Login

लग्न – एक चला वा भाग ७०

सात फेऱ्यांमध्ये लपलेले गुढ रहस्य
" तू माझ्याकडे बघून घाबरावे असे मलाही अजिबात वाटत नाही , पण काय करू तू इतके वाईट कर्म केलेली आहे की , आता त्या कर्माची शिक्षा एकेक करून तुला मिळायला पाहिजे ना.... " मिस्टर विश्वास त्याच्यासोबत बोलत त्याला त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घेऊन आलेले असतात.... धर्मेश ही घाबरून खाली पाहू लागतो...

आत्ता पुढें,

तिकडे उपस्थित असलेले सगळे आश्चर्याने त्या दोघांकडे पाहू लागतात... मिस्टर विश्वास त्याला इमारतीच्या वर घेऊन जाऊन काय करणार आहे त्याचा अंदाज बहुतेक त्यांच्या मित्राला आलेला असतो त्यामुळे तो देखील शांतपणे उभा राहून समोरचे दृश्य पाहत असतो.....

भार्गवी मात्र अजूनही प्रश्नार्थक नजरेने मिस्टर विश्वास यांच्याकडे पाहत असते... हे नक्की धर्मेशला तिकडे कशासाठी घेऊन गेले ते अजूनही तिला समजलेले नसते... शुभम आणि दीक्षा भार्गवीच्या बाजूला उभे राहून विश्वास यांच्याकडे पाहत असतात...

" ए तू मला इकडे वर का घेऊन आला आहेस ? " धर्मेश मनातून तर खूप घाबरून गेलेला असतो तरीही चेहऱ्यावर न दाखवता त्याच्या कडे पाहून त्याला विचारतो...

" तुला खरंच जाणून घ्यायचा आहे का की,  मी तुला इकडे वर का घेऊन आलो आहे ते ? " मिस्टर विश्वास शांतपणे त्याच्याकडे पाहून त्याला विचारतात...

" ह... हो.... " धर्मेश एक नजर खाली जमिनीकडे पाहून त्याला उत्तर देतो...

" ओके... " असे बोलत मिस्टर विश्वास पुढचा काहीही विचार न करता सरळ धर्मेशला वरून खाली ढकलून देतात....

" आ ssssss.. " धर्मेश याच्या ध्यानीमनी काहीही नसताना अचानक लागलेल्या धक्क्यामुळे तो सरळ हवेत उडत खाली जाऊन पडतो.... 28 फुटाच्या उंचीवरून खाली पडल्यामुळे त्याच्या हाता पायाला चांगलाच मार लागलेला असतो... शरीरातून रक्तही वाहू लागते..... धर्मेश च्या विव्हळण्याचा आवाज त्या पूर्ण वातावरणात घुमू लागतो....

अचानक धर्मेशला त्या रक्ताच्या थारोळ्यात पाहून भार्गवीही गोंधळलेल्या नजरेने एक नजर खाली जमिनीवर पडलेल्या धर्मेश कडे पहात एक नजर वर उभा असलेल्या मिस्टर विश्वास यांच्याकडे पाहू लागते... भार्गवीला त्यांच्या वागण्याचा अंदाज येत नाही...

" ताई मिस्टर विश्वास खूप चांगले आहे... त्यांनी तुझ्यासाठी एवढी सगळी पोलीस आर्मी इकडे बोलावून घेतली.... त्यांना रोहनवरही आधीपासून शक आला होता,  तसे त्यांनी आम्हाला फोन करून सांगितले होते...  हा सगळा त्यांचा प्लान होता तुला वाचवण्यासाठी......

धर्मेश तुझ्यासोबत असा वागला त्यांना धर्मेशला चांगलाच धडा शिकवायचा होता... आताही जेव्हा त्यांना समजले की,  धर्मेशने तुला ट्री हाऊसच्या दरवाजा मधून खाली ढकलले आणि तुझ्या हाता पायाला लागलेले आहे... ही गोष्ट बहुतेक त्यांना सहन झाली नाही आणि आता या गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्यांनी धर्मेशला एवढ्या मोठ्या इमारतीवरून खाली ढकलून दिले.... " सौरभ मिस्टर विश्वास यांचं वागणं पाहून भार्गवीला सांगण्याचा प्रयत्न करतो...

त्याचं बोलणं ऐकून भार्गवी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागते.... त्यांची ही नजर भार्गवीवर असते....

" या सगळ्या माणसांना आरेस्ट करा... तसेही आपल्याला यांच्या ठिकाणावरून यांच्या बद्दल खूप सारे पुरावे ही भेटले आहे.... हे सगळे पुरावे व्यवस्थितपणे पोलीस स्टेशनला घेऊन चला... " ते मुख्य अधिकारी आपल्या पोलिसांना ऑर्डर देत बोलतात....

" Yes Sir.... " तिकडे असलेले पोलीस होकारात्मान बदलतात आणि तिथे उभे असलेल्या सगळ्या माणसांना हातकडी घालतात...... अरुण आणि योगेश या दोघांच्याही हातात हातकडी घातली जाते...

" भार्गवी , भार्गवी यांना सांग मला सोडायला.... मी तुझा चांगला मित्रा आहे ना.... मी तुझ्याबद्दल कधी वाईट विचार करू शकतो का ? अग या धर्मेश ने मला असे करायला भाग पाडले होते.... खरंतर तुला पसरण्यासाठी त्याला शिक्षा भेटली पाहिजे.... मी तुला अजिबात फसवले नाही माझा यामध्ये काहीही हात नाही.... " पोलिसांना आपल्याजवळ येताना पाहून रोहन पटकन भार्गवी च्या जवळ जाऊन बोलतो.... त्याचं ते कळवळून बोलणं पाहून भार्गवीला काय बोलावे ते सुचत नाही....

" या सगळ्यांमध्ये तुझा काही हात आहे की नाही याबद्दल सिद्ध करण्यासाठी पोलीस आहे आणि तसेही त्यांच्या या काळ्या धंद्यामध्ये तु ही शामिल आहे त्यामुळे तुलाही शिक्षा मिळालीच पाहिजे ना.... जा आपल्या इतर मित्रांसोबत जेलमध्ये जाऊन तिकडे आता तुमची बाकीची प्लॅनिंग करा... " मिस्टर विश्वास हे भार्गवी विचार दिशेने पुढे येत असतानाच त्यांच्या कानावर रोहनचे शब्द पडतात.... भार्गवीला अजूनही शांत बसलेले पाहून ते पुढे होऊ शकतात रोहनला बोलतात...  त्याचबरोबर ते तिकडे असलेल्या पोलीस इन्स्पेक्टरला इशारा करतात... तसा तो पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्या जवळ येऊन रोहनच्या हातामध्ये हातकडी घालू लागतो....


" भार्गवी प्लीज!  प्लीज  तू यांना सांग ना मला सोडायला.... ते तुझं बोलणं नक्की ऐकतील... " रोहन अजूनही घाबरून भार्गवी कडे पाहून गयावया करत बोलतो....

" रोहन अरे , मी तर तुला माझा चांगला मित्र समजत होतेआणि तू माझ्या निर्मळ मैत्रीचा फायदा घेतला... माझ्या आयुष्यामध्ये प्रेमाची कमी आहे याची जाणीव तुला झाली होती आणि म्हणूनच तू मुद्दामून धर्मेशला माझ्याबद्दल सगळं सांगून माझा आयुष्य बरबाद करण्यासाठी घेऊन आलास ना... मित्र असे असतात का ?

आता तर मला तुला माझा चांगला मित्र म्हणण्याची पण लाज वाटत आहे... मैत्रीचे नाते हे सगळ्या नात्यांपेक्षा सगळ्यात सुंदर आणि अनमोल असते कारण या नात्यांमध्ये आपण आपल्या मनाने आपल्या इच्छेनुसार मित्र निवडलेले असतात आणि ते मित्र आपल्या प्रत्येक सुखा दुःखात मनापासून आपली साथ निभावतात.....

तुझ्यासारखी माणसच अशा पवित्र नात्याचा गैरवापर करून मैत्रीच्या नावाला गाळबोट लावतात... यापुढे कोणालाही त्याचा मित्र बोलू नको कारण तू कोणाचा मित्र बनण्याच्या लायकीचा नाहीस.... " भार्गवी आपल्या मनात असलेला राग काढून मोकळी होते...

मिस्टर विश्वास यांनी आज पहिल्यांदाच एवढ सगळं घडल्यावर भार्गवीला स्वतःसाठी स्टॅन्ड घेताना, स्वतःसाठी बोलताना पाहिलेले असते त्यामुळे ते समाधानाने तिच्याकडे पाहू लागतात....

" इन्स्पेक्टर या माणसाला माझ्या नजरेच्या समोरून घेऊन जावा.... मला या माणसाचा चेहराही बघण्याची इच्छा नाही.... " भार्गवी तिकडे उभे असलेल्या इन्स्पेक्टरकडे बघून बोलते...

" चल रे, लय झाली तुझी नाटकी... आता तुला जे काही बोलायचं असेल ते जेलमध्ये गेल्यावर बोल.. " इन्स्पेक्टर बोलतच त्याला तिकडून खेचून घेऊन जाऊ लागतात....

धर्मेश ला खूप मार लागल्यामुळे त्याची बोलण्याची ही कंडीशन नसते.... तिकडे असलेले दोन-तीन हवालदार मिळून त्याला उचलतात आणि गाडीमध्ये ठेवतात.....

" मला या सगळ्यांसोबत पुढे जावे लागेल.... तू भार्गवीला मागून घेऊन ये, पण तिला काही फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी पोलीस स्टेशनला यावे लागेल.... तसे एवढा अर्जंट येणे गरजेचे नाही.... तुम्ही दोघेपण उद्या सकाळी पोलीस स्टेशनला आला तरी चालेल.... " त्या अधिकारी पुढे येऊन विश्वास यांच्याकडे पाहून बोलतात....

" हो, ठीक आहे.... मी उद्या सकाळी भार्गवी ला घेऊन पोलीस स्टेशनला येईल.... " मिस्टर विश्वास एक नजर भार्गवी कडे पाहून आपल्या मित्राला सांगतात... तसे मुख्य अधिकारी त्याच्याकडे पाहून नजरेनेच इशारा करत तिकडून सगळ्यांना घेऊन आपल्या गाडीत बसून निघून जातात..... तिकडे पोलिसांच्या दहा ते बारा गाड्या येऊन थांबलेले असतात.... त्यातले काही पोलीस अजूनही त्या ठिकाणाची छानबिन करण्यासाठी तिकडे थांबलेले असतात... बाकीचे मात्र आपल्या गाडीमध्ये बसून तिकडून निघून जातात....

आता तिकडे सौरभ , दीक्षा, मिस्टर विश्वास आणि भार्गवी चौघेच उभे असतात...

" तुमच्या दोघांचे खरंच खूप मनापासून आभार... तुम्ही दोघेही जर योग्य होईल तिला भेटला नसता आणि तिची मदत केली नसती तर आज भार्गवी या सगळ्या संकटातून बाहेर पडू शकली नसती... या सगळ्या प्लॅनमध्ये पण तुम्ही माझी खूप मदत केली आहे... " मिस्टर विश्वास दीक्षा आणि सौरभ लोकांकडे पाहून कृतज्ञतेने बोलू लागतात....

" सर तुम्ही मी प्लीज ! असे आमचे आभार मानू नका... मी जे काय केले ते माझ्या मोठ्या बहिणीसाठी केले... आज भार्गवी ताईच्या रूपात मला माझी मोठी बहीण भेटली.... " दीक्षा हसून एक नजर भार्गवी कडे पाहून मिस्टर विश्वास यांना बोलते...

" अरे हो, तुमच्या दोघांना अजून एक गोष्ट सांगायची होती.... जेव्हा या केस संबंधित कोर्टामध्ये हियरिंग असेल, तेव्हा तुम्हाला पण गवाही देण्यासाठी तिकडे बोलावले जाईल..... मी तुमच्या येण्याची सगळी व्यवस्था करेल पण तुम्हाला कोर्टात यायला काही प्रॉब्लेम नाही ना ? " मिस्टर विश्वास त्या दोघांकडे पाहून त्यांना विचारतात....

" नाही... सर जेव्हापण कोर्टाची हिअरिंग असेल आम्हाला आधीच सांगा.... ताई साठी ताईच्या बाजूने गवाही देण्यासाठी आम्ही तिकडे हजर होणार.... " सौरभ समाधानाने त्यांच्याकडे पाहून बोलतो....

" आता आम्हालाही इकडून जायला पाहिजे.... तुम्ही दोघे पण तुमची काळजी घ्या... " मिस्टर विश्वास त्या दोघांकडे पाहून त्यांना बोलतात... दीक्षा भार्गवी कडे पाहून लगेच तिच्या गळ्यात पडते.... माहित नाही का पण त्यांच्यामध्ये एक वेगळेच बंध निर्माण झाल्यासारखे त्यांना वाटू लागते.... त्या दोघींच्याही डोळ्यांमध्ये अश्रू येतात.... त्या दोघी पण एकमेकींना बिलगुन रडू लागतात.... सौरभ आणि मिस्टर विश्वास दोघे पण त्यांच्याकडे पाहत असतात......