शील - भाग 12

I am new writer works in IT. I love to write and Express my feelings. Ira gives best platform to explore your talent. Thank you Ira. Please do like, share and comment. So that I can improve my writing.

शील - भाग 12

नयना कामातून मोकळी झाली तेव्हा बाहेर अंधार पडत आला होता. ऑफिसमधले बरेच लोक घरी गेले होते. फक्त त्या department मधे एकटा यश तेवढा बसला होता. वाट बघण्याच्या नादात तो तीन coffee प्यायला होता. नयना desk जवळ आली आणि निघण्याची तयारी करु लागली तसा यश ऊठून तडक तिच्याजवळ आला.
“Hi नयना. आपण बोलूया थोडं.”
“…”, नयना काही न बोलता बघतंच रहिली. मग भानावर येऊन म्हणाली,”बोल.”
“नयना तुला माहीत आहे ना की संध्याने माझ्यावर काय आरोप केलेत?मला जाणून घ्यायचंय…. का?”
“ते मला कसं माहीत असणार?”
“तूपण तर होतीस ना त्या दिवशी?”
“हे बघ यश, मला तुमच्या दोघांशीही काहीही घेणंदेणं नाहिये आणि तू मला का involve करतोय या सगळ्यात?”
“Involve नाही करत आहे. Help मागतोय. Please मला help कर. त्या दिवशी काय घडलं ते सांग मला.”
“Ok..त्या दिवशी जेव्हा नुकतेच lights आले होते..मी संध्याला तू होता त्या bedroom मधून रडत बाहेर येताना पाहिलं. तिला त्रिशाने पाणी देऊ केलं. तिने ते घेतलं नाही. मी तिच्याशी बोलणार एवढयात ती कुमार आणि स्वीटी यांच्या दिशेने गेली. मीपण तिच्या मागे गेले. तेव्हा मला ती बोलत असताना कळलं. प्रसंगावधान राखून मग त्रिशाने पार्टी संपली असं सांगितलं आणि आम्ही काही लोक सोडून सगळे घरी गेले. संध्याने मग आम्हां सगळ्यांना स्पष्टपणे सांगितलं की तिला पोलिस complaint करायची आहे तर तुम्ही सगळे witness व्हा. And she called cops. त्यानंतर थोड्याच वेळात तू शुध्दीवर आलास. पुढचं सगळं तुला माहीत आहे. हो ना?”
“हो Thanks.”
“जाऊ मग मी आता?”
“हो जा. Bye .”
नयना काही न बोलता तडक निघून गेली. यशनेही bag उचलली आणि तो घराकडे निघाला.
एकंदर काही ठोस माहीती मिळाली नव्हती.  पुन्हा कुमार आणि नयना किती खरे बोलत आहेत हेदेखील समजत नव्हतं.  त्यामुळे नेमकं काय करावं हे कळत नसतानाच अचानक यशला जाणवलं की त्रिशा संध्याच्या जास्त जवळ आहे. ती कदाचित जास्त चांगलं सांगू शकेन. तिच्याशी बोलूच या विचारात असतानाच तो घरी पोचला. 
आज गुरुवार. सातवा दिवस. आज ऑफिसमधे ब-याच जणांचा उपवास होता. त्यामूळे लंच break मधे canteen मधे गर्दी नव्हती. यश त्रिशाला शोधत शोधत canteen मधे आला. ती कुठेच दिसत नव्हती. तेवढयात यशला पाठक दिसला. यशने त्याला आवाज दिला.
“अरे पाठक, काय म्हणतोस? झालं का जेवण?”
“हो झालं ना आत्ताच.”
“मी काय म्हणत होतो.. म्हणजे माझं काम होतं एक त्रिशा madam कडे. पण कुठे दिसत नाहियेत त्या. तुला माहीत आहे का कुठे असतील?”
“त्रिशा madam ना.. त्या सुट्टीवर आहेत आज.”
“हो का..का बरं..?”
“मला कसं माहीत असणार साहेब.”
“बरं ठिक आहे जा तू.”
पाठक गेला तसा यश एका टेबलाकडे खुर्चीत जाऊन बसला. “आजचा दिवस फुकट गेला म्हणायचा”,तो स्वत:शीच म्हणाला. 
डबा उघडून खाणार एवढयात त्याला कुमार canteen मधे येताना दिसला. त्याने कुमारला  बोलावले तसा तो जरा घाबरतंच त्याच्याजवळ गेला.
“बस इकडे जेवायला.”
“नाही नको. मी बसतो तिकडे.”
“का? काय झालं अचानक?”
“काही नाही..आपलं ते …असंच…”
“हंम्म..”
“काही काम आहे का?”
“मला एक विचारायचं होतं.?
“काय?”
“तुम्ही सगळे आजकाल काय एवढी secrect meeting करत असता?”
“काही नाही. Project बद्दल बोलत असतो…”,कुमार नजर चोरत म्हणाला.
“मला खरं ते सांग.”,यश थोडा धमकीवाजा आवाजात म्हणाला तसा कुमार अजुन घाबरला.
“खरं तर त्या दिवसानंतर सगळेच थोडे tense आहेत. आणि …”
“आणि काय?”
“Sandhya wants us to use as a witness. म्हणून मग त्या दिवशी काय झालं हे पोलिसांना सांगताना आम्ही काय बोलायचं हे ती आम्हांला सांगत होती.”
“एवढंच?”
“हो एवढंच.”
“अजुन काही सांगण्यासारखं आहे  का? सांग मला please.”
“meeting झाल्यावर संध्या पुन्हा त्रिशा आणि परेश सोबत काही बोलताना मी एकदा दोनदा बघीतलं.”
“काय बोलत होते?”
“मी ऐकलं नाही.”
“एखादा शब्द किंवा काही…”
“नाही काहीच नाही. मला नाही कधी ऐकू आलं.”
“ok.”
यशने असं म्हटलं आणि त्याने डब्यातला शेवटचा घास तोंडात टाकला. डबा आवरुन  तो हात धुवायला गेला.
परेशचं नाव ऐकुन यशला आठवलं की काही महिन्यांपुर्वी एका project वरुन दोघांमध्ये वाद झाला होता. पण client ला यशचं code design जास्त आवडलं होतं.पण तो वाद तर तिकडेच संपला होता. मग आता काय झालं असेल? असं यशला वाटून गेलं. तसंही स्वीटी आणि परेश सोमवारी म्हणजे पुढच्या आठवड्यात office ला येणार होते. त्यामुळे तेव्हाच बोलता येणार होतं.
शुक्रवार असाच गेला. त्या दिवशी ना कोणाशी बोलणं झालं ना नविन माहीती मिळाली. 
आता weekend होता. एकदा पुन्हा जुईली, यश, वृषभ आणि संजीव भेटले. यावेळेस संजीवने दिलेला option कसा अमलात आणायचा यावर विचारविनिमय झाला. संध्याचा लहान भाऊ सौरभ Sunday ला येणार होता. त्याला gym ची आवड आहे याची माहीती संजीवने दिली. मुंबईला आल्यावर सौरभ कोणत्या gym मधे जातो हेसुद्धा संजीवने शोधले होते. जिमची आवड असली तरी सौरभ बराच लहान असल्याने वृषभ त्याला control करु शकेल असे ठरले. मंगळवारचा दिवस ठरला. त्याआधी त्रिशा आणि परेशशी बोलता येईल का हेदेखील यशने बघायचे ठरले. बरंच  planning केल्यावर  सगळे थोडे नॉर्मल झाले. 
“संजीव पण आपण हे योग्य करतोय ना? असं एखाद्या मुलाला ताब्यात घ्यायचं म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं.”, यश काळजीने म्हणाला.
“यश मी तुला म्हटलं ना की आपण काहीही चुकीचं नाही करणार. सौरभला आपण काहीही करणार नाही. आपल्याला फक्त संध्याला घाबरवायचं आहे. जेणेकरून ती बोलण्यास तयार होईल.”
“आणि मी असताना तू काळजी का करतोय. मी सौरभला काहीही होऊ देणार नाही. आपण फक्त त्याची help घेणार आहोत. त्याला kidnapped नाही करणार.”,वृषभ म्हणाला.
“सौरभ ची काळजी ही माझी जबाबदारी.”,जुईली म्हणाली तसं सगळे हो म्हणाले.
रविवार उजाडला तसा यश जरा उशिराच उठला. सगळं आवरून जरा निवांत news बघत बसला. खुप दिवसांनी त्याला थोडा मोकळा वेळ मिळाला होता. मनातली भिती कमी झाली होती. पण संपली नव्हती.  सहजंच तो खिडकीतून बाहेर बघत सकाळच्या सुंदर दृश्यांचा आस्वाद घेत स्वत:शीच हसत होता. 
“घरी अशीच सकाळ असते.”, तो मनाशीच म्हणाला आणि त्याला आठवले की इतके दिवस झाले आईबाबांना फोन नाही केला. शुभस्य शीघ्रम्!
“Hello आई मी यश बोलतोय.”
“कोण यश? अरे किती दिवसांनी फोन करतोय. जीव लागून राहीला होता. कसा आहेस तू? ठिक आहेस ना. तब्येत कशी आहे तुझी? खाल्लं का काही? आणि कधी येणार आहेस घरी? खुप दिवस झाले रे तुला बघून..तू.ऽऽ..”
“अगं थांब जरा. मला बोलू देशील का? किती प्रश्न विचारतेस.”
“हो..बोल रे…”,असं म्हणून यशच्या आईने पदराने डोळे पुसले.
“मी ठिक आहे गं. सगळं छान चालू आहे. ऑफिस आणि घर दोन्ही पण.”,यश अधांतरी नजर लावून म्हणाला.
“आता बस एकदा नातवंडाचा चेहरा बघितला की आम्ही मरायला मोकळे.”
“काय गं आई काहीपण बोलतेस. आणि बाबा काय करत आहेत. दे ना त्यांना फोन.”
“हो देते.”, असं म्हणून आईने यशच्या बाबांना फोन दिला.
“Hello यश बाबा बोलतोय. कसा आहेस बेटा?”
“मी ठिक आहे. तुम्ही कसे आहात?”
“मीपण ठिक आहे.”
“काळजी घ्या बाबा स्वत:ची.”
“हो रे. तूपण काळजी घे. काही लागलं तर सांग. आणि इकडची चिंता नको करुस. कामावर लक्ष दे. मोठा हो.”
“हो बाबा. ठेवतो आता.”
“हो.”
यशने घरी झाल्या प्रकाराबद्दल सांगणं टाळलं. उगीच त्यांना कशाला काळजीत पाडायचं आणि त्रास द्यायचा. असं असलं तरी आई बाबांशी बोलून त्याला एक प्रकारची positivity आली.

🎭 Series Post

View all