साथ दे तु मला (पुनर्विवाह) भाग 2

साथ दे तु मला (पुनर्विवाह) भाग 2

आज तर अक्षय ला ऑफिस ला खुपच उशीर झाला ...त्यालातर वेळेचं भान सुद्धा नव्हतं..  पण तो आता जे काही करत होता ते सुद्धा त्याच्या मुलीसाठी करत होता...अक्षय ला परीच्या नावाने नवीन फार्मसी ओपन करायची होती... त्याच्या निमित्ताने त्याला पुण्याला जायचं होतं.....

रात्रीचे एक वाजले तेव्हा त्याला परी ची आठवण आली तो तसाच ताडकन उठून सिक्युरिटी लाऑफिस बंद करायला सांगून तो त्याच्या घराकडे निघाला.....
अक्षय जसा घरी पोहोचला तसा तो सरळ परीचा रुम मध्ये गेला परीचा रूम मध्ये अक्षय ची आई तिला झोपवण्याचा प्रयत्न करत होती.... तो तसाच परी जवळ बसला आणि तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत .....तिचा चेहरा बघून त्याला परी च्या आईची आठवण आली तो तसाच बसून भूतकाळात निघून जातो (  सिनिया : हा हा हा हा कुछ भी अक्षय ....तुम्हे छोटे बच्चे इतने ने पसंद है ये तो मुझे आज हि पता चला....कोई बात नही.... मुझे भी पसंद है पर अक्षय तुम्हे  क्या चाहिए लडका या लडकी....?

अक्षय  : मुझे तुम्हारे जैसी दीखने वाली एक  नन्ही सी बेटी चाहिये...

सोनिया लाजतच तिचा चेहरा दुसरीकडे वळवते..

तेवढ्यात अक्षय परीचा रडण्याच्या आवाजा ने भूतकाळातून बाहेर येतो.... अक्षय त्याच्या आईला तू शांत झोपून राहा मी परीला बघतो याचा इशारा करतो आणि तो तसाच परीला घेऊन त्याच्या रूममधे निघुन जातो..... थोड्यावेळ अक्षय परी बरोबर खेळतो आणि ते दोघे खेळत अस्तनाच तो आशुतोष ला उद्या ऑफीस ला लवकर येण्याचा मेसेज टाकतो....... ते दोघे कमीत कमी एक दोन तासानंतर झोपून जातात .....आज अक्षय खूप दमलेला असतो पण तो कधीच कोणाला बोलून दाखवत नाही

-----------------------------------------------------------------

दुसऱ्यादिवशी.....

अक्षय दुसऱ्या दिवशी लवकर उठून काही न खाता  तसाच ऑफिस ला निघून जातो.....आज त्याने अर्जेन्ट पुण्याच्या फार्मसी बद्दलची मीटिंग ठेवली होती.....आणि त्या नंतर काही मुलं मुली इंटरव्ह्यू साठी सुद्धा येणार होते....

अक्षय कामांमध्ये एवढा बिझी होता की समोर आशुतोष येऊन बसला आहे ह्याच सुद्धा त्याला भान नव्हतं....आशुतोष साठी त्याच हे वागणं काही नवीन नव्हतं....तो तसाच त्याच्या हातातील घड्याळाकडे बघत उठणार तेव्हढ्यात अक्षय त्याला आवाज देतो

अक्षय : एकटा कुठे चालास.... थांब मी पण येतो.....(आशुतोष मनातच हलकं स्माईल करतो....तसे ते दोघे मीटिंग रूम मध्ये जातात...)

थोड्याच वेळेत मिटिंग सुरू होते....अक्षय त्याच्या पुण्याच्या नवीन फार्मसी बद्दल त्याला काय काय अपेक्षा आहे हे सर्व डिटेल मध्ये सांगतो....त्याचा बजेटमध्ये काय काय हवं नको ते सगळं सांगतो....ऑफिसचा बाहेर सगळा स्टाफ कामात गुंतलेला असतो आणि त्यातच आज पुण्याच्या ऑफिससाठी मुला मुलींचे सिलेक्शन सुद्धा होत..... तेवढ्यात मागुन कुणाचा तरी पडल्याचा आवाज येतो....सगळे जण त्या व्यक्तीकडे बघत असतात.....

हातात एक मोठी छत्री.....निळा सलवार कमीज...त्यावर हाताने नक्षीकाम केलेलं डिझाईन... त्याच्या ओढणीला वेगवेगळ्या रंगाचे गोंडे....तिच्या घाऱ्या डोळ्यात जाडसर काजल....एक केसाची लांबसडक वेणी....त्यात चाफ्याचे फुल.....खांद्यावर एक बॅग.....आणी दुसऱ्या हातात पाण्याची बॉटल....

तिथे बसलेली सगळे जण त्या मुलीला घमेडी नजरेने बघत होती...कोणीही तिला मदतीचा हात दिला नाही....ती तशीच स्वतःला सावरत रिसेप्शनिस्ट कडे वळाली....

नमस्ते मॅडम.....मी मीरा देशमुख...इथे इंटरव्ह्यु ला आली....

रिसेप्शनला उभी असणारी बाई सुद्धा तिला वर खाली बघुन तोंड वाकड करते....तिच्या अशा वागण्याने मीरा मनातच बोलते.....(अरे वा....मी एवढी छान दिसते की सगळे मला वरून खालुन बघतायत.... वा मीरा वा तुझी चॉईस तर एक नंबर आहे.....)

रिसेप्शनिस्ट : तुम्हाला वाट बघावी लागेल....आत मीटिंग सुरू आहे....ती मीटिंग संपली की सगळ्यांना एक एक करू  सर आत बोलावतील....तो परेनंतर तुम्ही तुमची सगळी डिटेल ह्या फॉर्म मध्ये भरा.....

मीरा खुश होऊन तिची सगळी माहिती त्या फॉर्म मध्ये भरते....

मीरा : मॅडम पाणी...खुप तहान लागलीये....?

रिसेप्शअनिस्ट : हम्म .....सरळ जाऊन लेफ्ट घ्या तिकडे कॅन्टीन आहे....

मीरा थंक्यु बोलुन निघुन जाते..... मीरा साठी मुंबई शहर नवीन होतं ती त्या ऑफिसमध्ये नवीनच होते.... तिला ऑफीस पाहताच क्षणी ते.... खूप आवडला.... मीरा मनातच बोलते अजून तरी इंटरव्ह्यूला खूप वेळ आहे.... तोपर्यंत मी हे ऑफिस बघून घेते... मीरा तशीच हळूहळू ऑफिसला न्याहाळत पुढे जाते.... पूर्ण ऑफिस बघून झाल्या नंतर ती तशीच पुढे येते ....अरे हा कोणता रूम आहे ....हा तर बघायचा राहूनच गेला.... मीरा तशीच हळूहळू तिची पावले त्या रूमच्या दिशेने घेऊन ...जाते हळूच ती तो रूम उघडते

त्या रूम मध्ये सगळीकडे अंधार असतो तिला काहीच दिसत नसतं ती तशीच आत मध्ये येते अंधारामुळे तिला काहीच दिसत नसतो पुढे येता येता तिचा धक्का एका चेरला लागतो आणि ती तशीच पडणार तोच तिला कोणीतरी सावरत...तशी मीरा जोरात किंचाळते....

मीरा: गणपती बाप्पा ...... गणपती बाप्पा.....(घाबरत)अरे मी।अशी वाकडी का झाली....ती हळुच एक डोळा उघडते....तिला समोर फक्त चेरहऱ्याचा आकार दिसत असतो.....ज्याने तिला कंबरेला धरून पकडलेल असत.....

मीरा : ओ मिस्टर तुम्ही मला असं कसं पकडलं....हे तुम्हाला शोभत का.....(घाबरुन)

अनोळखी व्यक्ती : व्होट..... व्होट नॉनसेनस.....

मीरा : काही सेन्स बीन्स काही नाही....तुम्ही मला असं पकडू नाही शकत.....सोडा आधी मला ...

अनोळखी व्यक्ती :शुअर..... सोडु तुम्हाला.....?

मीरा : हा...हा  मग काय....सोडा मला

तो तसाच रागाने तिला सोडतो तशी ती खाली आदळते.....आणि तेवढ्यात लाईट येते... ती दुसरी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसुन अक्षय असतो....आता हे ऑफिस त्याच आहे म्हंटल्यावर तोच असणार ना इथे

मीरा तिची ओढणी संभाळत उठते : तुम्ही अस कस मला सोडलं.....लागला ना मला....

अक्षय : (रागात )जेव्हा हेल्प केली तेव्हा सोड बोलीस....आणि सोडलं तर हे असं बोलतेस मला....

मीरा थोडी गोंधळत .....पण थोडं हळु सोडायच ना.....

अक्षय : व्होट.... आधी हे सांग तू अशी इथे मिटिंग रूम मध्ये काय करते.....

मीरा : ते ...ते  मी पाणी प्यायला आलेले.....आणि अजुन माझ्या इंटरव्ह्यु ला टाईम होता तर मग मी विचार केला की थोडं ऑफिस बघुन घेऊया.....मी ते चुकुन इथे आली

अक्षय (रागात) : तुला हे गार्डन वाटलं....फिरण्यासाठी....

मीरा : ते मी बोले ना की मी चुकून आले इथे....आणि तुम्ही का मला हे सगळे प्रश्न विचारतायत.....तुम्ही काय बॉस आहात का ह्या कंपनीचे....चुपचाप इंटरव्ह्यू ला आला आहात ना मग ते तुमचं काम करा.....आणि जा...

अक्षय : इंटरव्ह्यू आणि मी.....?

मीरा : हा मग काय ....हे जे तुम्ही कपडे घातलेत ना त्यावरून मला समजलं....की तुम्ही सुद्धा इंटरव्ह्यू साठी आला आहात.....माझ्यासारखे.... नाही तर एवढं कोण येत का नटून थटून....

अक्षय : नटून थटून ....मी ....(अक्षय खालुन वर त्याच्या कपड्याकडे बघतो.....)

मीरा : हा हा मग काय सगळे बाहेर मुलं तसेच आले आहेत....तुम्हाला काय वाटलं तुमचे कपडे बघुन बॉस तुम्हाला लगेच पास करेल....नाहीतर आहे काय तुमच्या मध्ये....(हिची बडबड सुरूच)

अक्षय : हॅलो मिस.....(रागाचा लुक देत)

मीरा : काय हॅलो....काय हॅलो ....माझं नाव मीरा आहे.....मीरा देशमुख.... कॉल मी मीरा....आज हे बघा....मी पण ना....काय तूमच्या बरोबर बोलत बसलीये....मलाच उशीर होईल...आणि ती माघे वळते

पुढे जाता जाता ती परत मागे वळुन बघते.....

मीरा : (तोंड वाकड करत.....नंतर बोलेल मी तुमच्याशी....अजुन माझं बोलणं संपलं नाही..)

अक्षय : काय ....???? ओ हॅलो.... काय नाव हीच....ये....मिस .....ओय......(वैतागून)

मीरा पळत जाताना : माझं नाव आठवत बसा....आठवलं की हाक मारा

अक्षय तसाच रागाने त्याच्या केबिन मध्ये निघुन जातो

थोड्याच वेळात इंटरव्ह्यू सुरू होतो....एक एक जण आत मधुन बाहेर येताना काळजीने बाहेर येत  होते....प्रत्येकाच्या मनात कोण सिलेक्ट होणार ह्याचीच काळजी वाटत होती....माही सुद्धा आता चांगलीच बेचेंन झाली...तिला सुद्धा सगळ्या एम्प्लॉइज कडे बघुन काळजी वाटत होती....थोड्याच वेळात मीरा चा नंबर येतो.. मीरा तशी घाबरत घाबरत आत जाते

मीरा : मे आय कम इन सर

येस कम इन

तिथे आशुतोष सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेत असतो..आणि त्याच्याच बाजुच्या खुर्ची वर अक्षय बसलेला असतो ते पण खुर्ची च तोंड मागे करून....त्याच्या मुळे इंटरव्ह्यू देणाऱ्याला फक्त आशुतोष दिसत होता...

आशुतोष :.प्लिज बसा....

मीरा पुर्ण रूम न्हयाळत खुर्ची वर बसते.....

आशुतोष : वेल मी तुमचा रिजुम पहिला..मिस मीरा देशमुख.....ही तुमची पहिलीच वेळ आहे इंटरव्ह्यू ची....आणि तुम्हाला काही एक्सपिरियन्स सुद्धा नाहीये.....मग तुम्हाला वाटत नाही का की ज्या पदांसाठी आम्हाला मुलं मुली हवेत त्यांना एक्सपिरियन्स हवा....???

मीरा मधेच बोलते...: अस कस मला जर तुम्हीं शिकवणार नाही तर मग मी कस शिकणार.....अस थोडीच असत.....मला आधी शिकवा मी बघा कसं काम करते(हसतच बोलते)

मिरच्या बोलण्यावर आशुतोष हळूच त्याच्या मित्राला बघतो....थोडं त्याला पण टेन्शन येत

आशुतोष : तस नाही मिस मीरा ते आम्ही तुम्हाला घेऊच... पण ते....

मीरा : अरे वा म्हणजे माझं सिलेक्शन झालं....गणपती बाप्पा मोरया.... थंक्यु हा....मला माहित होत माझं सिलेक्शन होणारच.... उगाच मला सगळे नाव ठेवतात

आशुतोष : एक एक मिनिट....मी अस नाही बोलो...मी बोलो

मीरा : अरेच्या आता तर तुम्ही बोलात.....

आशुतोष : आधी तुम्ही माझं एकुण तर घ्या....तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील नंतर आम्ही ठरवू की तुम्हाला घ्यायचं का नाही ते

आता मिराला चांगलाच घाम फुटला.....

मीरा : प्रश्न ....हा हा विचाराणा...मी काय घाबरते काय....(अरे देवा हे काय मधीच...मला तर काहीच लक्षात नाही येते...मला जर प्रश्नांची उत्तरे नाही आली तर....गणपती बाप्पा वाचवरे मला....मनातच बोलते)

आशुतोष : मिस मीरा ....आर यु रेडी ....

मीरा : हा हा हा ..आय एम रेडी....सगळंच रेडी.....(घाम पुसत) पण मी काय बोलते तुम्ही मलक मगाशी बोलात ना की आम्ही तुम्हाला घेऊच मग हा इंटरव्ह्यू कशाला ...हो की नाही....मी आधीच माझ्याबद्दल ची सगळी माहिती तुम्हाला दिली आहे....ही की  नाही

मिरा तशीच बडबडत असते...आता मात्र आशुतोष ला कळत की अक्षय नक्कीच भडकणार

मीरा : ठीके....मग मी आता येते....उद्या जॉईन होते....नको नको उद्या नाही पर्वा येते ...ते कायेना.... मला नोकरी लागल्या बद्द्ल मला गणपतीला पेढे द्यायचे आहेत....मग मी पर्वा येते.....(आता मात्र अक्षय मिरच्या आशा वागण्याने भडकतो....)
अक्षय : व्हॉट द हेल इस गोइंग ऑन हियर....

मीरा आणि आशुतोष जागीच घाबरून उठतात....

अक्षय तसाच जागेवर उभा राहवून मागे फिरतो ....त्याला बघुन मिराला आश्चर्य वाटते....

मीरा : तुम्ही....तुम्ही इथे काय करतायत....ह्म्म माझा पिच्छा करतायत ना....ते मला मगाशीच लक्षात आलं....तरी म्हंटल मला असे मगाशी घुरून घुरून का बघत होता....

आशुतोष : व्होट ...अक्षय तू आणि हिला घुरून.....?

मीरा : हो हो ...मगाशी ना मी ......

अक्षय : स्टॉप इट.....(रागात)

मीरा : ते मी ....

अक्षय : आय सेड स्टॉप इट....(अजुन मोठ्या आवाजात)

मीरा : मी का शांत बसु.... मी का स्टॉप इट होऊ....तुम्ही स्टॉप इट(चाचरत)

आशुतोष : मीरा ...मिस मीरा प्लिज शांत व्हा.....(काळजीत)

मीरा : मी का तुम्ही त्यांना बोलाना ....ते बॉस गिरी दाखवतायत.....उगाचच

अक्षय : उगाचच ...व्होट नॉनसेन्स....(चिडत).

आशुतोष : आता बॉस बॉसगिरी नाही करणार तर कोण करणार (कपाळावर हात मारत)

मीरा : म्हंजे.....(ती तिचा बोट अक्षय कडे करते)

अक्षय ला त्याला कोणी बोट दाखवलेलं नाही आवडत...

अक्षय : बोट खाली....(रागातच)

मीरा : हा हा ठिके.... मी नाही घाबरत कोणत्याच बॉसला.... घ्या माझा इंटरव्ह्यू ....मी देईल सगळी उत्तरे(आणि खुर्चीवर बसायला जाते).

अक्षय : स्टँड अप....आय सेड स्टँड अप....मगास पासुन तुझी बडबड ऐकतोय.... हे काही भाजी मार्केट नाहीये....

मीरा : ते मी ....

अक्षय : ओ जस्ट शटप.... आशु....हिला काहीच विचारू नको....तसाही मी हिचा रिसुम वाचला काहीच नाहीये त्यात ज्यानेकरून हिला आपण आपल्या कंपनीत घेऊ....हिला पाठवुन दे(रागात)


मीरा : रागात....अस कस तुम्ही मला पाठवाल....माझा इंटरव्ह्यू कुठे झाला अजून(घाबरून)

अक्षय : ओ रिअली.... मगाशी तर तु तुझा इंटरव्ह्यू होऊ नये म्हणुन किती बडबडत होती आणि आता अशी बोलतेस...

मीरा : ते मी ...हे सर बोले....

अक्षय : (तिच्या जवळ जातच.....ओ अच्छा ....ठिके मग मी आता प्रश्न विचारतो....त्याची मला उत्तरे दे मग मी ठरवेल तुला ठेवायचं की नाही ते)

मीरा घाबरून उठते ....ते हे घेतली माझी परीक्षा.... तुम्ही नको

अक्षय : इकडचा बॉस मी आहे....ही कंपनी माझी आहे मग मी जे बोलेल तेच होणार

मीरा थोडी जास्तच घाबरते आणि तिला थोडी चक्कर येते ती खाली पडणार तोच तिला अक्षय सांभाळतो

अक्षय : अरे हिला काय झालं...?


आशुतोष : कदाचित घाबरून तिला चक्कर अली वाटत....थांब मी पाणी आणतो तिला .....(आशु गडबडीत बाहेर निघुन जातो)

मीरा तशीच अक्षय च्या हातात असते....तिचा साधेपणा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता..... अक्षय थोडया वेळासाठी तिच्यात गुंतून जातो ...तिचा निरागस चेहरा त्याला कुठे तरी त्याला आनंद देत होता....थोड्या वेळात आशुतोष पाणी घेऊन येतो

मीरा ला अक्षय च्या अस जवळ बघून त्याला पण थोडं नवल वाटत...

आशुतोष : अक्षय ....अक्षय....एवढा आवाज देऊन सुद्धा तो त्याच्या तंद्रीतुन बाहेर हेत नव्हता.....अक्षय(जोरात)

अक्षय : हा हा....अरे हिला आधी चेर वर बसव तरी....

आशुतोष :(मनातच) हे तर तू एकट सुद्धा करू शकला असता

अक्षय  : काय ....काही म्हणालास का तू.....

आशुतोष : आ ....काही नाही .....हिला उठव आधी .....म्हणजे थोडं पाणी शिंपड ....तिच्या तोंडावर...

अक्षय : हम्म....(अक्षय हळूहळू तिच्या तोंडावर पाणी शिंपडतो तशी मीरा जागी होते)

अक्षय (काळजीत ) आर यु ओके...

मीरा : हम्म

अक्षय : शूअर....

मीरा : हम्म(तिची ओढणी सांभाळत).




(काय होणार पुढे .....अक्षय मिराला जॉब देणार का....पाहूया  पुढील भागात माझ्या कथेचे प्रत्येक भाग हे तीन दिवसांनी येतील....कोणीही काळजी करू नका)





































🎭 Series Post

View all