Login

लग्न – एक छलावा भाग ५०

सात फेऱ्यांमध्ये लपलेले गुढ रहस्य
अरुण ने आपल्या माणसांना त्याच्या त्या माणसाला ज्याने भार्गवीच्या आजीला तिच्या घरी सोडलेले असते,  त्याला शोधण्यासाठी त्याच्या घरी पाठवलेले असते.... ते लोक त्याच्या घरी आल्यावर त्यांना समजते की , तो माणूस त्याच्या घरी आलाच नाही...

आत्ता पुढें,

मिस्टर विश्वास आपल्या घराच्या जवळ पोहोचलेले असतात... ते गाडी गेटमधून आत घेत असतात की,  त्यांना गेटच्या बाहेर कोणीतरी उभं असलेली जाणवते म्हणून ते निरखून पाहू लागतात..... त्यांच्या गेटच्या बाहेर रोहन आणि मेघा दोघेपण उभे असतात...त्यांना तिकडे असे उभे पाहून मिस्टर विश्वास गाडी थांबवतात...

" सर प्लीज! आम्हाला फक्त एकदा तुम्हाला भेटायचं होतं आणि सगळं काही सांगत होतं, पण तुमची माणसं आम्हाला तुम्हाला भेटूच देत नाहीत... " रोहन त्यांच्याकडे पाहून काळजीच्या स्वरात बोलतो....

" तुम्हाला असे काय सांगायचे आहे ? " मिस्टर विश्वास प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारतात...

" सर आपण तुमच्या घराच्या आत जाऊन बोलू शकतो का , इकडे कोणीही आपल्याला बघू शकते... " रोहन आजूबाजूचे निरीक्षण करत बोलतो..

" ओके... " असे बोलून मिस्टर विश्वास काही आढेवेढे न घेता त्यांना आपल्या घरात घेऊन जातात... ते अजूनही विचार करत असतात की या लोकांना नक्की आपण कुठे पाहिले आहे...

" सर तुम्ही आम्हाला ओळखत नसाल कारण या आधी आपली कधीही भेट झाली नाही, पण आम्ही तुम्हाला ओळखतो आणि त्यासाठी आज इकडे आलो आहे... " घराच्या आत गेले बरोबर रोहन बोलायला सुरुवात करतो...

" हो बोला, माझ्याकडे असे काय काम आहे ? " विस्तार विश्वास शांतपणे सोप्यावर बसत त्यांना विचारतात....

" सर आम्ही दोघेपण भार्गवीचे मित्र आहोत... ती ऑफिसमध्ये लागल्यापासूनच आम्ही तिच्या सोबत आहोत... सर भार्गवीवर जे पण काही आरोप लागलेले आहेत ते चुकीचे आहेत... तीला या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे... " मेघा पटकन त्यांच्याकडे पाहून त्यांना सांगू लागते...

" अच्छा , तुम्ही इतक्या खात्रीने हे सगळं कसं काय सांगू शकता ? " मिस्टर विश्वास प्रश्नार्थक नजर आणि त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारतात...

" कारण ज्या दिवशी भार्गवीने तो पैशाचा घोटाळा केला होता... त्या दिवशी रात्रीच तिने मला फोन करून या सगळ्या बद्दल माहिती दिली होती... तिच्या नवऱ्याला म्हणजेच धर्मेशला आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी त्या पैशाची गरज होती, असे सांगून त्याने तिला त्या बँक अकाउंट ची डिटेल दिली आणि त्या बँक अकाउंट मधून पैसे ट्रान्सफर करून स्वतःच्या बँकेमध्ये सेव करायला सांगितले होते....

त्या रात्री इथे सगळी प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर थोड्या वेळासाठी जसा तिला वेळ मिळाला होता तसा तिने मला कॉल करून या सगळ्या गोष्टीची माहिती सांगितल... त्या कॉल ची रेकॉर्डिंग आणि ते सगळे पुरावे माझ्याजवळ आहेत.... " रोहन शांतपणे मिस्टर विश्वास यांच्याकडे पाहून सांगू लागतो...

" मग ही गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये येऊन तेव्हाच का नाही सांगितली... जर तुम्ही तेव्हाच समोर आला असता तर आज तुमच्या मैत्रिणीची निर्दोष सुटका झाली असती ना..... " मिस्टर विश्वास तरीही शंकेने त्या दोघांकडे पाहून बोलू लागतात...

" आम्ही तेव्हाच सगळ्यांच्या समोर येऊन सांगणार होतो पण भार्गवीनेच आम्हाला अडवले... तिने त्या रात्रीच मला सांगितले होते की , पुढे काहीही होऊ शकते पण या सगळ्यांमध्ये तुम्ही दोघे कुठेही पुढे येणार नाही असे वचन द्या..... तिने आम्हाला कोर्टामध्ये येण्यासाठी ही नकार दिला होता... तरीही एकदा आम्ही दोघे पण आमचा अवतार चेंज करून कोणालाही कळणार नाही असा वेश धारण करून तिला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलो होतो... तेव्हा या सगळ्या कंप्यूटर च्या डिटेल्स ची एक कॉपी मी पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह केली होती तो पेन ड्राईव्ह तिने मला मागितला होता आणि तो मी तिला दिला होता....

तिने आम्हाला कोर्टामध्ये येण्यासाठी नका दिला होता कारण धर्मेशला आमच्यावर संशय येऊ नये, पण मागून आम्ही धर्मेश वर नजर ठेवत होतो.... " रोहन त्यांच्याकडे पाहून त्यांना सगळं काही सांगू लागतो....

" भार्गवीने जर तुम्हाला कोणासमोर यायला नाही सांगितले असताना देखील तुम्ही आज माझ्यासमोर का आलया आहात ? " मिस्टर विश्वास तरीही आपल्या मनातली शंका दूर करण्याचा प्रयत्न करतात....

" सरकारनामाला आमच्या मैत्रिणीचे खूप काळजी वाटत आहे... ज्या दिवशी तिला दुसऱ्या जेलमध्ये जाण्यासाठी हलवण्यात आले आणि मध्येच तिचे किडनॅप झाले , तेव्हापासूनच आम्ही कोणाच्याही नकळत तिला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत... या सगळ्यांमध्ये आमच्या हातात काही पुरावे ही सापडले आहेत.... जेव्हा आम्ही तिला जेलमध्ये जाऊन भेटलो होतो, तेव्हा तिने आम्हाला तुमच्याबद्दल सांगितले होते.. तुम्ही तिला सोडवण्यासाठी धडपड करत आहात हे पण तुम्ही सांगितले होते म्हणूनच शेवटचा आधार म्हणून आम्ही दोघेपण तुमच्याजवळ आलो आहोत.... " रोहन त्यांच्याकडे पाहून कळवळीने बोलतो....

" सरकारचा मला आमच्या मैत्रिणीचे खूपच काळजी वाटत आहे.... यावेळी नक्की कुठे असायला आणि सुखरूप असेल का ? तिने जेव्हा धर्मेश सोबत लग्न करायचा निर्णय केला होता तेव्हाचा मला तिच्या या निर्णयावर थोडी शंका आली होती.... त्या थर्मेश चा स्वभाव थोडा विचित्र होता , पण तो भार्गवी समोर एकदम साळसूद असल्याचा आव आणायचा.... तुझ्या समोर सगळ्यांसोबत खूप छान प्रकारे वागायचा... त्याने तिला आपल्या जाळ्यात अशाप्रकारे अडकवले होते की तिला दुसऱ्या कोणासोबत जास्त बोलायलाही वेळ देत नव्हता... त्यांच्या लग्नाला फक्त दोन अडीच महिनेच पूर्ण झाले होते.... त्याच्या आधी त्यांची भेट होऊ नये फारसे दिवस झाले नव्हते, त्याने लगेचच तिला लग्नाची मागणी घातली.... तिला विचार करण्यासाठी ही वेळ दिला नाही....

भार्गवी पहिल्यापासून आपल्या आजी सोबत फक्त राहणारी ती, तिला समोरून असे प्रेम मिळाल्यावर बिचारी काय करणार... जेव्हापासून या ऑफिसमध्ये नवीन लागली होती, तेव्हापासून आम्ही तिला ओळखत होतो .... कधीही कोणासोबत उलट शब्द बोलत नव्हती, सगळ्यांवर सोबत प्रेमाने वागत होती.... आमच्या ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफला ते आवडत होती....

एवढेच काय तर मधल्या काही दिवसात आमचे सर स्वतः एका मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकले होते त्यांचा सॉफ्टवेअर मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आला होता अशावेळी जर भार्गवीने त्यांची मदत केली नसती त्यांचा खूप मोठा लॉस झाला असता... भार्गवीने आपल्या पनाने त्यांची मदत केली आणि त्यांना या सगळ्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढले.... " मेघा मिस्टर विश्वास यांना सगळी घडलेली घटना सांगू लागली....


" जर भार्गवीने तुमच्या सगळ्यांची एवढी मदत केली होती तर तुम्ही कोणीही कोर्ट मध्ये का आला नव्हता ? ती वेळ प्रसंगी तुमच्या सगळ्यांच्या मदतीला धावून आली पण जेव्हा तिला गरज होती तेव्हा तुमच्यापैकी कोणीही तिकडे आले नाही... " मिस्टर विश्वास थोड्या रागानेच त्या दोघांकडे पाहून बोलत होते....

" सर तुम्ही चुकीचा विचार करत आहात... ऑफिसमध्ये सगळेजण तिला वाचवण्यासाठी तिकडे यायला तयार होते, पण धर्मेश ने ऑफिस मध्ये येऊन त्या सगळ्यांना अडवले.... तिकडे कोणीही येऊ नये असे बजावले ... त्याने सगळ्यांना आपल्या बोलण्यामध्ये इतक्या चांगल्या प्रकारे कन्व्हेन्स केले की त्याचे बोलणे सगळ्यांना बरोबर वाटले आणि म्हणून ऑफिसमध्ये कोणीही तिकडे आले नाही...." मेघा मिस्टर विश्वास यांच्याकडे पाहून ऑफिसमध्ये घडलेले सगळी गोष्ट सांगू लागते....

" सर जेव्हा भार्गवी इकडे जेलमध्ये होती.. तेव्हा धर्मेश ला आमच्या निकम सरांनी फोन केला होता आणि ऑफिसमध्ये बोलावलं होतं तेव्हा ऑफिसमध्ये आला आणि निकम सरांसोबत त्यांच्या केबिनमध्ये बसला असताना त्याने... " असे बोलत रोहनने त्या दोघांमध्ये झालेले सगळे बोलणे मिस्टर विश्वास यांच्या कानावर घातले.....

" हे सगळं तुला कसं माहित ? " मिस्टर विश्वास यांनी त्याला विचारले....

" सर जेव्हा तो निकम सरांच्या केबिनमध्ये बसला होता तेव्हा मी केबिनच्या दरवाजाच्या जवळ जाऊन हळूच त्या दोघांचं बोलणं ऐकलं होतं... तेव्हाच मला समजले की नक्कीच या धर्मेश च्या मनामध्ये काहीतरी वेगळेच शिजत आहे.... मी या सगळ्या बद्दल भार्गवीलाही सांगितले... तेव्हाच तिने मला धर्मेश बद्दल सगळे पुरावे शोधण्यासाठी सांगितले आणि तुम्ही तिची मदत कराल याबद्दल ती बोलली होती म्हणून आज आम्ही तुमच्या जवळ आलो आहे.... " रोहन शांतपणे त्यांच्याकडे पाहून बोलतो....

" सर मला तरी असंच वाटत आहे की नक्कीच धर्मेशने तिला गायब केले असणार आणि आता ती त्याच्याच तब्येत असणार.... तो तिच्यासोबत काहीही चुकीचे करू शकतो.... तुम्ही प्लीज तुला शोधण्याचा प्रयत्न करा... " मेघा हात जोडून कळवायला मिस्टर विश्वास यांच्याकडे पाहून बोलू लागते ...

" तुम्हा दोघांनाही घाबरण्याची काही गरज नाही तुमची मैत्रीण सुखरूप आहे.... ती सध्या कुठे आहे हे मला तरी माहित नाही पण तिला ज्या गुंड माणसांनी किडनॅप केले होते त्यांच्या तावडीतून ती सुटली आहे.... " मिस्टर विश्वास हे शांतपणे त्या दोघांकडे पाहून त्यांना सांगतात....