचा करण त्यांना माहीत होत काही केलं तरी अक्षय ह्या नात्याला मानणार नव्हता
..मिरच्या कामामुळे बरीच जण तिच्यावर जळत सुद्धा होती....काही मुलांना तिची अशी प्रगती पाहवत नव्हती....तिने कितीतरी वेळा त्यांच्या चुका अक्षय सरांना सांगितल्यामुळे ते मुलं तिच्यावर राग धरून होती....त्या मुलांपैकी.... एक महेश होता.....तो नेहमी तिच्या जवळ जाऊन तिला त्रास कसा देता येईल ह्याच कामात जास्त वेळ घालवत.....पण ती नेहमी त्याला इग्नोर करी.....आशुतोष ला ह्या सगळया गोष्टींची खबर होती पण मिरच्या संगण्यावरूनच त्याला काही बोलू नये म्हणुन सांगे....असाच एकदा कंपनीच्या कामात त्याने बराच मोठा फ्रॉड केला.....त्याचीच आज मीटिंग होती
अक्षय : महेश तु हा जो पैशांचा घोटाळा केलाय तो तुला मेनी आहे का.....(रागात)
महेश एक नजर मिरावर टाकत....ह्यात माझा काही दोष नाही.....मला फसवल्या गेलं आहे.....
मीरा : तुझ्याकडे काही पुरावा.....
महेश : तू शांत बस....तुला कोणी अति शान पणा करायला लावला....
अक्षय : तू कुणाशी बोलतोय हे महितीयेका तुला(हाताची मूठ आवळत)
महेश : हो माहिते.....तुमच्याच गर्लफ्रेंड बरोबर बोलतोय मी....
अक्षय रागाने महेशला बघतो
महेश : काय मिस्टर अक्षय पाटील तुम्हाला काय वाटलं....आम्हाला काही कळत नाही....सगळं दिसत मला.....मलाच काय सगळ्या स्टाफ ला दिसतय....तुम्ही आणि ही मीरा काय गुलछडे उडवतायत ते
आशुतोष : (त्याची कॉलर धरत) काही पण काय बोलतोयस तू
महेश : आवो माझी कॉलर धरून काय होणारे....बाहेर जी चर्चा सुरू आहे ना ती आधी बंद करून दाखवा....मग तुंही जे बोलालं ते मी करेल
माही सुन्न मनाने सगळं काही ऐकत होती...तिचे डोळे पाण्याने भरलेले बघुन अक्षय ला राग येतो ....तो त्याच्या हाताची मूठ घट्ट करून महेश जवळ जाऊन त्याला जोरात एक कानाखाली मारतो....
अक्षय : आताच्या आता इकडुन निघुन जायचं....नाहीतर तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला मला वेळ नाही लागणार....
महेश पोलिसांचं नाव ऐकून शांतपणे निघुन जातो....माही सुद्धा काही न बोलता निघुन जाते....
अक्षय त्याच्या केबिनमध्ये खिडकीतून बाहेर बघत असतो
आशुतोष : आत येऊ अक्षय....
अक्षय : हम्मम....
दोघेही थोड्यावेळ काहीच बोलत नाही.....म्हणुन स्वतःहुन आशुतोष आधी बोलतो....
आशुतोष : काय विचार केलायस तू.....पुढचा???
अक्षय : म्हणजे.... तुला बोलायचं काये....
आशुतोष : हेच जे तुमच्या दोघांचं सुरू आहे ते....
अक्षय : म्हणजे आता तू पण आम्हला हे सगळं बोलणार(रागात)
आशुतोष : तस नाही अक्षय ....मला माहित आहे की तुझं मीरा वर प्रेम आहे ते.....
अक्षय : हे शक्य नाही.....वाटेल ते बडबडू नकोस....
आशुतोष : मी वाटेल ते बदबडतोय....मी....अरे डोळ्यात दिसत सगळं तुझ्या.....किती प्रेम करतोस ते तू तिच्यावर।....
अक्षय : तुझं डोकं फिरलय का....(रागात....त्याच्या जवळ जात)
आशुतोष : हे बघ जे मनात आहे ते बोलायला काय हरकत आहे....अरे विचार तिला एकदा
अक्षय : नाही ते शक्य.....(डोक्याला हात लावत चेर वर बसतो)
आशु त्याच्या जवळ जात त्याच्या खांद्यावर हात ठेवतो
काय अडचण आहे रे मित्रा....मी तुला आजच नाही ओळखते.....लहानपणापासून आपण एकमेकांना ओळखतो.... तुझ्या मनात असता सध्या के चालू आहे हे मी समजतो
पण माझं एवढंच सांगणं आहे की तू निदान एकदा तरी विचार तिला....नाही तर खुप उशीर नको व्हायला.....
आता मात्र अक्षय चा बांध फुटतो....तो त्याच्या मित्राच्या गळ्यात पडुन रडतो
अक्षय : माझं प्रेम आहे का नाही हे मला नाही माहीत ...पण का माहीत मी नकळत तिच्या जवळ ओढल्या जातो....अस वाटत मला कोणी तरी बोलावतय.....तिच्या पासुन लांब गेलो तर अस्वस्थ होत मला....अस वाटत आता परत माझ्या आयुष्यात काहीतरी परत घडणारे.....
आशुतोष : तू असा का विचार करतोस.....एकदा जे घडलं ते परत थोडी घडणार....यार.... मला असं वाटत तू एकदा तुझ्या मुलीचा विचार कर.....
अक्षय : तू मला सांग मी एका मुलीचा बाप आहे.....ती कशी तयार होईल माझ्या शी लग्न करायला......
आशुतोष : सगळेच जण स्वतःचा फायदा नाही बघत रे.....तू एकदा तिला विचार तरी.....मला असं वाटत की ती पण तुझ्यावर प्रेम करते....
अक्षय : जाऊदे हा विषय नको आता....उद्या आपल्याला पुण्याला जायचं आहे आपल्या तिघांचा तिकीट बुक कर
आशुतोष : तू विषय का बद्दलतोयस
अक्षय : नको यार हा विषय.....उद्याच बघ....
आशुतोष : एक काम कर तू आणि मीरा दोघेच उद्या जा....मला आईला घेऊन डॉक्टर कडे जायचं आहे.....सो मी नाही येऊ शकत.....आणि उदयच्या फ्लाईट्स सगक्या फुल आहे ....तर मी तुमच्या दोघांसाठी कार बुक करतो....सकाळी सात वाजता निघा तुम्ही
अक्षय : मिराला तस कळव तू...
आशुतोष : तिला माहिते आधीच हे सगळं.....मी येतो...
आशुतोष दरवाजापाशी जातो तेवढ्यात अक्षय त्याला आवाज देतो......
अक्षय : आशु...
आशुतोष : मला माहित आहे तू काय बोलणारेस....मी मिराला पाठवतो आत....
(काय मग वाचकांनो कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कमेंट द्वारे)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा