Login

लग्न – एक छलावा भाग ७३

सात फेऱ्यांमध्ये लपलेले गुढ रहस्य
" ठीक आहे... " तिची मनस्थिती समजून ते स्वतःच तिच्या बाजूला बसले आणि ते मेनू कार्ड आपल्या हातात घेऊन त्यात असलेल्या पदार्थांची नावे वाचू लागले...

आत्ता पुढें,

काही वेळात एक बेटर आपल्या हातामध्ये काही सामान घेऊन त्यांच्या समोर येऊन उभा राहिला... मिस्टर विश्वास यांनी त्याच्या हातात असलेले ते सामान घेतले आणि त्याला ऑर्डर दिली... होकारात मान हलवत त्यांची ऑर्डर लिहून तो वेटर तिकडून निघून गेला...

मिस्टर विश्वास यांनी त्या सामानांमध्ये असलेला एक बॉक्स बाहेर काढला... ते भार्गवीच्या समोर खाली गुडघ्यावर बसले...

" तुम्ही हे काय करत आहात , असे खाली का बसलात ? " त्यांना असे खाली बसलेले पाहून भार्गवी गोंधळून विचारू लागली....

" तुझ्या गुडघ्यांना खूप जखम झाली आहे... तरीही मगासपासून शांतपणे गाडीमध्ये बसलीस हे का शब्दाने ही सांगावेसे वाटले नाही... आता जेव्हा तुला चालला त्रास होत होता तेव्हा मला सौरभने सांगितलेली गोष्ट आठवली... " मिस्टर विश्वास  थोड्या रागीट नजरेने तिच्याकडे पाहत बोलत होते...

" ठीक आहे मी , जास्त काही दुखत नाही... " तरीही भार्गवी नजर खाली ठेवून हळू शब्दात बोलली...

" तू किती ठीक आहे ते मला दिसतच आहे...  आता फक्त थोडा वेळ शांत बस... " असे बोलून मिस्टर विश्वास यांनी फर्स्ट रेट बॉक्स मधून डेटॉलची बॉटल काढली आणि एक कॉटन घेऊन तिच्या गुडघ्याला लागलेली जखम साफ करू लागले... तिने घातलेली फाटली होती त्यामुळे ते त्यातूनच व्यवस्थित साफ करत होते....

" तुम्ही प्लीज असे करू नका , मीss मी स्वतः साफ करते ना... " त्यांच्याकडून अशी सेवा करून घेताना भार्गवीला थोडं अवघड वाटू लागले....

" सॉरी म्हणजे माझं असं डायरेक्टली तुझ्या जवळ ये ना तुला आवडलं नाही का ? " मिस्टर विश्वास यांनी तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत तिला डायरेक्ट प्रश्न विचारला...  त्यांचं बोलणं ऐकून मात्र ती स्तब्ध पणे त्यांच्याकडे पाहू लागली.... ते मगासपासून तिच्यावर स्वतःचा हक्क गाजवत होते आणि ती शांतपणे त्यांना गाजवू देत होती.. आपण त्यांना अडवले नाही... त्यांनी आपला हात धरला आपल्याला उचलून घेतले तरीही आपल्याला त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये काही विचित्र असे वाटले नाही उलट त्यांच्या स्पर्शात काळजी , प्रेम, आपलेपणा जाणवत होता... भार्गवी स्वतःशीच विचार करत होती....

तिला आपल्या विचारात हरवलेले पाहून मिस्टर विश्वास हलकेच घालत असले आणि नकारार्थी मान हलवत त्यांनी पटापट दोन्ही गुडघ्यावर असलेल्या जखमा देताना साफ केल्या आणि त्याच्यावर मलम लावला... त्यानंतर ते उठून तिच्या बाजूला बसले आणि तिच्या हाताला कुठे लागले आहे ते चेक करत होते... त्यांनी अचानक हात धरल्यामुळे ती पुन्हा भानावर येऊन त्यांच्याकडे पाहू लागले.... ते उठून बाजूला कधी येऊन बसले हेच तिला समजले नाही त्यांनी आपल्या दोन्ही गुडघ्यांना पाहिले तर त्यावर मलम लावले होते... तिच्या दोन्ही हाताला थोड्या जखमा झाल्या होत्या त्याने त्यालाही देतो नाही पुसून त्याच्यावर मला लावला...

" भार्गवी तुझा हा ड्रेस काही ठिकाणी फाटला आहे... एक काम कर या बॅगमध्ये कपडे आहेत आणि तिकडे बसून आहे... तू तिकडे जाऊन फ्रेश हो आणि तुझे कपडे चेंज कर मी माझ्या अंदाजानेच आणायला सांगितले... " मिस्टर विश्वास शांतपणे तिच्या हातात एक बॅग देत तिला बोलतात.... त्यांचं बोलणं ऐकून तिलाही जाणीव होते की इतका वेळ आपण अशा फाटक्या कपड्यांमध्येच बसलो होतो.... एवढे सगळे घडून गेलो होतो की कोणती ही गोष्ट विचार करण्याची तिची क्षमता नव्हती.... ती बॅग घेऊन ती शांतपणे उठून वॉशरूम च्या दिशेने गेली.... आज गेल्यावर तिने आपला चेहरा पाण्याने व्यवस्थित धुतला... हात आणि पाय पण व्यवस्थित धुतले.... मलम पुसणार नाही याची काळजी घेतली आणि त्यांनी दिलेला ड्रेस घालू लागली....

सिम्पल अशी आकाशी रंगाची लेगिन्स आणि त्याच्यावर आकाशी रंगाचा सिम्पल आणि नाजूक नक्षी असलेला गुडघ्या एवढा येईल असा टॉप होता.. तिने घातल्यावर तिला समजले की त्याची फिटिंग एकदम परफेक्ट होती... त्यांचा तो अंदाज किती परफेक्ट आहे याची तिला जाणीव झाली.... त्यांनी मागवलेले कपडे सिम्पल होते पण त्यातही भार्गवी ची सुंदरता उठून दिसत होती....

भार्गवीने एक नजर समोर असलेल्या आरशामध्ये स्वतःला पाहिले.....

' मी माझ्यासाठी धर्मेश कडून जसा प्रेम जशी काळजी एक्स्पेक्ट करत होती या सगळ्या गोष्टी मला आज मिस्टर विश्वास यांच्यामध्ये दिसून येत आहेत.... ते माझी इतकी काळजी का करत आहे ? मला त्रास दिला म्हणून त्यांनी धर्मेशला एवढ्या उंचावरून खाली ढकलले हे करताना त्यांनी जरा सुद्धा विचार केला नाही... मी जेलमध्ये असतानाही मला स्वतःच्या बाजूने बोलण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत होते परंतु तेव्हा मीच त्यांच बोलणं ऐकला नाही... ते माझ्यासाठी एवढे सगळं का करत आहेत ? ' असा प्रश्न भार्गवीच्या मनामध्ये निर्माण झाला आणि ती स्वतःच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होती... थोड्या वेळात भार्गवी बाहेर आली आणि समोर असलेल्या सोफ्यावर जाऊन बसली...

त्या ड्रेस मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.... तिला पाहून मिस्टर विश्वास यांनाही छान वाटले... त्यांनी पण बाकीचे सामान व्यवस्थित एका बाजूला ठेवून बाथरूम मध्ये जाऊन स्वतःही फ्रेश झाले...

मिस्टर विश्वास बाहेर आल्यावर लगेचच वेटर पण त्यांची केलेली ऑर्डर घेऊन आला असे त्यांनी भार्गवीला डायनिंग टेबल च्या जवळ येऊन बसायला सांगितले.... वेटर ने त्या दोघांनाही जेवण वाढले आणि तो तिकडून निघून गेला... दोघांनाही खूप भूक लागली होती त्यामुळे त्या दोघांनीही शांतपणे जेवायला सुरुवात केली....

थोड्या वेळाने दोघांचे जेवण उरकल्यावर मिस्टर विश्वास यांनी त्या वेटरला सगळं बिल पे केलं आणि ते दोघे पण तिकडून बाहेर पडले आणि आपल्या गाडीत येऊन बसले...

मिस्टर विश्वास यांनी गाडी चालू केली... भार्गवी पुन्हा एकदा खिडकी मधून बाहेर पहात स्वतःच्या विचारात हरवली... पोट भरलेले असल्यामुळे आणि बाहेरून येणारा थंड हवेमुळे तिला कधी शांत झोप लागली तिलाही समजले नाही.... मिस्टर विश्वास यांनी पाहिले तेव्हा त्यांना समजले की , ती झोपलेली आहे.... त्यांनी किती सीट व्यवस्थित ऍडजेस्ट केली आणि स्वतः गाडी चालवू लागले.....

एक दीड तासांमध्ये ते लोक मिस्टर विश्वास यांच्या घरी पोहोचले...... गाडी थांबल्याची जाणीव होताच भार्गवीने डोळे उघडून आजूबाजूला पाहायला सुरुवात केली...

" आपण कुठे आलो आहोत ? "आजूबाजूला असलेला अनोळखी परिसर पाहून तिने त्यांना विचारले....

" खाली उतरतरी.. हा परिसर जरी तुझ्यासाठी अनोळखी असला तरी आत कोणीतरी तुझी आतुरतेने वाट पाहत आहे आणि ती व्यक्ति मात्र तुझ्या ओळखीचीच आहे... " मिस्टर विश्वास यांनी तिच्या बाजूचा दरवाजा उघडून तिला सांगितले... तशी भार्गवी आश्चर्याने गाडीमधून खाली उतरली आणि नक्की कोणती व्यक्ती आपली वाट पाहत आहे त्या व्यक्तीच्या ओढी ने त्यांच्या मागे चालू लागली...

मिस्टर विश्वास आपल्या फ्लॅटच्या दरवाज्याच्या समोर येऊन उभे राहिले आणि स्वतः जवळ असलेल्या चावीने दरवाजा उघडला.... ते आत आले आणि भार्गवीला आत येण्याचा इशारा केला.... भार्गवी आजूबाजूला पाहताच दरवाजामधून आत आली तेव्हा तिची नजर समोर उभे असलेल्या व्यक्तीवर गेली...

" आज्जी.... " आपल्या आजीला समोर सुखरूप पाहून भार्गवी आनंदाने थोड्या जलद गतीने आजी जवळ गेली आणि गळ्यात पडली...

" भार्गवी बाळा ,कशी आहेस तू ? तुला तिकडे जास्त त्रास तर नाही झाला ना ? " तिची आजची प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत विचारू लागली...

"मी ठीक आहे आजी, तू कशी आहेस ? " भार्गवी ने प्रेमाने आपल्या आजीकडे पाहून तिला विचारले....

" मी पण ठीक आहे आणि इकडे सुरक्षित आहे... यांनी माझी खूप काळजी घेतली... अगदी स्वतःची आजी असल्यासारखेच माझ्याकडे लक्ष देत होते... " भार्गवी ची आज्जी मिस्टर विश्वास यांचे कौतुक करू लागली.... आपल्या आजीचं बोलणं ऐकून भार्गवी पण आनंदाने त्यांच्याकडे पाहू लागले....

' आपल्या आजीला वाचवण्यासाठी जेव्हा ती मार्ग शोधत होती तेव्हा मात्र तिच्या मनामध्ये मिस्टर विश्वास ही एक व्यक्तीच फिरत होती... आता तेच आपली मदत करतील आणि त्यांच्या जवळच आपली माणसं सुखरूप राहतील असं तिला मनापासून वाटू लागलं आणि म्हणून तिने त्यांच्यासाठी कोड लँग्वेज मध्ये मेसेज पाठवला होता ... तिने माझ्या पाठवलेला मेसेज त्यांनी बरोबर शोधूनही काढला होता... '

" आजी तुम्ही इथे आल्यापासून तिची काळजी करत होता ना.... आता तुमची नात तुमच्यासमोर आहे.... तेव्हा तिच्या सोबत मनसोक्त गप्पा मारा.... मला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे मी जाऊन येतो.... " मिस्टर विश्वास त्या दोघींकडे पाहून हलकस्मित करत बोलतात...

" आता इतक्या रात्रीचे तुम्ही कुठे जात आहात? तुम्ही पण थकला असेल ना ..... आता आराम करा , उद्या सकाळी कुठे जायचं असेल तिकडे जावा.... " भार्गवी पटकन त्यांच्याकडे पाहून बोलून मोकळी होते... इतक्या वेळापासून ते आपल्या सोबत आहे आणि आपली काळजी घेत आहे हे तिने पाहिलेले असते त्यात आता इतक्या रात्रीच ते आपल्याला सोडून कुठे जात आहेत या विचाराने तिच्या मनामध्ये भीती निर्माण होते त्यामुळे ती त्यांना अडवते....