Login

लग्न – एक छलावा भाग ७१

सात फेऱ्यांमध्ये लपलेले गुढ रहस्य
" आता आम्हालाही इकडून जायला पाहिजे.... तुम्ही दोघे पण तुमची काळजी घ्या... " मिस्टर विश्वास त्या दोघांकडे पाहून त्यांना बोलतात... दीक्षा भार्गवी कडे पाहून लगेच तिच्या गळ्यात पडते.... माहित नाही का पण त्यांच्यामध्ये एक वेगळेच बंध निर्माण झाल्यासारखे त्यांना वाटू लागते.... त्या दोघींच्याही डोळ्यांमध्ये अश्रू येतात.... त्या दोघी पण एकमेकींना बिलगुन रडू लागतात.... सौरभ आणि मिस्टर विश्वास दोघे पण त्यांच्याकडे पाहत असतात......

आत्ता पुढें,

" दीक्षा, तुमचे दोघींमध्ये हे सुंदर बहिणीचे नाते तयार झाले आहे आता हे कायम असेच ठेवायचे... तू इकडे ये आदिवासी पाड्या मध्ये राहते आणि भार्गवी तिकडे शहरात म्हणून तुमचं नातं संपुष्टात आणायचे नाही.... सौरभ तुला शहरात घेऊन येत जाईल भार्गवी ला भेटायला आणि भार्गवी पण अधून मधून इकडे येऊन तुम्हाला भेटेल...

तुमच्या कॉलेज साठी जेव्हा तुम्ही शहरात येणार तेव्हा हक्काने येऊन तिच्या घरी राहत जावा.... हो ना.... " मिस्टर विश्वास प्रेमाने दीक्षा कडे पाहून बोलतात....

" हो दीक्षा, अग या जगामध्ये खरी नाती, खरी माणसं खूप मुश्किलीने भेटतात.... माझ्या आयुष्यात आजपर्यंत जी पण काही वाईट झालं त्याच्या बदल्यात देवाने माझ्या आयुष्यातले दुःख दूर करण्यासाठी तुझ्या रूपात एक गोड लहान बहिण दिली आहे आता मी हे नाते कधीच गमावणार नाही.... मी तुला भेटायला नक्की येत जाईल आणि तू पण मला भेटायला तिकडे शहरात यायचं आहे.... सौरभ घेऊन येशील ना रे माझ्या बहिणीला... " भार्गवी हळव्या स्वरात त्या दोघांकडे पाहून बोलते....

" हो ताई , मी जर तुमच्या बहिणीला तुम्हाला भेटायला घेऊन आलो नाही तर तुमची बहीण मला शांतपणे जगू देईल का ? " त्या दोघींचा हळवा पणा पाहून सौरभ मस्करीच्या स्वरात बोलतो.... त्याचं बोलणं ऐकून सगळेच हसू लागतात....

" भार्गवी , आता आपल्याला निघावे लागेल... " मिस्टर विश्वास शांतपणे तिच्याकडे पाहून तिला सांगतात...

" हो ताई तुम्ही व्यवस्थितपणे जा आणि तिकडे गेल्यावर मला फोन करा... या सगळ्या दृष्ट माणसांना योग्य ती शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि ती मिळेलच कारण विश्वास सरांनी तसा प्रयत्न केला आहे..... कोर्टाची तारीख आम्हाला सांगा म्हणजे आम्ही पण तिकडे हजर होऊ.... " दीक्षा त्या लोकांकडे बघून बोलते... ते दोघेपण होकारात मान हलवतात... मिस्टर विश्वास पुढे जाऊन तिकडे असलेली आपली कार मध्ये जाऊन बसतात आणि कार चालू करून त्या सगळ्यांच्या समोर घेऊन येतात...  मिस्टर विश्वास गाडीमधून खाली उतरतात आणि ड्रायव्हिंग सीट च्या बाजूचा दरवाजा उघडतात.... भार्गवी त्या दोघांचा निरोप घेऊन गाडीमध्ये बसते....

" तुम्ही दोघे पण बसा तुम्हाला मी मेन रोडवर सोडतो मग तिकडून तुम्ही तुमच्या पाड्यांमध्ये जाऊ शकता ना ? " मिस्टर विश्वास त्या दोघांकडे पाहून त्यांना बोलतात... ते दोघे पण गाडीमध्ये मागच्या सीटवर जाऊन बसतात.... मिस्टर विश्वास गाडीमध्ये बसतात आणि गाडी चालू करतात.... तिकडून असलेल्या खडतर रोड वरून गाडी पुढे जाऊ लागते.... सौरभ आणि दीक्षा त्या लोकांचं बोलणं रेकॉर्डिंग करण्यासाठी झाडाचा आढावा घेऊन असे काही लपलेले असतात आणि त्यांच्या मागोवा घेत इथपर्यंत पोहोचलेले असतात त्यामुळे सौरभने स्वतःची गाडी आणलेली नसते.... मिस्टर विश्वास यांच्या प्लॅनिंग नुसारच हे सगळं केलेले असते...

गाडीमध्ये भार्गवी आणि दीक्षा दोघींची ही बडबड चालू असते... त्या दोघी पण रिलॅक्स झाल्या आहेत हे पाहून सौरभ आणि मिस्टर विश्वास दोघांनाही बरं वाटतं.... मिस्टर विश्वास गाडी मेन रोडवर घेऊन येऊन थांबवतात.... सौरभ आणि दीक्षा दोघेपण गाडीतून खाली उतरतात आणि त्यांचा निरोप घेऊन तिकडून त्यांच्या पाड्याच्या दिशेने निघून जातात... ते दोघेही नजरेआड होईपर्यंत त्यांची गाडी तिकडेच थांबलेली असते त्यानंतर एक नजर बाहेरगावीकडे पाहून मिस्टर विश्वास गाडी चालवायला सुरू करतात.....

दीक्षा गेल्यामुळे भार्गवी पुन्हा एकदा उदास होते आणि तिच्यासोबत घडलेल्या सगळ्या घटना तिला आठवू लागतात.... ती शांतपणे गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत आपल्या विचारात हरवलेली असते...

" भार्गवी... " मिस्टर विश्वास शांतपणे तिचे नाव आपल्या मुखातून उच्चारतात तशी ती आपल्या विचारातून बाहेर येऊन त्यांच्याकडे पाहू लागते...

" तू खूप हुशार आहेस... ऍक्टिव्ह आहेस , इंडिपेंडेंट आहेस.. स्वतः कष्ट करून आपल्या आयुष्यामध्ये इतकी पुढे गेलीस मग फक्त आपल्या आयुष्यात प्रेम यावं यासाठी तू अशा दृष्ट माणसांवर विश्वास कसा काय ठेवलास ? अग प्रेमाचे भुकेले तर सगळेच असतात पण म्हणून त्या प्रेमासाठी कोणी डोळ्यावर पट्टी बांधून समोरच्यावर विश्वास तर ठेवत नाही ना..

धर्मेश च्या बाबतीत तुझ्या सोबत असेच झाले... त्याच्या बाबतीत त्याने दाखवलेले खोटे प्रेम पाहून तू मनापासूनच त्याचा विचार केला कधीतरी डोक्याचा वापर करून एकदा त्याच्या वागण्याचा विचार केला असतास तर आज तुझ्यासोबत असे घडले नसते... " मिस्टर विश्वास थोड्या धारधार शब्दात तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतात... तिला झालेल्या त्रासामुळे त्यांच्याही मनाला असंख्य वेदना झालेले असतात परंतु सध्या आपल्या मनातल्या भावना ते तिच्यासमोर मांडू शकत नव्हते म्हणून मग त्या भावना अशाप्रकारे बाहेर निघत होत्या....

त्यांचे असे राकेश शब्द कानावर पडल्यामुळे भार्गवीला अजूनच वाईट वाटू लागले.... आपल्या एका चुकीच्या मागणीचे दुष्परिणाम इतके भयानक होऊ शकतात याचा विचार करूनच तिचे मन आतून थरथरू लागले होते....

" तुम्ही बरोबर बोलत आहात... खरंच मी खूप मोठा मूर्खपणा केला.. आपल्या आयुष्यात प्रेम यावे म्हणून मी स्वतःच आयुष्य बरबाद करून घेतलं.... कॉलेजमध्ये चांगले मार्क्स मिळावे म्हणून मी किती मेहनत केली होती, त्या मेहनतीमुळेच मला एवढ्या चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी मिळाली होती, माझ्या आवडत्या ठिकाणी मी स्वतःचे असे हक्काचे घर घेतले होते, किती आनंदात राहत होते मी पण माझ्या एका मूर्खपणामुळे या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लांब गेल्या....

माझ्यामुळेच माझ्या आजीला ही खूप त्रास झाला.... मी खूप वाईट आहे त्यामुळे माझ्यासोबत ही असे सगळे वाईट घडले.... ज्या व्यक्तीने लहानपणापासून माझा सांभाळ केला त्या व्यक्तीलाच मी इतका त्रास दिला... मला तर आता असे वाटत आहे की , मला हे आयुष्य जगण्याचा काही अधिकार नाही.... " भार्गवी बोलतच आपले दोन्ही पाय सीटवर घेऊन , आपल्या गुडघ्यांवर डोकं ठेवून रडू लागते....

मिस्टर विश्वास हे फक्त तिला तिची चूक दाखवून देण्याचा प्रयत्न करत होते , परंतु तिला असे अचानक रडताना पाहून मात्र ते स्वतः खूप गडबडून गेले.... भार्गवी ने आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये आपलं तोंड खूप सुंदर हातांनी कवटाळून हमसून हमसून रडत होती .... तिचा रडणं पाहून मात्र मिस्टर विश्वास यांचा डोकं बधिर होऊ लागले... तिला कसं शांत करावे हे त्यांना सुचत नव्हते त्यांनी रोडच्या कॉर्नरला गाडी थांबवली आणि तिच्या दिशेने थोडे झुकत तिच्याकडे पाहू लागले...

" भार्गवी प्लिज ! तू पहिला रडणं बंद कर... तुला वाईट वाटावे म्हणून हे सगळं नाही बोललो, तुला समजवण्यासाठी मी बोलत होतो..... प्लीज, अशी नको रडूस आय एम सॉरी हे बघ माझी चूक झाली... मी पुन्हा तुला असं समजवणार नाही... " मिस्टर विश्वास तिच्या दिशेने झुकत तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते परंतु ती काही केल्या आपलं डोकं वर काढून त्यांच्याकडे बघायला तयारच नव्हती.... तिचा रडणं तसंच चालू होतं...

मिस्टर विश्वास पूर्णपणे गोंधळून गेले.... तिला शांत कसं करावं हेच त्यांना समजत नव्हते.... आपले दोन्ही डोळे घट्ट मिटून ते आपल्या चेहऱ्यावरून केसातून हात फिरवत आपल्या इमोशनला कंट्रोल मध्ये करण्याचा प्रयत्न करू लागले..... पण तिचा तो रडका आवाज त्यांना काही सुधरू देत नव्हतं.... तिला शांत करणे ही त्यांना आता जास्त महत्त्वाचे वाटत होत...

मिस्टर विश्वास यांनी हिंमत करून आपला एक हात पुढे केला आणि तिच्या मानेवरून कानाच्या दिशेने फिरवला.... अचानक त्यांच्या झालेल्या स्पर्शामुळे इकडे भार्गवीच्या तोंडातून आवाजच बाहेर निघत नव्हता..... आपला श्वास तसाच रोखून भार्गवीने हळूच आपला चेहरा वर काढला आणि त्यांच्याकडे पाहू लागली....

रडल्यामुळे तिचे डोळे लाल झाले होते... तिच्या त्या लाल झालेल्या पानावर गेलेल्या डोळ्यांकडे पाहून मात्र मिस्टर विश्वास यांच्या हृदयाला खोलवर त्रास होऊ लागला.... त्यांनी तसाच आपला दुसरा हातही पुढे केला आणि दोन्ही हातांच्या बोटांनी तिच्या डोळ्यात असलेले अश्रू टिपले....

त्यांच्या अशा कृतीमुळे भार्गवीनेही गडबडून आपली नजर हलकीच वर करून त्यांच्या डोळ्यात पाहिले... दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडल्या होत्या... दोघेही एकमेकांच्या नजरेमध्ये पाहत होते.... मिस्टर विश्वास यांच्या नजरेमध्ये भार्गवीला काहीतरी वेगळेच जाणवले....

" माझा तुला दुखावण्याचा खरंच हेतू नव्हता... तुझ्या डोळ्यांमध्ये हे अश्रू मी नाही पाहू शकत.... हे अश्रू जरी तुझ्या डोळ्यात असले तरी त्रास मात्र ते माझ्या हृदयाला जास्त देतात, त्यामुळे यापुढे रडताना आधी माझ्या हृदयाचा विचार करत जा... जर तुला मला त्रास देण्याची इच्छा असेल तर बिंदास रडत जा.... " मिस्टर विश्वास तिच्या डोळ्यात पाहत हळव्या स्वरात बोलतात....