शील - भाग 17 (अंतिम भाग)

Hi I am new writer works in IT. I love to write and Express my feelings. Ira gives best platform to explore your talent. Thank you Ira. Please do like, comment and share. So that I can improve my writing.

शील  - भाग 17 (अंतिम भाग)

त्रिशा पुढे म्हणाली,”आम्हांला नेमकं काय करावं हे कळत नव्हतं. काहितरी ठोस करायला हवं होतं. नेमकं त्याच वेळेला संध्या आमच्या branch ला join झाली. आधी सांगितलं त्याप्रमाणे पुर्ण plan करुन आम्ही flat भाड्याने घेतला. आम्हांला माहीत होतं की नेहमीप्रमाणे success parties होतीलंच. मग एक success पार्टी flat वर करायचं ठरवलं. त्या दिवशी lights गेले ते plan मध्येच होतं. त्याआधी जाणीवपूर्वक मी तेच औषध यशच्या drinks मध्ये मिसळलं जे तो पूजाला देत होता. फक्त त्याचं प्रमाण जास्त होतं. आणि दारुसोबत घेतल्यामुळे त्याचा पटकन परिणाम दिसून आला. यश कोणत्याही क्षणी बेशुद्ध होऊ शकत होता. त्याला bedroom मध्ये पाठवणं गरजेचं होतं. म्हणून मग मीच त्याला washroom ला जाण्याविषयी सुचवलं. तो तसा गेलाही. संध्या आणि परेश आधीच आत होते.”
“हो आम्ही आतंच होतो.”,परेश म्हणाला. “मी तेवढ्यात बाहेर जाण्यासाठी वळलो. आणि माझा हात चुकून जार ला लागला. ते खाली पडलं. तो आवाज ऐकुन यश बेडरूमकडे वळला. हे संध्याने दारातून बघितल्यावर मला सांगितलं. आम्ही दोघांनी night goggle घातले होते. तो येत होता पण अचानक तो पुन्हा हॉलकडे जाण्यासाठी वळला. हे कळल्यावर मी लगेच आवाज न करता बाहेर आलो. आमच्या दोघांची नजर त्याच्यावरंच होती. आम्हाला वाटलं आमचा plan फसला. पण तेवढ्यात तो अचानक खाली पडला. बस मी पुढे होऊन त्याला अलगद पकडले. जेणेकरून आवाज होणार नाही. पुढे मी आणि संध्याने मिळून यशला बेडरूममध्ये आणले. बाकी सगळी व्यवस्था आधीच केलेली होती….”
“आता माझी वेळ होती. त्रिशाने hall मध्ये आतापर्यंत सगळं सांभाळलं होतं.”,संध्या पुढे म्हणाली.”मी स्वत:चे केस खराब केले. डोळ्यात ग्लिसरीनचे drops टाकले आणि रडत बाहेर आले. मी अशा पद्धतीने बाहेर आले की कोणीतरी मला बघावं. मी कुमार आणि स्वीटीच्या दिशेने गेले….witness हवं म्हणून…”
“जर witness हवा होता तर बाकिच्या लोकांना का जायला सांगितलं. तेपण झालेच असते  ना witness …?”,संजीवने विचारले.
“हो.. पण सगळ्यांना control करणं जमलं नसतं.. त्यामुळे मी ठराविक लोकांना सोडून पार्टी संपली असं सांगितलं.”, त्रिशाने उत्तर दिलं.
“पोलिस यशला घेऊन गेले पण तो पळून गेला. आपण घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरणार असं मला वाटू लागलं. तसं दाखवणं शक्य नव्हतं. पण खुप संताप संताप झाला होता आमचा…वेळीच बाकिच्या लोकांना सुद्धा घरी जायला सांगितलं. जेणेकरून काही चुकीचं घडू नये अजून. पण नकळत माझ्याकडून काही चुकीचं बोललं गेलं असेल म्हणून मग मी त्रिशाला sorry म्हणाले. त्रिशा मला support करत होती.”, संध्या म्हणाली.
“आणि ते reports ते कसे काय arranged केले? तेही 3 दिवसां नंतर test करुन? Samples matched कसे काय झाले?”,संजीवने पुन्हा विचारलं.
“ते सगळं करणं इतकं अवघड नव्हतं. उशिरा test चं म्हणाल तर यश पळून गेल्यामुळे आम्ही tense होतो. त्यामुळे आधी आम्ही तडकाफडकी flat स्वच्छ केला आणि बदलला. जेणेकरून पुरावे सापडणार नाहीत आणि काही धोका निर्माण होणार नाही. हे सगळं करण्यात वेळ गेला. एकदा complaint केल्यावर test करणं ही procedure होती. आमच्या ओळखीच्या डॉक्टर Mrs  साठेंकडून test करण्याची आम्ही permission मागितली. आणि सगळं मनासारखं झालं.”,त्रिशा म्हणाली.
“असं असलं तरी तुझं आयुष्यही यात खराब झालं असतं याचं काहिच नाही वाटलं तुला? पकडलं जाण्याची अगर खोटं पडण्याची भीती नाही वाटली तुला?”,वृषभने काळजीने आणि थोड्या चढ्या आवाजात संध्याला विचारले.
“यशला त्याच्या कर्माची शिक्षा देणं एवढंच माझ्या समोर लक्ष्य  होतं. आणि एकदा का यश या केस मध्ये गुंतला की खरंखोटं होण्यात वेळ गेला असता. त्यात त्याला कुठेही जॉब मिळाला नसता. जसं त्याने पूजाला मानसिक त्रास दिला तसाच आम्हाला त्याला द्यायचा होता..”,संध्या उद्वेगाने म्हणाली.

“Well… तुम्ही कितीही सांगत असलात तरी पूजासोबत जे झालं त्याचा revenge  तुम्ही असा घ्यायला नको होता…. कोणी चुकीचं वागलं म्हणून आपणही त्याच रस्त्याला जावं मग भलेही हेतू चांगला असेल.. हा कोणता शहाणपणा झाला…”, वृषभ chair वरुन उठत म्हणाला..
“तुम्ही मला आत्ता जे सांगितलं पूजाबद्दल त्याची शहानिशा मी करणारंच आहे… पण तुम्ही जे वागलात ते मी बरोबर ठरवणार नाही…”,वृषभ म्हणाला. “आणि जर खरंच पूजासोबत चुकीचं झालं असेल तर तिलादेखील न्याय मिळेल.”,शेवटचं वाक्य वृषभ यशकडे बघत म्हणाला.
यशला आता बराच घाम फुटला होता. त्याच्या एकुण अवस्थेवरुन हे तिघं खरं बोलत आहेत याची वृषभला खात्री झाली.
संजीवनेही मग झाला प्रकार जुईलीला कळवला. सौरभ सुखरुप त्याच्या घरी पोहोचला. वृषभने यश, संध्या, त्रिशा आणि परेशला पोलिस custody त घेतले.  संध्या, त्रिशा आणि परेश ला warning आणि काही दंड ठोठावून सोडून देण्यात आले. फक्त कधीही चौकशीसाठी हजर राहायची तयारी ठेवायला सांगितले.
यशची चौकशी अजुनही चालू आहे. नेमकं काय घडलं आणि जे घडलं ते कितपत खरं आहे याची शहानिशा करण्याची पूर्ण जबाबदारी संजीवच्या मदतीने वृषभने घेतली आहे. 

****************समाप्त*****************

ही कथा office मध्ये होणा-या harassment वरुन प्रेरित होऊन लिहिली आहे. लेखनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. Share करायचे असल्यास नावासहीत share करण्यास हरकत नाही. आपला अभिप्राय नक्की कळवा.

🎭 Series Post

View all