" हो चालेल.... आजच्या दिवसात तू जी काही माहिती दिली आहे मी त्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित शहानिशा करून ठेवतो आणि पोलीस स्टेशनला जाऊन एकदा तुझे ते सगळे सामान पाहतो..... उद्या नक्की फोन कर.... मी तुझ्या फोनची वाट पाहीन... " मिस्टर विश्वास बोलतात आणि मग दोघे पण फोन ठेवून देतात...
आत्ता पुढें,
भार्गवी फोन ठेवून देते... सौरभ ती फोनवर बोलेपर्यंत आजूबाजूच्या रस्त्यावर नजर ठेवून उभा असतो , जेणेकरून जर कोणी आले तर वेळीच सावध होत आहे...
" सौरभ... " भार्गवी त्याला आवाज देते तसा तो मागे वळून तिच्याकडे पाहतो....
" ताई तुमचं बोलणं झालं असेल तर आपण निघूया का ? " सौरभ ला दीक्षा ची काळजी लागलेली असते त्यामुळे तो तिच्याकडे पाहून तिला विचारतो...
" हो, बर ऐक ना... मी विश्वास यांना तुझा नंबर देऊन ठेवला आहे... जर का काही इमर्जन्सी असेल आणि माझा नंबर लागला नाही, तर ते तुझ्या नंबर वर फोन करतील तुला चालेल ना... " भार्गवी सहजपणे विचारते...
" हो ताई काही प्रॉब्लेम नाही... उलट तुम्ही बरच केलं कारण तुमचा फोन तर त्या ठिकाणी लागणार नाही पण माझ्या फोनला आमच्या पाड्यांमध्ये थोडीफार रेंज असते जर काही अर्जंट काम असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो... " सौरभ पण स्मितहास्य करत उत्तर देतो....
" चला , लवकर निघूया... दीक्षा बिचारी एकटीच घरी बसली आहे... " भार्गवी पण तिच्या विचार करते... दोघे पण चालत जिकडे बाईक ठेवलेली असते तिकडे येतात... तिकडून मग बाईकवर बसून घराचा रस्ता पकडतात... काही वेळानंतर ते त्या ट्री हाऊस जवळ पोहोचल्यावर तिथे झाडाच्या आडोशालाच बाईक पार्क करून घराजवळ येतात...
दरवाजा वरचा आवाज ऐकून दीक्षा पटकन दरवाजा उघडते आणि त्या दोघांना आपल्यासमोर पाहून खुश होते...
" ताई तुम्हाला जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पाठवायचे होते ते तुम्ही पाठवले ना ? " दीक्षा तिच्याकडे पाहून तिला विचारते...
" हो, आज तुमच्या दोघांमध्ये माझा एक महत्त्वाचं काम पूर्ण झाला आहे... आता बघूया पोलिसांनी जर लवकर ॲक्शन घेतली तर त्या सगळ्या माणसांना लवकरात लवकर ताब्यात घेता येईल... " भार्गवी पण सुस्कारा सोडत खाली बसत उत्तर देते...
" ठीक आहे, आता आलाच आहात तर गरमागरम जेवण करून घेऊया का ? " दीक्षा त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारते तसे ते दोघे पण प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागतात...
" तुम्ही लोक असे काय माझ्याकडे बघत आहात... आता तुम्ही दोघं इकडे नसताना आम्ही एकटी बसून काय करणार म्हणून मग मी आपल्या तिघांसाठी जेवण बनवले... तसे मी ताई साठी सामान घेऊन आले होते मग विचार केला की , तुम्ही दोघं जोपर्यंत तुमच्या कामात बिझी आहात तोपर्यंत मीच आपल्या तिघांसाठी इकडे जेवण बनवते... " दीक्षा त्या दोघांकडे पाहून आनंदाने बोलू लागते...
" दीक्षा खरंच आज तुझ्या रूपात मला लहान बहिण भेटली आहे... तू किती माझा विचार करतेस ग ! " भार्गवी पण खुश होऊन तिच्याकडे पाहून बोलू लागते... जे प्रेम ती इतके दिवस धर्मेश मध्ये शोधण्याचा प्रयत्न करत होती तेच प्रेम आता तिला अनोळखी या व्यक्तींमध्ये भेटत होतं...
" ताई लहान बहीण पण बोलतेस आणि अशी उपकाराची भाषा पण करतेस... ते काही नाही आता मी तुझी लहान बहिण आहे ना मग माझं ऐकावंच लागणार... " दीक्षा पण लगेच तिच्याकडे पाहून तिला बोलते...
" ऐकावंच लागणार बाई, तुझं नाव ऐकून आम्हाला जीव थोडीच द्यायचा आहे... " सौरभ मध्येच नकारार्थी मान हलवत उत्तर देतो...
" तुझी तर आता माझ्याकडून इतक्या सहजासहजी सुटका होणारच नाही... मी जे काही बोलले ते तुला गप्प बने करावे लागणार आहे... " दीक्षा सौरभ कडे बघत लटक्या रागात बोलत किचनमध्ये बनवलेले जेवण बाहेर घेऊन येते आणि तिघांनाही वाढू लागते... तिघेही तिकडं मोकळ्या वातावरणात आनंदाने जेवण करू लागतात...
****************************
मिस्टर विश्वास त्यांना भार्गवीने जे काही पुरावे पाठवलेले असतात ते व्यवस्थितपणे आपल्या लॅपटॉप मध्ये सेव्ह करतात आणि पटकन स्वराची तयारी करून आपला लॅपटॉप घेऊन घरातून बाहेर पडतात....
काही वेळातच ते पोलीस स्टेशनच्या समोर येऊन उभे राहिलेले असतात... ते आपल्या मित्राला फोन करतात ते पण पोलीस स्टेशनमध्ये असतात....
" अरे आज अचानक न सांगता तिकडे आला आहेस ? " मुख्याधिकारी अचानकपणे त्याला समोर पाहून विचारतात...
" मला सांगा तुम्ही लोकांनी मिस भार्गवी यांचे जप्त केलेले सामान कुठे ठेवले आहे ? " मिस्टर विश्वास त्यांच्यासमोर जाताच डायरेक्ट प्रश्न विचारतात...
" त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल ना.. फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवून दिला आहे... का रे पण तू असे का विचारत आहेस ? " मुख्याधिकारी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहून त्याला विचारतात....
" काही नाही... तुम्ही आताच्या आता माझ्यासोबत त्या फॉरेन्सिक लॅब मध्ये चला आपण एकदा त्या सगळ्या वस्तू व्यवस्थित आहेत का ते पाहूया... " मिस्टर विश्वास मुद्दामून तिकडे काही सांगत नाही... तसे पण ते दोघेपण त्यांच्या केबिनमध्ये असतात... त्यांचं बोलणं मुख्याधिकारी यांना पण थोडा वेगळं वाटतं त्यामुळे ते पण त्यांच्यासोबत जाण्यासाठी लगेच तयार होतात...
काही वेळातच ते दोघेपण फॉरेन्सिक लॅब मध्ये पोहोचलेले असतात... त्या दोघांना समोर पाहून तिकडे सिक्युरिटी साठी असलेला माणूस उठून उभा राहतो...
" मिस भार्गवी यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जो इकडे ठेवायला आला होता, तो मला जरा पाहायचा आहे तुम्ही प्लीज घेऊन येता का ? " मुख्याधिकारी त्या सिक्युरिटी गार्ड कडे पाहून त्याला सांगतात..
" सर ते... ते... म्हणजे त्यांची केस तर क्लोज झाला आहे ना... मग आता तुम्हाला त्या पुऱ्या वरची काय गरज आहे ? " तो सिक्युरिटी गार्ड घाबरतच त्या लोकांकडे पाहून त्यांना विचारू लागतो...
" एक मिनिट आम्हाला त्याची काय गरज आहे हे आम्ही तुम्हाला का सांगू.... आम्हाला आत्ताच्या आत्ता ते सगळे पुरावे पाहायचे आहेत... " मिस्टर विश्वास त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत आवाजात थोडी जरब आणून बोलतात... तसा तो सिक्युरिटी गार्ड घाबरल्यासारखा गोंधळल्यासारखा इकडे तिकडे शोधू लागतो...
" काय झालं, आता काही दिवसापूर्वीच आणून दिलेले सामान तुम्हाला इतक्या लवकर सापडत नाही आहे का ? " त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून मिस्टर विश्वास त्याला विचारतात...
" या फॉरेन्सिक लॅब मध्ये ज्याच्या कोणाच्या सामानाची एन्ट्री होते, त्याचे आपल्या कॉम्प्युटरमध्ये असलेल्या लिस्टमध्ये पण एन्ट्री होते आणि त्यात सगळी डिटेल दिलेली असते... तुम्ही प्लीज डिटेल चेक करा आणि त्यांच सामान कुठे आहे ते बघून आम्हाला द्या... " त्या दोघांचं बोलणं ऐकून मुख्य अधिकारी पण विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहून त्यांना बोलतात... त्यांचं बोलणं ऐकून पण तो सिक्युरिटी गार्ड कम्प्युटरच्या जवळ येत नाही म्हटल्यावर त्या दोघांनाही त्याच्यावर संशय येतो...
" आता तू सरळ सगळं खरं सांगणार आहेस की , आम्ही पोलिसांना थर्ड डिग्री वापरायला सांगू... हे पोलीस अधिकारी इकडे जवळच आहे त्यामुळे त्यांना आदेश द्यायला जास्त वेळ लागणार नाही... " मिस्टर विश्वास त्या सिक्युरिटी गार्ड कडे पाहून धमकीच्या स्वरात बोलतो....
" मला माफ करा सर, मी पुन्हा कधीच असे करणार नाही... माझं चुकलं पण त्या लोकांनी मला धमकी दिली होती... मला माफ करा.... " सिक्युरिटी गार्ड रडत बोलतच त्या मुख्य अधिकारी यांच्या पाया पडू लागतो...
" कोणी धमकी दिली होती आणि ते सामान तू कोणाला दिले आहे ? " ते मुख्य अधिकारी प्रश्नार्थक नजरेने एक नजर विश्वास यांच्याकडे पाहून त्या सिक्युरिटी गार्डला विचारू लागतात...
" मला नाही माहित सर ते लोक कोण होते ? तुम्ही सामान ठेवल्यानंतर दोन दिवसातच दोन-तीन माणसं चेहऱ्याला काळा कपडा बांधून इकडे आले होते... त्यांनी मला मीच भार्गवी यांचा लॅपटॉप मागितला त्याच्या बदल्यात काही पैसे देण्याचे सांगितले... मला पण पैशाची गरज होती म्हणून मी त्यांना होकार दिला आणि मिस भार्गवी यांचा लॅपटॉप त्यांना देऊन टाकला.... मला वाटलं त्यांची केस आता क्लोज झाली आहे त्यामुळे त्यांच्या सामानाची आता गरज पडणार नाही... सर खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली... मी पुन्हा कधीच असे वागणार नाही फक्त एक वेळा मला माफ करा... " तो सिक्युरिटी गार्ड हात जोडून मुख्य अधिकारी यांच्याकडे पाहून त्यांची क्षमा मागू लागतो....
" तुमच्यासारख्या लोकांमुळेच ही जनता पोलिसांवर विश्वास ठेवत नाही... आपण जनतेचे रक्षक आहोत त्यामुळे त्यांची सुरक्षितता ही आपल्या हातात आहे... आपणच जर असे त्यांच्या जीवावर उठवण्याचा प्रयत्न केला, तर मग ते लोक कोणाकडे जाणार... आम्ही इकडे जे काही सामान ठेवतो ते सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि तुम्ही असे थोड्या पैशासाठी ते सामान जर दुसऱ्यांना द्यायला लागला तर कसे होणार.... " ते मुख्य अधिकारी रागानेच त्या सिक्युरिटी गार्ड कडे पाहून बोलू लागतात....
.
..
...
To be continued....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा