सह्याद्रीच्या माथ्यावर..

सह्याद्रीच्या माथ्यावर..


मृगजळ काळाचे
खेचते मागे, तर कधी पुढे
खंत हीच की
क्षणाक्षणाला मानवतेचा
धर्म बुडे..


हिंदू, मुस्लिम, सिख
का बंदा
है तो हर एक आझाद परिंदा..


मग का बांधावे त्याला
धर्म जातीच्या बंधनात
उमटेल का कधी
एकीची भावना काळजात..


खून सबका एक है,
मिल बाटके रेहना येह विचार
नेक है..


एकत्र यावे साऱ्यांनी
म्हणजे जातीय दंगलीला उरणार नाही थारा
मातीतच मांडलास,
मातीतच मिसळणार सगळा पसारा..


क्षण क्षण जगायला शिक
नंतर सगळं असेल पण
मागावी लागेल आपुलकीची भीक..


अनुभवातून मोठा हो
माणसातला माणूस हो
झेप गरुडाची असली तरी
पाय जमिनीवर राहो..


प्रसंग येतील,
धीर सोडू नको
अपार प्रेम कर तुझ्या कलेवर
तीच सुगंध दरवळवेल
तुझ्या कठीण मार्गांवर..


समाजाचं लागतोस तू
काही देणं,
हेच लक्षात ठेव नववर्षाच्या उंबरठ्यावर
जर ठेवली ही जाणीव प्रत्येकाने
तर सदैव फडकत राहील निशाण माणुसकीचं
सह्याद्रीच्या माथ्यावर..