तीची शिकवण

I Like To Read.

अष्टपैलू लेखक महासंग्राम
तीची शिकवण  (लघुकथा)


दुपारचे दोन वाजले होते. प्रियाचे डोळे दरवाज्याकडे खिळले होते. अजून श्रिया कशी नाही आली, या विचारात ती दरवाजा बाहेर उभी राहिली. श्रिया ४ थी मध्ये होती. रोज एव्हाना श्रिया शाळेतून आलेली असायची आणि मग दोघी ऐकमेकिंना आज काय झालं ते सांगत जेवण करायच्या,पण आज रोजच्या पेक्षा एक तास होऊन गेला तरी ती आली नव्हती.
मम्मी, आवाजाने ती भानावर आली.
श्रियु, अग आलीस आज उशीर . तिला पाहताच प्रियाला हायस वाटलं. दोघीही घरात गेल्या. श्रिया लगेच फ्रेश व्हायला गेली.
दोघी नेहमीच्या गप्पा ,जेवण करून आवरत होत्या.
"ताई आत येऊ का?"
प्रिया ने मागे वळून पाहिले तर एक मध्यमवयीन बाई दारात उभी होती.
"कोण आहात तुम्ही ? प्रिया ने विचारले.
"आई, अगं ह्या रिक्षा काकी आहेत."
काय?
"ताई, तुमची श्रिया खूपच समजूतदार आणि दुसऱ्यांना मदत करणारी आहे. "
"म्हणजे अस काय झालं , तुम्ही नक्की कोण आहात. "प्रियाने मध्येच विचारलं.
"अगं ,आई आता च तर सांगितलं ना मी, ह्या रिक्षा काकी तुला कळलं नाही का, म्हणजे रिक्षा काकांच्या काकी.
बरं, कळलं . काकी आत या ना.
"ताई, तुमची मुलगी खुप समजदार आणि हुशार आहे.
तीची आज खूप मदत झाली."
काकी पुढे काही बोलणया आधी च श्रियाने सांगायला सुरुवात केली.
"आई, खास काही नाही. मी सांगते,काय झालं ?" तीने काकींना पाणी दिले.
"आम्ही रोज सारखं येत होतो, तुला माहितीये ना शेवटी मी आणि आर्या असतो. मी नेहमीसारखी बसले होते आणि आर्या झोपली होती .तर अचानक काकांनी रिक्षा रस्त्याच्या एका बाजूला थांबवली . मला वाटलं आर्या च घर आलं. मग मी पुढे पाहिल तर काका डोक्याला हात लावून डोळे बंद करून बसले होते."
"काका,काय झालं?"
"थोडंसं चक्कर सारखं वाटतं आहे. "
"काका हे घ्या, पाणी प्या. तीने त्यांना त्यांच्या बाटलीतल पाणी दिले. आणि हे पण खा. "म्हणत एक मेलडी चॉकलेट हातात ठेवलं.
श्रीयाने त्यांचा फोन घेतला. शेवटचा कॉल कोणाला होता, बघून तो कॉल लावला.
फोन काकांच्या रिक्षा वाल्या मित्राचा होता.
श्रियाने त्यांना सगळं सांगितलं. रस्ता रोजचा असल्याने तिने ते कुठे आहेत नीट सांगितले.
दहाच मिनिटं मध्ये काकांचे मित्र त्यांच्या अजून दोन मित्रांना घेवून आले. आणि त्यांच्या बरोबर ह्या काकी पण होत्या.
ते काकांना डॉक्टर कडे घेवून गेले.
त्यातल्या एका काकांनी आर्याला आणि मला घरी सोडले. ती थोडीशी घाबरली होती. म्हणून मला उशीर झाला. तूच म्हणतेस ना आपल्याला जमत असेल तर मदत करायची. तूच तर शिकवलंस ना , तेच तर केलं ."

"काकी, काका कसे आहेत आता डॉक्टर काय बोलले."प्रिया
"ताई,अहो त्यांचा बी. पी. लो झाला होता. माझा मुलगा त्यांना घरी घेवून गेला आहे. बरे आहेत आता. सकाळी घाईत गोळी विसरले.नशीब तुमची श्रिया होती .तिने पटकन फोन केला म्हणून. Thank यू श्रिया बेटा.
युवर वेलकम.
काकी आभार मानून निघून गेल्या.
प्रिया ने श्रियाच्या डोक्यावरून हात फिरवला .आणि हसून तिला मिठी मारली.

समाप्त.

मधुरा महेश किजबिले.