शील - भाग 16

I am new writer works in IT. I love to write and Express my feelings. Ira gives best platform to explore your talent. Thank you Ira. Please do like, share and comment. So that I can improve my writing

शील  -  भाग 16

“Project delivery च्या दिवशी evening ला दुपारी पूजा घाईघाईतंच ऑफिसला पोहोचली. ती घरी न जाता तडक ऑफिसला आली होती. ती डायरेक्ट ऑफिस ला आल्यामुळे कपड्यांची bag तशीच होती तिच्याकडे. तिला बघून माझ्या जीवात जीव आला. मी तिला भेटायला गेले तर ती तडक यशकडे गेली. काही वेळाने उदास होऊन माझ्याजवळ येऊन बसली. मी विचारल्यावर तिने सांगितलं मला की तिचा project deliver झाला तर यशने स्वत:च्या नावावर सगळं क्रेडिट घेतलं याचं तिला खुप वाईट वाटलं. तिने manager ला विचारलं. Manager ने तिचं तडकाफडकी गावी जायचं कारण दिलं. He was also helpless. Project delivery was must. तिला राग आला होता तो यशचा. मी कारण विचारल्यावर म्हणाली की तिच्या बाबांना काहीही झाले नव्हते. It  was a blank call.”
“मी तिला विचारलं की यश यावर काय म्हणाला तर ती म्हणाली की त्याने अजून काही उत्तर दिलं नाही. मी तिला सांगितलं की तू ऑफिस सुटेस्तोवर wait कर आणि बोल यशशी.”
“दुस-या दिवशी lunch break मधे मी तिला यशसोबत बघितलं. मी तिला तसं विचारलं तर ती म्हणाली की त्या ब्लँक कॉल विषयी त्याला काही माहीत नाही असं तो म्हणतोय. कदाचित कोणी चेष्टा केली असेल. मी प्रोजेक्ट बद्दल विचारल्यावर म्हणाली की मी नव्हते म्हणून त्याने त्याचं नाव लावलं. आपल्या हातात थोडीच असतात सगळ्या गोष्टी. पुन्हा असं करणार नाही असं म्हणालाय यश. मग मी देखील विषय सोडून दिला. दरम्यान परेश आला होता ऑफिस ला.”
“हो मी माझं काम आटपून पुन्हा join झालो office मध्ये.”,परेशने दुजोरा दिला. “झाला प्रकार आम्ही सगळे आता विसरलो होतो. आणि पुन्हा एक महत्त्वाचं project आलं. या project नंतर promotions declare होणार होती आणि best employee award देखील declare होणार होता. पूजा पुन्हा आधीचं सगळं विसरुन कामाला लागली. यश तिच्याकडून कसं काम करुन घेता येईल याकडेच लक्ष द्यायचा. तिला आणि आम्हाला देखील वाटायचं की तो खरंच तिची काळजी घेतोय आणि तिला help करतोय. तर प्रोजेक्ट almost 90% complete झाला आणि यश पूजाला घेऊन lunch ला बाहेर गेला. तिकडे त्याने तिच्या cold drink मध्ये काहितरी मिसळले. ज्यामुळे तिच्या पोटात खुप दुखू लागले. तिला घरी जावं लागलं. डॉक्टरांकडे जाऊन तिला बरं वाटलं. दुस-या दिवशी ती आली नाही. तिला फोन करुन विचारलं तेव्हा तिने सांगितलं की डॉक्टर म्हणाले की food infection असेल. कोणाला खरंतर काहिच शंका नव्हती की असं सगळं यशने केलंय. ती जेव्हा ऑफिसमध्ये आली तेव्हा तिने राहिलेलं काम पुर्ण केलं. पुन्हा यशने तिला बाहेर खायला जाऊया असं विचारलं. तिने नकार दिल्यावर ते दोघं ऑफिसच्याच canteen मध्ये गेले. कोणाचं लक्ष नाही हे बघून त्याने पुन्हा तिच्या डब्यातल्या खाण्यामध्ये काहितरी मिसळलं. नेमकी ही गोष्ट मी बघितली. सुरवातीला मला समजलं नाही. पण काही वेळाने जेव्हा पूजाच्या पोटात दुखू लागलं तेव्हा मला शंका आली. मी काही बोललो नाही कारण मला तेव्हा काही लक्षात आलं नव्हतं.”
“त्यानंतर project चं काम जे पूजाने केलं होतं ते पुन्हा यश सांभाळू लागला. त्याने शिताफीने पूजाला project पासून वेगळे केले. कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती आजारी राहील आणि ऑफिसला येऊ शकणार नाही याची काळजी घेतली. ती आजारी आहे हे कारण सांगून तिच्याशिवायंच project meetings घेऊ लागला. तिला याचा खुप मानसिक त्रास होत होता. आणि पुन्हा एकदा त्याने स्वत:च्या नावाने पूजाने मेहनत घेतलेल्या project ची delivery केली. आता बाकीचे projects पण तिच्याकडून काढून घेतले गेले. पूजा संतापली. चिडली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.”
“Promotion साठी यशचं नाव पुढे आलं. आणि त्याला best employee चा award देखील declare झाला. या सगळ्याचा जाब विचारायला जेव्हा पूजा यशकडे गेली तेव्हा त्याने तिला धुडकावून लावले. तिला या सगळ्याचा प्रचंड मानसिक धक्का बसला.”
“तिच्या डॉक्टर ने सांगितलं की काही अमली पदार्थांच्या ठराविक डोसामुळे तिच्या पोटात दुखते आहे.”, मध्येच संध्या म्हणाली. “हे सगळे मी परेशला सांगितले तेव्हा त्याने canteen मधला प्रसंग सांगितला. आधी आम्हाला विश्वासंच बसत नव्हता. मग आम्ही थोडी चौकशी केली. IT  staff ला थोडा मस्का मारुन  CCTV footage बघितलं. इतकंच नाही ज्या दिवसापासून पूजाच्या पोटात दुखू लागलं त्या हॉटेलमध्ये चौकशी केली. तेव्हा कळलं की हे सगळं यश करत होता. इतकंच नाही तर पूजाच्या वडलांच्या accident ची बनावट बातमी यानेच दिलेय अशी खात्रीच झाली आमची.”
“दरम्यान पूजाची हालत खुप खराब झाली. ज्या माणसावर तिने प्रेम केलं, विश्वास ठेवला त्यानेच तिचा विश्वासघात केला. तिने ऑफिसमधून resign केलं.  तिच्यावर इतका मानसिक आघात झाला की त्यातून सावरायला तिला medical treatment घ्यावी लागली. ती अजुनही घेत आहे. तिचं मानसिक शील ओरबाडून टाकलं गेलं. याबद्दल कोणाला काही कळलं नाही याचा यशने स्वत:साठी फायदा करुन घेतला. आणि स्वत:चा स्वार्थ साधला.”
त्रिशा म्हणाली,”आम्हांला तिची हालत बघवत नव्हती. आम्ही ठरवलं की या सगळ्याचा धडा यशला शिकवायचा. जे यश त्याचं नाही त्याचा त्याला उपभोग घेऊ द्यायचा नाही.”
बराच वेळ कोणी काहिच बोललं नाही. वृषभने वळून यशकडे बघितलं. एव्हाना त्याच्या चेह-यावरचे भाव बदलले आहेत हे वृषभने ओळखले. त्याने संजीवला तशी खूण केली. संजीवनेही यशच्या चेह-यावरचे भाव अचुक टिपले.
“मग तुम्ही हे सगळं कसं घडवून आणलं. काय झालं त्या दिवशी पार्टीच्या रात्री?”,वृषभने उत्सुकतेने विचारलं.