शील - भाग 7

Hi. I am a new writer works in IT. I love to write and Express my feelings. Ira gives best platform to explore our talent. Thank you Ira . Please do like , share and comment. So that I can improve my writing.

थोडा वेळ शांततेत गेला. मग जुईली काहितरी विचार करत म्हणाली,” काहितरी गफलत होतेय. तू म्हणालास की lights गेलेत, मग music कसं काय चालू होतं?”
“आम्ही नेहमी music  साठी backup प्लान रेडी ठेवतो. Travelling ला बरं पडतं.”, यश म्हणाला.
“तू म्हणतोस की तुला काही आठवत नाहीये. एकच पेग घेऊन तुला चढली कशी? Isn’t it impossible?”
“कदाचित कोणीतरी माझ्या नकळत त्यात काही मिक्स केलं असेल.”
“पण बेडरूम जवळ तू स्वत:हुनच एकटा गेला होतास हे तू नाकारु शकत नाही. तुच आत्ता म्हणालास तसं.”
“हो मान्य आहे मला.”
“असंही असू शकतं ना की भावनेच्या भरात तुझ्याकडून झाली असेल चूक…”
“तुलाही मीच गुन्हेगार वाटतोय का? माझंच चुकलं तुझी मदत मागितली.”
“हे बघ यश, माझ्या जागी कोणीही असेल तर तो तुला हे प्रश्न विचारेलंच. आणि पोलिसांपासून पळून तू आधीच हे सिध्द केलंस की तू गुन्हेगार आहेस.”
“जर पकडलो गेलो असतो तरी कोणी मदत केली असती का मला? त्यावेळी जे योग्य वाटलं तेच केलं मी. तुला जर नाही मदत करायची तर हा मी चाललो. I will find other solution. “
“आणि ते तुला सहज मिळेल असं वाटतंय का तुला? अरे मुलीने स्वत:च तुझ्यावर आरोप केलाय. शिवाय इतके सारे witness आहेत. सगळं विरुद्ध आहे तुझ्या.”
जुईलीचं बोलणं ऐकुन यश मटकन खालीच बसला.
“हो मी पुरता अडकलोय. मी काही नाही केलंय. मी काहिच नाही केलंय. आईबाबांची शप्पथ.”
“हे बघ, don’t be upset. We will find solution. कठिण आहे पण काहितरी मार्ग काढू. तुझा विश्वास आहे ना तुझ्यावर? आपण करु काहितरी.”
असं म्हणून जुईली काही करता येईल का याचा विचार करु लागली. तिचा एक भाऊ वृषभ सब इन्स्पेक्टर होता. पण त्याच्या branch च्या हद्दीत ही घटना येत नव्हती. शिवाय यश पळून आल्यामुळे वृषभ ला involve करु की नको असं जुईली ला वाटायला लागलं. नेमकं काय घडलंय हे जाणून घ्यायचं असेल तर कोणीतरी तसाच बन्दा हवा. जसं की private detective किंवा अजुन कोणी ज्याच्याकडे सत्य शोधण्याएवढं talent असेल. वृषभला या गोष्टीची कल्पना दिली तर काहितरी मदत नक्किच होईल असं मात्र जुईली ला वाटत होतं. सोबतंच तिला आठवलं की तिची एक मैत्रीण स्मिता लॉ करत आहे. सो तिच्याकडून काही help होतेय का हे बघायचं ठरवलं तिने. 
“यश तू थोडा आराम कर. तुला बरं वाटेल. तोपर्यंत मी काही फोन कॉल्स करुन बघते. ”
“नाही. मला नाही करायचा आराम वगेरे….”
“अशाने आजारी पडशील. हे बघ.. थोडा आराम कर. मग आपण बोलू. तुला बरं वाटेल थोडं.”
यशने मान्य केलं आणि तिथेच सोफ्यावर झोपला. त्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून ती बेडरूम मधे आली आणि तिने वृषभ ला कॉल करुन थोडक्यात सगळी परिस्थिती सांगितली. वृषभने तिला help करायचं promise केलं आणि evening ला भेटू असंही म्हटलं. स्मिताशी बोलल्यावर तिने काही कारणांमुळे personally help शक्य नाही असं सांगितलं. पण एका private detecive चा नंबर दिला. जेणेकरुन indirectly तिच्याकडून काही help होईल. हेही नसे थोडके. 
तो नंबर संजीवचा होता. तो एका private detective कंपनीत trainee होता. संजीव ला कॉल केल्यावर तोही यायला तयार झाला. संध्याकाळी 6 ची मीटिंग ठरली. 
यश उठल्यावर त्याला ही news देऊ असं म्हणून जुईलीने laptop  open  करुन ऑफिसचं काम करायला घेतलं.

🎭 Series Post

View all