समजून घेताना..

समजून घेताना..

समजून घेताना प्रेम माझे, 

फक्त एकदाच डोळ्यात माझ्या बघशील.. 

इशाऱ्यातल्या संवादाला, 

आवाज तुझा देऊन बघशील.. 


समजून घेताना कविता माझ्या, 

शब्दांपेक्षा भावना त्यातल्या टिपशील.. 

अबोल भावनांना माझ्या, 

जरा जाणून घेत त्या भावनांना बोलके करशील.. 


समजून घेताना मला, 

तुझं खरं प्रेमं कुणावर ते निदान स्वतःपुढे स्विकारशील.. 

एकतर्फी निर्णय घेण्याआधी, 

स्वतःच्या मनाचं उत्तर ऐकशील.. 


समजून घेताना सारे, 

आपलं नातं जाणून घेशील.. 

काय नाव द्यावे आपल्या नात्याला, 

हे कायम मला वहिनी म्हणणाऱ्या तुझ्या त्या मित्रांना विचारशील..