शील - भाग 9

Hi. I am new writer works in IT. I love to write and express my feelings. Ira gives best platform to explore your talent. Thank you Ira. Please like, comment and share. So that I can improve my writing.


“तुला वाटतं का की या सगळ्याचा काही उपयोग होईल?”, यशने सोफ्याच्या लागून असलेल्या खुर्चीत बसत आणि काहीशा चिंतेत विचारले.
“Let’s hope for the best.”, जुईली positive attitude ठेवत म्हणाली.
“मलादेखील निघायला हवं आता?”, यश म्हणाला.
“आत्ता कुठे जाशील?”
“माहीत नाही. इकडे तर नाही राहू शकत.”
“Ohh.. Come on. You can stay here. You can use other bedroom to sleep.”
“Are you sure?”
“Yes I am. You can take rest if you want.”
“झालाय माझा पुष्कळ आराम. आता नाही करायचा मला.”, यश थोडं चिडचिड करत म्हणाला.
“बरं राहिलं. जेवायला काय करु? कढी-खिचडी चालेल का?”
“हो.. चालेल मला.”
“ठिक.”, असं म्हणून जुईली कीचन मधे गेली.
यश झाल्या प्रकाराचा विचार करत बसला. मघाच्या संभाषणातून विचार करण्याची नवी दिशा त्याला मिळाली होती. संजीव आणि वृषभने सांगितलेले मुद्दे बरोबर होते असं त्याला वाटून गेलं.  अचानक त्याच्या मनात वाक्य चमकून गेलं. “स्वत:चा लढा स्वत:च लढला पाहिजे.” हे आठवल्यासरशी त्याच्या चेह-यावर एक अर्थपूर्ण स्मित आलं.
दुस-या दिवशी संजीव आणि यश संध्याच्या फ्लॅटजवळ गेले. कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून संजीवसारखं यशनेही हेल्मेट घातले. त्यांना काहिच वावगं आढळलं नाही. पण फ्लॅटच्या खिडकीमधे काहिच हालचाल जाणवली नाही. वॉचमनला विचारलं तर कळलं की त्या फ्लॅटमधे कोणी राहत नाही. त्यांनी अजुन चौकशी केली तेव्हा कळलं की फ्लॅट भाड्याने दिला होता. ते लोक कालंच सोडून गेले. फ्लॅट संध्यानेच भाड्याने घेतला होता. आत जाऊन बघता येईल का असं विचारल्यावर वॉचमनने चावी दिली.
फ्लॅट मधे सामान होतं. पण सगळं स्वच्छ होतं. कदाचित fully furnished flat भाड्याने घेतला होता. ज्या bedroom मधे incident झाला तिकडे जाऊन बघितलं तर काहिच विशेष सापडलं नाही. शिवाय clue मिळेल अशी आशा फोल ठरली म्हणून यश नाराज झाला.
इकडे वृषभने FIR चेक करायला घटनेच्या हद्दीतील पोलिस स्टेशनला चौकशी केली. तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे complaint registered होती. आणि ज्या constables नी यश ला पकडले होते ते शिंदे आणि पवार ह्यांनी आरोपी पळाला होता असे खात्रीशीर सांगितले. आणि शोध चालू आहे असेही म्हटले.
संध्याकाळी पुन्हा सगळ्यांनी भेटण्याचं ठरवलं.
 जुईली कामावरुन नुकतीच परतली होती. यश आलाच 5 मिनटात. तिने दार उघडले आणि त्याला आत घेतले.
“काही समजलं का?”, पाणी देत जुईलीने विचारले.
“नाही. फ्लॅट बदलला तिने.”, यश उदास होत म्हणाला.
“काऽय? मग आता काय करायचं?”
“मला नाही कळत आहे काही.”, यश मागे सोफ्यावर टेकत डोळे मिटुन बोलला.
“संजीव नाही आला सोबत? येणार होता ना आता?”
“हो. काही काम आहे त्याला. येईल अर्ध्या तासात.”
तेवढयात दाराची बेल वाजली. 
“वृषभ आला वाटतं.”, जुईलीने जाऊन दार उघडले. “ये वृषभ. बस. यशशी बोल तोपर्यंत मी fresh होऊन येते.”
वृषभ यशसमोर येऊन बसला. यश आशेने त्याच्याकडे बघू लागला.
“FIR is registered.”, यशची उत्सुकता जाणून वृषभ पटकन बोलला. 
त्याचं बोलणं ऐकुन यश अजुनंच निराश झाला. मग कोणी काही बोललं नाही. जुईलीने दोघांना चहा दिला. यश नको म्हणाला आणि fresh व्हायला गेला. तो गेल्यावर जुईलीने वृषभला काय झाले ते विचारले. आणि FIR बद्दल समजताच तिलाही वाईट वाटले. दोघं मग दुस-या गप्पा करु लागले आणि संजीव आणि यशची वाट बघू लागले.
एक तासाभरात संजीव आला. तोपर्यंत यश पण आला होता. फ्लॅटचं रिकामं असणं आणि FIR registered असणं ह्या दोन्ही गोष्टी यशसाठी नकारात्मक होत्या.
“सगळा विरोधाभास आहे. जर FIR केलीच होती तर फ्लॅट सोडून जायची काहिच गरज नव्हती संध्याला.”, जुईली काळजीने म्हणाली.
“यश बघायला गेलं तर सगळं अजुनही तुझ्या विरुद्धच आहे. बोल काय करायचं आता?”, वृषभ निर्विकारपणे यशला म्हणाला.
“Please वृषभ. For God sake. असं म्हणू नकोस. मला वाचव या सगळ्यातून. मी काही नाही केलंय रे”, यश काकूळतीला येऊन म्हणाला.
“संध्या कुठे जाऊ शकते ह्याची काही कल्पना आहे का तुला?”, संजीवने विचारले तसे यशने नकारार्थी मान हलवली.
“मला वाटतं ह्यावर एक होऊ शकतं. बघ पटतंय का?”, वृषभ विचार करत म्हणाला.
“काय?”,यशने विचारले.
“तू surrender हो यश.”, 
“काऽय? हे काय बोलतोय तू वृषभ?”, जुईली जवळजवळ ओरडलीच.
“मी बरोबर तेच बोलतोय. जरा शांत राहून माझं म्हणणं ऐका.”, वृषभ थंड डोक्याने म्हणाला.
“Ok.”, इति संजीव.
“ठिक आहे.”, यशने जुईलीकडे शांत राहण्याची खूण करत म्हटलं.
“कसं आहे ना यश, एकतर मी तुला आधीच सांगितलंय की ही खुपच sensitive केस आहे. जर कोर्टात गेली तर कायदा महिलांच्या बाजुने आहे. मला चुकीचं समजू नकोस. पण तू surrender केलंस तर तुझ्यावर असलेला पळपुटेपणाचा शिक्का पुसला जाईल. आणि तू जर काही केलं नाहीयेस तर घाबरण्याचं काही कारण नाही. ACP रामकृष्णा अय्यर माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. आपण त्यांना convince करु आणि तुझा निरपराधपणा सिद्ध करण्यासाठी वेळ मागुन घेऊ.”
“ते वेळ देतील?”,संजीवने विचारले. 
“हो म्हणजे समजावलं तर नक्कीच.”
“ठिक. मग यश तुझा काय विचार आहे.?”, जुईली आणि संजीव दोघांनी यशला विचारले.
“मी विचार करुन सांगतो.”
“Ok. Take your time. But remember we don’t have much time to waste.”  ,वृषभ सावधानतेचा इशारा देत म्हणाला.
“मी काय म्हणते यश, why don’t you join office again?”,जुईली मधेच म्हणाली तसं सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.
“ मला येऊ देतील का ऑफिस मधे? तेही इतकं सगळं झाल्यावर.”,यश उसासे टाकत बोलला.
“I think she is right. गुन्हा अजुन सिध्द झाला नाहीये आणि संध्याला contact करता येईल. ती ऑफिसला येतंच असेल ना?”, संजीव थोडा विचार करत म्हणाला.
“हो. मलाही जुईली आणि संजीवचं म्हणणं पटतंय. आणि पोलिसांकडून आपण permission काढूच.”  वृषभ म्हणाला.
“बहुतेक तुम्ही सगळे बरोबर बोलत आहात. Thanks for the support. मी HR शी बोलून लवकरच join व्हायचं try करतो. पण मी एक दोन दिवस तरी वेळ घेईन. इकडे ऑफिसचं सामान नाहिये आणि दोन दिवस तेच तेच कपडे घालावे लागत आहेत.”
हे संभाषण इकडेच संपलं. रात्री जेवणं झाल्यावर यश आणि जुईली खिडकीजवळ बसुन गप्पा मारत होते. म्हणजे फक्त जुईलीच बोलत होती.
“ काय विचार करतोय? अरे आपण प्रयत्न करतोय ना. मग होईल सगळं नीट.”
“तसं नाही गं. मी विचार करतोय की कसं एकदम सगळं आयुष्यच बदलून गेलं. किती चांगलं चाललं होतं सगळं. आणि आता हे.”
“…”
“मी surrender साठी तयार आहे असं मला वाटतंय.”
यश बोलला तसं जुईलीने चमकून त्याच्याकडे बघितलं. एवढ्या लवकर decision घेईल यश, असं तिला वाटलं नव्हतं.
“नक्की ना? नीट विचार कर.”
“आता जे होईल ते होईल. मी मागे नाही हटणार. तू वृषभला कल्पना देशील का? मी उद्या फोन करतो त्याला.”
“हो. ठिक आहे. हरकत नाही.”
असं म्हणून दोघं झोपायला गेले.
दुस-या दिवशी यशचं वृषभशी बोलणं झालं आणि दोघांनी ACP रामकृष्णा अय्यर यांना भेटण्याचं ठरवलं. 

🎭 Series Post

View all