Login

लग्न – एक छलावा भाग ७२

सात फेऱ्यांमध्ये लपलेले गुढ रहस्य
" माझा तुला दुखावण्याचा खरंच हेतू नव्हता... तुझ्या डोळ्यांमध्ये हे अश्रू मी नाही पाहू शकत.... हे अश्रू जरी तुझ्या डोळ्यात असले तरी त्रास मात्र ते माझ्या हृदयाला जास्त देतात, त्यामुळे यापुढे रडताना आधी माझ्या हृदयाचा विचार करत जा... जर तुला मला त्रास देण्याची इच्छा असेल तर बिंदास रडत जा.... " मिस्टर विश्वास तिच्या डोळ्यात पाहत हळव्या स्वरात बोलतात....

आत्ता पुढें,

तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून मात्र मिस्टर विश्वास आपल्या भावना रोखू शकले नाही आणि भावनेच्या भरात मनातली गोष्ट तिला सांगून ते मोकळे झाले, पण इकडे त्यांच्या स्पर्शाने मात्र भार्गवी इतकी गारठून गेली होती की, त्यांचे शब्द तिच्या कानापर्यंतच पोहोचले नाही.... त्यांचा तो प्रेम आहे स्पर्श तिच्या शरीरावर आपल्या प्रेमाची छाप सोडतात आणि ती मात्र एकटक सिद्धार्थ आपल्यासारखी त्यांच्याकडे पाहत होती...

अचानक त्यांच्या गाडीच्या काचेवर टकटक असा आवाज आला आणि ते दोघे पण भानावर येत एकमेकांपासून थोडे लांब झाले.... मिस्टर विश्वास यांनी तिच्या चेहऱ्यावर स्थिरावलेले आपले हात बाजूला केले.... भार्गवी पण डचकून पटकन आपल्या जागेवर ताट बसली.....

मिस्टर विश्वास यांनी आपल्या खिडकीच्या काचेकडे पहात काच खाली केली....

" Any problem? नाही ते काय आहे ना.... तुमची गाडी अशी बाजूला थांबलेली पाहून मला जरा शंका आली म्हणून मी विचारण्यासाठी आलो होतो.... मला वाटलं बहुतेक गाडी काही प्रॉब्लेम मुळे बंद पडली की काय आणि इकडे दूर दूर पर्यंत या हायवेवर कोणतेही गॅरेज नाही... तुम्हाला जर कसली गरज असेल तर म्हणून म्हटलं एकदा विचारवं.... " एक युवक मिस्टर विश्वास यांच्याकडे पाहून बोलतो...

" Thank you so much for your concern... पण तसा काहीही प्रॉब्लेम नाही माझी गाडी व्यवस्थित आहे.... " मिस्टर विश्वास पण त्याच्याकडे शांतपणे पाहून त्याला उत्तर देतात....

" ओके... " सगळं व्यवस्थित आहे हे समजल्यावर तो युवक पण बाय बोलून तिकडून निघून जातो आणि आपल्या गाडीत बसून गाडी चालू करतो.... आता मिस्टर विश्वास मात्र चांगलेच भानावर आलेले असतात आणि थोड्या वेळापूर्वी भावनेच्या भरात आपण तिला काय बोलून बसलो याची त्यांना जाणीव होते... तसे ते आपल्या केसांमधून हात फिरवत एक नजर भार्गवी कडे पाहतात... तर भार्गवी आपली नजर खाली झुकवून शांतपणे बसलेली असते...

" Are you ok? " मिस्टर विश्वास एक नजर तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिला विचारतात.... आपण भावनेच्या भरात बोलून गेलो तर खरं पण तिला या गोष्टीचा वाईट तर वाटणार नाही ना असा विचार मनामध्ये येऊन त्याच्या मनाची चलबिचल होऊ लागते...

" Hmmm... " बारावी फक्त हलकाच हुंकारा भरते....

" ते मगाशी मी जे बोललो ... ते ऐकून तुला वाईट वाटले का? " तिच्या चेहऱ्यावरून तिच्या मनामध्ये चाललेल्या विचारांचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत असतात परंतु तिची शांतता मात्र त्यांना सहन होत नाही शेवटी हिंमत करून ते तिला विचारतात...

" हुं: तुम्ही काही बोललात का ? " भार्गवी आपल्या विचारातून गडबडून भानावर येत त्यांच्याकडे पाहून त्यांना उलट प्रश्न विचारते....

" काही नाही... " म्हणजे हिने आपल काहीही बोलणं ऐकलं नाही किंवा ती सध्या काहीही समजण्याच्या मनस्थितीत नाही... या गोष्टीची जाणीव त्यांना होते आणि पुन्हा एकदा त्यांच्या मनाला थोडा त्रास होतो, कारण खूप मुश्किलीने त्यांच्या तोंडातून ते शब्द बाहेर पडले होते आणि तरीही तिच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही... ते शांतपणे तिला उत्तर देतात आणि आपल्या तोंडावरून , केसांवरून हात फिरवत गाडी चालू करतात....

भार्गवी आता त्यांचं बोलणं ऐकून भानावर येते... ती खिडकीच्या बाहेर बघत या आधी ते काय बोलले होते याचा विचार करू लागते.... गाडी शहराच्या रस्त्यावर पोहोचलेली असते... मिस्टर विश्वास आपल्या घड्याळा मध्ये वेळ पाहतातआणि एखादा चांगला रेस्टॉरंट पाहून गाडी थांबवतात.... गाडी थांबल्याचा आवाज पाहून भार्गवी नजर उचलून बाहेरच वातावरण पाहू लागते...

" आपल्याला घरी पोहोचायला अजून एक तासभर तरी लागेल आणि आता जेवणाची वेळ झाली आहे त्यामुळे विचार केला जेवण करूनच घरी जाऊया... तुलाही भूक लागली असेल ना ? " मिस्टर विश्वास गाडीतून खाली उतरून तिच्या बाजूचा दरवाजा उघडून तिकडे पाहून तिला सांगतात... त्यांचं बोलणं ऐकून तिलाही भुकेची जाणीव होते.... भार्गवी त्यांच्याकडे पाहून होकारात मान हलवते...

" चला मग... " मिस्टर विश्वास हलकट हसून तिच्यासमोर हात पकडतात... भार्गवी एक नजर त्यांच्या हाताकडे पाहून गाडीतून खाली उतरण्यासाठी त्यांचा हाताचा आधार घेत असते की तिचा तोल जातो... मिस्टर विश्वास पटकन तिच्या कमरेला हाताने पकडून तिला सावरतात... तिच्या तोंडातून बाहेर पडलेला सुस्कारा ऐकून मात्र ते काळजीने तिच्याकडे पाहू लागतात....

" भार्गवी , तुला काही त्रास होत आहे का ? " तिच्या चेहऱ्यावर पसरलेली दुःखाची लहर पाहून ते काळजीने विचारतात....

" मग आज पासून काही जाणवलं नाही पण आता उठत असताना पायाला हलकीच कळ जाणवली... " भार्गवी आपल्या पायाकडे पाहत त्यांना उत्तर देते.... तशी त्यांची नजर ही तिच्या पायावर जाते... धर्मेश ने तिला ढकलल्यामुळे ती पडलेली असते तिच्या हाता पायाला खरचटलेले असते, पण तेव्हा धर्मेश आणि रोहन या दोघांचे खरे रूप पाहून मात्र ती स्वतःच दुखणं विसरून गेली होती... आता उठताना मात्र तिला आपला पाय जरा जास्तच ठणकत आहे असे वाटू लागले....

तिच्या दोन्ही पायाला पाहून, गुडघ्याच्या जवळ फाटलेली लैगिन्स पाहून मिस्टर विश्वास यांना सौरभने सांगितलेली गोष्ट आठवली..... धर्मेशने भार्गवी लागते दरवाजा म्हणून खाली ढकलून दिले होते आणि तिला लागले होते हे आठवून त्यांना परत एकदा भरून आले....

' इतका वेळ ती बिचारी अशी शांत बसून आहे आणि आपण तिच्या लागलेल्या जखमांकडे दुर्लक्ष केले... एवढी छोटी गोष्ट आपल्या कशी लक्षात राहिले नाही...' असा विचार करून ते स्वतःलाच दोष देऊ लागले....

विश्वास यांनी समोरच्या रेस्टॉरंट कडे पाहिले.... ते रेस्टॉरंट मोठे आणि आलिशान असल्यामुळे त्याच्या दरवाज्यात उभा असलेला वॉचमॅन लगेच त्यांच्या दिशेने पुढे आला... मिस्टर विश्वास यांनी त्या वॉचमन कडे गाडीची चावी दिली आणि त्याला गाडी पार्किंग मध्ये लावायला सांगितले... एक नजर भार्गवी कडे पाहून त्यांनी आपल्या दोन्ही हाताच्या भाया फोल्ड केल्या आणि तिला काहीही न विचारता डायरेक्ट आपल्या दोन्ही हातावर उचलून घेतले...

त्यांचे असे अचानकपणे वागणे पाहून भार्गवी गोंधळलेल्या नजर ने त्यांच्याकडे पाहू लागली.... पडण्याच्या भीतीने तिने पण आपल्या दोन्ही हातांनी त्यांच्या शर्टाची कॉलर घट्ट पकडून ठेवली.... मिस्टर विश्वास तिला तसेच उचलून घेऊन हॉटेलच्या रिसेप्शन एरियामध्ये आले... त्यांनी तिकडे प्रायव्हेट एरियाची इन्क्वायरी केली... त्या रीसेप्शनिस्टने एक नजर भार्गवी कडे पाहून त्यांना एका दिशेला जायला सांगितले....

तिकडे असलेला एक बेटर त्यांना दिशा दाखवण्यासाठी त्यांच्यासोबत चालत होता.... मिस्टर विश्वास भार्गवीला घेऊन त्याच्या मागे जात होते... सगळ्यांच्या आपल्यावर असलेल्या नजरा पाहून मात्र भारकविला काहीच सुचत नव्हते... तिचा पाय जास्त दुखत असल्यामुळे त्यांना खाली सोडायला ही सांगू शकत नव्हती....

मिस्टर विश्वास तिला घेऊन प्रायव्हेट एरिया मध्ये आले आणि तिकडे असलेल्या एका सोफ्यावर भार्गवी ला व्यवस्थित बसवले...

" तुमच्याकडे फर्स्ट एड बॉक्स मिळेल का ? " मिस्टर विश्वास यांनी त्या वेटर कडे पाहून त्याला विचारले... त्या वेटरने एक नजर भार्गवी कडे पाहिले आणि होकारात मान हलवली....

" मला तुझ्याकडून अजून एक छोटी मदत पाहिजे होती... " असे बोलून मिस्टर विश्वास त्या बेटर सोबत दरवाजा मधून थोडे बाहेर आले.... भार्गवी मात्र तिकडेच शांतपणे बसून आजूबाजूचे निरीक्षण करत होती...

प्रायव्हेट एरिया असल्यामुळे त्या रूम मध्ये ती एकटीच होती.... मधोमध गोलाकार मोठा असा टेबल होता.... त्या टेबलच्या बाजूने खुर्च्या ठेवलेल्या होत्या..... एका बाजूला सोफा होता आणि सोफ्या समोरही काचेची छोटी ट्रॉली होती.... एका बाजूला काचेची मोठी भिंत होती जी पट्टीदार पडद्याने झाकली होती... तर दुसऱ्या बाजूला एक मोठा टीव्ही होता , तो सध्या बंद होता....

थोड्यावेळाने मिस्टर विश्वास आत आले त्यांना बघून भार्गवी ने परत आपली नजर खाली झुकवली....

" हे मेनू कार्ड आहे... तुला काय खाऊ वाटतं ते ऑर्डर कर... " तिला अशा शांत बसलेले पाहून त्यांनी स्वतःच टेबलवरचे मेनू कार्ड उचलून तिच्या हातात दिले....

" तुम्हीच काहीतरी ऑर्डर करा ना... " भार्गवीला दुखत असल्यामुळे सध्या काही सुचत नव्हते त्यात मिस्टर विश्वास यांच्या स्पर्शानेही तिचे डोकं बधीर झाले होते... त्यांचे असे प्रेमाने हक्क गाजवणे तिला काहीतरी वेगळेच फील करून जात होते, पण सध्या धर्मेश मुळे मिळालेले दुःखही मोठे असल्यामुळे तिला काही समजत नव्हते...

" ठीक आहे... " तिची मनस्थिती समजून ते स्वतःच तिच्या बाजूला बसले आणि ते मेनू कार्ड आपल्या हातात घेऊन त्यात असलेल्या पदार्थांची नावे वाचू लागले...

🎭 Series Post

View all