शोध प्रेमाचा भाग 2

###two###people ###who###waiting ###for###true ###love ###

शोध प्रेमाचा भाग 2

(त्याचा प्रश्न ऐकून मधु काही बोलत नाही. थोडं अंतर पार केल्यावर)
मधु:-  मला इथेच उतरायचं आहे 
शेखर :-  हो.
मधु गाडीवरून उतरते.
मधु :-  घरी सोडल्याबद्दल थँक्स. खरच खूप आभारी आहे मी तुमची. 
शेखर :-  त्यात काय माझंही घर इकडेच आहे हे विसरतेस तू.
काही क्षण रेंगाळतो आणि मग 
शेखर :- चल बाय येतो आधीच उशीर झालाय.
मधु :- ओके थँक्स बाय. 
मधु तिथून निघते. तिच्या मनात शेखरचे विचार चालू असतात .
खरंच किती चांगले आहेत शेखर. फक्त बोलूनच नाही तर वागणुकीतूनही ते दिसतं. आजकाल असं कोणी भेटत नाही. 
आजही आपण घरी सुखरूप पोहचावे यासाठी ते इथपर्यंत आले. आणि आपण मात्र त्यांना घरी या असंही बोलू शकलो नाही . 
इकडे शेखरही गाडीवर पुढे निघतो. पण अजूनही त्याच्या डोक्यात मधुचेच विचार चालू होते. त्याला तिचा ऑफिसचा पहिला दिवस आठवला. किती गोंधळली होती ही.... खूपच वेगळी आहे आज समोर असणारी मधु आणि त्या दिवशीची मधु......त्यादिवशी गोंधळलेली आणि तितकीच घाबरलेलीसुद्धा होती. नंतर मात्र तिने ऑफिसमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. ऑफिसमध्ये सर्वांना तिने आपलेसे केलंय. तिच्या कामाचही सर्व कौतुक करत असतात. वर्षभरात तिने कामामध्ये कधीही काही कमी ठेवली नाही. कोणत्याही कामासाठी नेहमीच तत्पर असते. 

एक चांगली एम्प्लॉयी म्हणून शेखर तिच्याकडे बघत होता. त्याला एक गोष्ट नेहमीच खटकायची. कामाव्यतिरिक्त मधु त्याच्याशी कधी बोलायची नाही. कधी चुकून समोर आलीच तरीही. मुद्दाम लांब राहायची. कारण त्याला कळत नव्हतं. आज त्यासाठीच त्याने तिला घरी सोडायला जायचं आणि कारण जाणून घ्यायच असं ठरवलं. पण तस झालं नाही. आजही नेहमीसारखं ती गप्पच होती. आणि शेखरलाही विचारता आले नाही. 

शेखर विचार करत असताना कधी घरी येऊन पोहचला हे त्यालासुद्धा कळलं नाही. आणि स्वतःवरच हसू आलं. जिच्या न बोलण्याचा त्याला त्रास होत होता ती खरतर त्याची कुणीच नव्हती. फक्त ऑफिसमधील सहकारी यापलीकडे त्याला तिच्याबद्दल कोणतीच माहिती नव्हती. पण तरीही तिचा अबोला आणि दुर्लक्ष करणं त्याच्या जिव्हारी लागत होत. का कुणास ठाऊक पण सारखा तिचाच चेहरा डोळ्यासमोर येत. आणि तिचेच विचार सतत डोक्यात असत. आता मात्र लवकरच त्याला तिच्या या अश्या वागण्याचा उलगडा व्हावा असं वाटत होत. काही दिवसापासून तो तसा प्रयत्न सुद्धा करत होता पण काहीतरी अडथळे यायचे आणि त्याचे प्रश्न  तसेच राहायचे. 

फोनच्या आवाजाने त्याची विचारांची शृंखला तुटली. फोन आईचा आहे हे बघून त्याने फोन उचलला.
शेखर :- हो आई.... बोल 
आई :-काय रे... पोहचलास का घरी? 
शेखर :-हो....आत्ताच... 
आई :-किती उशीर करतोस रे..... वेळेवर येत जा घरी.... कामात वेळेचही भान असू द्यावं... 
शेखर :- हो.... आज थोडं काम होत म्हणून उशीर झाला निघायला.... तू कशीयेस? 
आई :- मला काय झालंय? मला फक्त तुझीच काळजी वाटते. अजून किती दिवस असा एकटा राहणार आहे? तुला बोलून काही उपयोग नाही म्हणा... तू थोडीच आईची काळजी कमी करणार.... 
शेखर  :-आई... आई..... पुन्हा तेच..... तुला कंटाळा येत नाही का..... तुला माहिती आहे ना मला नाही आवडतं या विषयावर बोललेलं.... मग का पुन्हा पुन्हा तेच... 
आई :- हो रे.....माहित आहे.... पण अजून किती दिवस... 
आता आमचं वय वाढतंय.... आणि तू मात्र तुझ्या भूतकाळातच.... 
(आई अचानक शांत..... )
शेखर :- चल आई... ठेवतो..... अजून जेवण करायचंय... बोलू नंतर 
शेखर फोन कट करतो.  डोळे बंद करतो. पण म्हणतात ना डोळे बंद असले तरी विचार बंद होत नाही. तसच शेखरच झालं, डोक्यात विचारचक्र वेगाने फिरायला लागलं.  कितीही नाही म्हटलं तरी भूतकाळाचे सावट वर्तमानकाळातही त्रास देतच असतं.
क्रमशः 

🎭 Series Post

View all