Login

साथ दे तु मला (पुनर्विवाह भाग 4)

साथ दे तु मला (पुनर्विवाह भाग 4)

थोड्यावेळ अक्षय तसाच अस्वस्थ होऊन त्याच्या चेर वर बसतो.....नकळत का होईना पुन्हा त्याच्या डोळ्यातुन पाणी येत.....तो त्याच्या टेबलवर असलेला सोनियाचा फोटो त्याच्या छातीजवळ घेतो....आणि तिच्या आठवणीत रडतो...तेवढ्यात त्याचा मित्र आशुतोष तिकडे येतो

आशुतोष : अक्षय ....काय झालं....तू असा....असा राडतोयस का....हे घे पाणी घे आधी.....आशु त्याला जबरदस्ती पाणी पाजतो....

आशुतोष : मला सांगशील का काय झालं...

अक्षय : काही नाही रे ....सहज असाच थोडी आठवण आली सोनिया ची

आशुतोष : अक्षय यार अस का करतो रे तू मित्रा....किती वेळ सांगितलं मी तुला....जे झालं ते वाईट झालं ....पण हे असं सारख तू असा स्वतःला त्रास करून घेतलास तर कस होईल....

अक्षय : माहीत नाही रे पण आज जरा तिची आठवण आली ते पण असं अचानक...

आशुतोष : अचानक ....अचानक म्हणजे .....ते मगाशी मी मीरा ला बाहेर रडताना जाताना बघितलं.... तुमच्या दोघांचं काही भांडण झाल का?

अक्षय : नाही ....तस काही नाही ...ते सगळं सोड ....उद्या तू सहा वाजता ये ....आणि स्टाफ ला पण आमंत्रण दे...उद्या ऑफीस ला सुट्टी सांग....उद्या परीचा सहा महिण्याचा वाढदिवस आहे....सोनियची तशी इच्छा होती की आपण प्रत्येक महिन्याला आपल्या बाळाचा बर्थडे करायचा....मला एवढ्या दिवस वेळ नाही मिळाला ...तर उद्या परीला सहा महिने कम्प्लिट होतायत....आपण सगळे साजरा करू....

आशुतोष : ठिके तू जसा बोलशील तस करू.....

अक्षय : आणि हो थोड्यावेळाने मीरा ला आत पाठव....

आशुतोष ; ठिके

आशुतोष सरळ मिरच्या डेस्क जवळ जातो ती तिकडे तीच सामान आटपत होती

आशुतोष : मिस मीरा के करतायत.... आज लवकर जाणार आहेत का घरी

मीरा : नाही ते मी हे बापांची मूर्ती आत ठेवत होते.....

आशुतोष : का..???

मीरा काहीच बोलत नाही...

आशुतोष  : मीस मीरा ....(तिच्या बाजूला बसतो....हे बघा तुम्ही जे काही करतायत ते अगदी साफ मनाने करतायत...मग त्यात काय घाबरायचं एवढं....

मीरा : पण ते मगाशी....(चिंतेत)

आशुतोष : हा ठिकेना....जे झालं ते झालं....पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मनातील भक्ती अशी आत लपवुन ठेवाल

मीरा  काळजीने बघते

आशुतोष : मिस मीरा....!

मीरा :आधी मला मिस मीरा बोलायचं थांबवा...मला फक्त मीरा बोला...छान वाटेल मला

आशुतोष : ठीक...मीरा तुम्हीं ना अक्षय च्या बोलण्यावर लगेच घाबरू नका...तो ना मनाने खुप शांत आहे ...फक्त बाहेरून तो कडक दिसतो...के करणार खुप काही सहन केलाय त्याने....

मीरा : म्हंजे...???

आशुतोष : नाही काही नाही....तुम्ही तो जे काही काम सांगेल ते मन लावुन करा बघा तो कसा खुश होईल

मीरा : हम्म

आशुतोष : ठिके...सर्वात आधी ती गणपती बाप्पा ची मूर्ती तुमच्या डेस्क वर ठेवा छान दिसते

मीरा खुश होऊन बाप्पांचीमूर्ती डेस्क वर ठेवते....

आशुतोष तसाच सगळ्या स्टाफ ला गोळा करून एक अनौनसमेंट करतो....

आशुतोष : सगळ्यांसाठी एक गोड बातमी आहे ....उद्या आपल्या सरांच्या....म्हणजे अक्षय पाटील सरांच्या मुलीचा सहा महिन्यांचा बर्थडे आहे त्यामुळे त्यांनी तुम्हाला सगळ्यांना त्यांच्या घरी  बोलावलं आहे  पार्टी साठी......

जी अणूंसमेंट ऐकून सगळा स्टाफ खुश होतो

आशुतोष : आपला सगळा नवीन आणि जुना स्टाफ ह्यांनी सगळ्यांनी ठीक सात वाजता त्याच्या घरी पोहोचावे....निशा(सेक्रेटरी)
तुम्हाला सरांचा पत्ता देईलच .....नक्की या आणि त्या परीला छान असा आशीर्वाद द्यावा अशी त्यांची विनंती....

मीरा : अरे त्यांचं लग्न झालं आहे.....आणि त्यांना एक मुलगी सुद्धा आहे....वाटत नाही...मला तर वाटलं....जाऊदे मला वाटुन  काय करायचंय

आशुतोष : ठिके मग सगळ्यांना उद्या सुट्टी आहे ...मग आपण सगळे जण भेटुच उद्या पार्टी ला

सगळे खुश होत आपापल्या कामाला लागतात....पण काय माहित मिराच जशी ही बातमी ऐकली तस तीच हृदय धडधडत होत....तिला वाटलं होतं असेल आजच्या प्रकरणामुळे.... आणि ती तिच्या कामाला लागते....

----------------------------------------------------------------------

मिरच्या घरी

मीरा : आई ....मी ही साडी नेसु का...??

संध्या मिराची आई : किती हा गोंधळ....बापरे...मला तर कंटाळा आलाय सगळं आवरून आवरून....

मीरा : आई तुला जर मदत नसेल करायची तर नको करू.....पण प्लिज हे असं किटकीट पण करू नकोस

आई : झालं ....बोलुन तुझं....मला तर बोलायलाच नको...

मीरा : जाऊदे कुणाला विचारते मी पण....हीच घालते छान आहे ह्याचा रंग.....

मीरा छान अशी लाल रंगाची साडी घालुन तयार होते त्यावर गळ्याभोवती मोत्याची माल  कानात....मोत्याचे कानातले...लांबसडक केस मोकळे सोडले...हातात मॅचिंग बांगड्या....आज तिच्या गोऱ्या आणि भुर्या डोळ्यांना तिचा लुक खूपच शोभुन दिसत होता....

सगळे जण दिलेल्या पत्त्यावर पोहोचतात.....

काय माहित  पण अक्षय ची नजर कुणाला तरी शोधत होती...हे आशुतोष ला समजते....पण तसं तो दाखवत नाही...

आशुतोष अक्षयच्या जवळ जातो.....काही षोडतोयस का तू....???(मुद्दाम चिडवत)

अक्षय : मी ....नाहीतर मी कशाला कुणाला शोधू...

आशुतोष :  नाही ते मला वाटलं तू कुणाची तरी वाट बघतोयस

अक्षय : चल....काही पण......

परिच्या वाढदिवसाची सगळी तयारी अक्षय च्या घर च्या अंगणात केली होती..  .तिकडे खुप छान मंद वारा सुरू होता. ....सगळीकडे रोषणाई रोषणाई.... परी अजून तयार होऊन बाहेर अली नव्हती....पण अजुन मिरा सुद्धा पार्टी मध्ये अली नव्हती....

का माहीत का...पण जेव्हा पासून अक्षय आणि मिरची ओळख झालीये तेव्हा पासुन ती त्याला हवी हवीशी वाटू लागलीये....

अचानक मागुन एक सुसाट्याचा वारा सुटतो....तसे अक्षय चे हार्ट बिट्स वाढतात....

सजना वे
चुपके से आहीस्था
हो राह हु ला पथ
उलझा सवालो मै
अब तेरे हि खयालो मै

कैसी ये चाहत है
रोके ये ना रुके
एक पल या राहत है
धडकन गवा चुके

इस प्यार को क्या नाम दु
खोये है कुछ अल्फाझ क्यू
इस प्यार को क्या नाम दु
क्या नाम दु
क्या नाम दु

अक्षय त्याचा एक हात त्याच्या हृदयावर ठेवतो आणि तो तसेच त्याचे डोळे बंद करून कुणाचा तरी विचार करतो....त्याला डोळ्यासमोर एकच व्यक्ती दिसते....मीरा.....

अचानक कोणी तरी मिराला आवाज देत....हे मीरा.....कम हियर.. 

मीरा नेमकी अक्षच्या मागे उभी असते....ती जशी जशी त्याच्या दिशेने येते तसे तसे त्याचे हार्ट बिट्स अजुन जोरात वाढतात.  

मीरा : सर. .....?

अक्षय हळूच त्याचे डोळे खोलतो.....

मीरा : सर .....???

अक्षय तसाच मागे वळतो....

त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता ही तीच मुलगी आहे जी त्याला नको नकोशी झालेली.....आणि आज तो स्वतः.....तिचे डोळे त्याला कोणाची तरी आठवण करून देत होती....तो काही बोलणार तोच त्याचा मित्र तिथे येतो

आशुतोष : हे मीरा ....तू आलीस......

मीरा : हो .....

आशुतोष : तू इथे काय करते.....चल ये इकडे एन्जॉय कर...

अक्षय (रागात ): ती काही तरी विचारते। मला.....

आशुतोष : खरच....काही काम होत का तुझं ....मीरा

मीरा : नाही ते मी ...हे गिफ्ट ....मला त्याच्या मुलीला द्यायचं होत मला....म्हणुन त्यांना मी आवाज दिला....

अक्षय : हा मग दे ....

मीरा : हम्म....

गिफ्ट घेताना तिच्या हाताचा स्पर्श त्याला जाणवला....तिचे ते मुलायम हात त्याला ओळखीचे वाटत होते....अक्षय च्या अंगावर एकच शहारा उठला.  ..तो आणि ती एकटक एकमेकांना बघत होते....तिचे पाणी दार डोळे....मोत्यासारखे चमकत होते....

आशुतोष : मीरा ....चल मग जाऊया..  तो तिला जबरदस्ती घेऊन जातो.. .त्याच्या अशा वागण्याने अक्षयला चीड येते....हे तो नक्कीच जाणतो

आशुतोष तिची सगळ्या स्टाफ बरोबर तिची ओळख करून देत असतो...तीच काहीच लक्ष नव्हतं...पण अक्षय मात्र सारखा अधुन मधुन तिला बघत होता....

नीलिमा (अक्षय ची आई) : आमची परी कशी दिसते....
हे बोलताच अक्षय त्याचा तंद्रीतुन बाहेर येतो....आणि त्याच्या निरागस मुलीला त्याचा हातात घेतो.....परी.....माय क्युट लिटिल एंजल..... हॅप्पी हाल्फ मंथ बर्थडे प्रिन्सेस....

सगळे जण तिच्या गोड चेहऱ्याकडे बघत होते....किती गोड दिसत होती परी...तिच्या आजीने तिला छान तयार केलेलं.... गुलाबी रंगाचा फ्रोक त्यावर फुलाचं हेरबॅण्ड.... डोळ्याच्या वर नजर लागु नये म्हणुन काजल

सगळे जण तिच्या रुपाची तारीफ करत होते

मीरा तिच्या मैत्रिणीला ....हिची आई कुठे ...???

मैत्रीण : ती पाच महिन्या आधी एका कार एकसिडेंट मध्ये वारली....

मीरा : काय (शोक होत)बापरे... देव पण ना....एवढ्या लहान बाळाला त्याच्या आई पासून लांब केलं....खरच वाईट वाटलं ऐकुन.... मिराला ही बातमी जशी मिळाली तशी ती अस्वस्थ झाली ...आणि का माहीत का ती तशीच चालत त्या बळाजवळ जाते आणि परीला तिच्या हातात उचलुन घेते....

मीरा परीचा हात तिच्या हातात घेते...परीचा होणार मऊ स्पर्श तिला खुप जवळचा वाटला....परी सुद्धा तिला सोडायला तयार नव्हती.....अक्षय थोड्यावेळ त्या दोघांचे प्रेम बघण्यात गुंतून गेला असतो....मीरा परीच्या डोक्यावर हळुच तिचे ओठ टेकवते... तशी परी जोरजोरात हस्ते....तिला अस हसताना बघुन तिच्या आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी येत.....

अक्षयला सुद्धा आश्चर्य वाटत...

अक्षय चे वडील : अरे वा परीला ही नवीन मावशी आवडली वाटत. ...

अक्षय वडिलांच्या बोलण्यावर हळुच मंद हसतो

अक्षयची आई : हो ना ....पोरी तुझं नाव काय...?

मीरा : मी मीरा देशमुख.... नवीनच तुमच्या कंपनी मध्ये जॉइन झाले....तीनच दिवस झाले.....
.
अक्षय : तिच्यात काही ओळख करून देण्यासारखे काही नाहीये...(रागात)

अक्षयचे वडील: अरे असा काय बोलतोयस....शिकेल हळुहळु ..हो की नाही पोरी...

मीरा (मनात) नुसता माझ्या मागे लागलेला असतो ....

अक्षय : काय ????

मीरा : अ.... काही नाही. ..हे घ्या परी रडायला लागली.....

अक्षय : कुठे रडते....

मीरा : अरे हा नाही रडते....

आशुतोष : झालं सुरु मांजर उंदराचा खेळ....

अक्षय रागाने आशूला बघतो...

अक्षय : ते मी काय म्हणतोय केक कापुया का आपण....म्हणजे एंजल शांत आहे ना आपली म्हणुन....

अक्षय : हम्म....

थोडयाच वेळात बारबी डॉल चा केक येतो.....मीरा केक ला बघुन खुश होते.....सगळे जण तिला थोडा थोडा केक चा तुकडा भरवतात . नकळत सोनियाचा आठवणीने अक्षयच्या डोळ्यात पाणी येत.....पण तो कुणाला दाखवत नाही ...त्याचे हे अस लपुन डोळे पुसन मीरा बघते...तिला सुद्धा वाईट वाटतं....

सगळे जण पार्टी छान एन्जॉय करत असतात.....

अक्षय ची आई : अक्षय मी परी ला झोपवायला न्हेते...ही बघ कशी चिडचिड करते

अक्षय : ठिके जा तू ....मी इकडच सगळं हँडल करतो

(काय मग काय होईल पुढील भागात नक्की कळवा तुमच्या कमेंट्स द्वारे..... धन्यवाद)









🎭 Series Post

View all