शापित मासिक पाळी

ईराचे महान कार्य

शापित मासिक पाळी .....!!

    अत्यंत संवेदनशील व नाजुक विषय हाताळताना याला सामाजिक किनार जोडाविसी वाटते...केवळ स्रीच्या वाट्याला आलेले भोग तीने पिढ्यानपिढ्या भोगतच रहावे काय...? मासिक पाळी ही स्रीला जन्मजात व नैसर्गिक देणगी दिलेली आहे तीचे समाजाने असे अवडबंर करावे काय....!! मासिक पाळी ही स्रीची नैसर्गिक प्रक्रिया आहे...त्यामुळे महिन्याला हे ऋतुचक्र चालु असते... या महान देणगीने जगाची निर्मिती केली आहे..भुगर्भातुन जसा अंकुर जन्माला येतो तसा स्रीच्या उदरातुन या मानवाची निर्मिती झाली आहे... 
   पण या मासिक पाळीबद्दल स्रीला पदोपदी अपमानाच्या ठेचा खाव्या लागल्या आहेत...अनेक बंधने तिला जखडुन ठेवले आहे .. या काळात तीने स्वयंपाक करायचा नाही ,  देवघरात  व मंदिरात प्रवेश नाही , कोणत्याही गोष्टीला हात लावणेचा नाही...अशा समाजघोषीत नियमांची स्री नेहमी शिकार झाली आहे.. 

     वास्तविकता वेगळीच आहे...या चार दिवसात स्रीच्या ओटीपोटात दुखत असते..रक्तस्त्रावाने अशक्तपणा आलेला असतो.. मनाची बैचनी वाढलेली असते..   अशावेळी तिला सशक्त आहार व आधाराची गरज असते...तिला आराम हवा असतो.....!धार्मिक कार्यात नकोशी असणारी स्री अशावेळी शारीरिक व कष्टाच्या कामाला जुंपलेली असते हे विदारक सत्य काळानेही मान्य करावे हे स्रीच दुर्देव...!!

      वैज्ञानिक युगात वावरताना स्रीला मासिक पाळीत सॕनीटरी नॕपकीन्सची जोड मिळाल्याने सुलभतेने वावर करता आला व पुर्वी कापडी पट्टी ठेवल्याने दुर्गंधी व अस्वच्छता होती यामुळे दुर झाली .याच अनुशंगाने ती आज विविध क्षेत्रात भरारी घेत आहे.

      आता स्रीचा हा विटाळ थांबला पाहिजे ..समाज एका सकस वैचारिकतेकडे जात असताना मासिक पाळीबद्दल सगळीकडे आता जागरुकता निर्माण व्हायला पाहिजे ...सन्मानजनक वागणूकीची सर्व क्षेत्रे तिला खुली केली पाहिजेत ..... अन स्रीने पण सारी बंधने झुगारुन निडरपणे समाजात वागले पाहिजे .. हा समाज तसा सहसा अशा गोष्टीसाठी सकारात्मक विचार करेल असे वाटत नाही..त्यासाठी स्वतःहून स्रीशक्तीने या नाजुक विषयाला सचेतन दिले पाहिजे...!!

     मासिक पाळीबद्दल असलेले गैरसमज व याकरिता महिलांना दिलेला आधार फार महत्वपुर्ण असुन यापुढेही याबद्दल अधिकाधिक जागरुकता निर्माण व्हावी व या जीवघेण्या अंधश्रद्धेतुन स्रीची मुक्तता व्हावी हीच सदिच्छा ..!!

समजुन घेताना तुला 
जीव असा लावावा
वेदनेच्या तुझ्या आम्ही 
मनांमनातुन स्विकार करावा...

विज्ञान युगात वावरतो आम्ही 
अंधश्रद्धेला पुजते सारी 
बुरसठलेल्या विचाराने 
त्रास हा भोगते प्रत्येक नारी 

पवित्र असते नित्य प्रतिमा 
मनात हा न्युनगंड कायमचा 
विसर न होतो प्रत्येक क्षणाचा 
तगादा ठरलेला निरपेक्ष मनाचा 

नाही मंदीरात प्रवेश तुजला 
का असे वाळीत टाकले मजला 
हृदयात येती या यातना 
पदोपदी सतावते ही अवहेलना 

पती हाच परमेश्वर मानावे 
कामज तुही दुर लोटावे 
विटाळ माझा असा वैरी 
मी किती हे सहन करावे 

मी असेन जरी सुगरण 
स्पर्शाला माझ्या मनाई 
असेल पाचीपक्वान दररोज 
का घ्यावी मी नवलाई

सण आसो वा समारंभ 
कोपर्यात मी झुरावे 
इतरवेळी मी हवी असणारी 
माझ्या मनाला दूर भिरकटावे 

प्रगल्भ विचार असुनसुद्धा 
नियतिने माझे पंख छाटावे 
मानवाच्या या नियमाला 
मलाच बळी का द्यावे 

दुरुन सोसते मी नजरा 
वक्रदृष्टी ही ठरलेली 
मासीक पाळीत दिसली नाही
तुम्हाला सृष्टी ही निर्मिलेली

मी आहे मुळातच शापित 
वेदना हेच माझ गुपीत 
पण मी भाग्य जगाचे रेखिते 
माझ्या या जीवापाड कुशीत


     ©नामदेवपाटील ✍