** शांता आत्या..** भाग -२

स्त्रियांची नाती

शांताबाई ;-. तसे नाही ताई,मी दोन चार घरी जाते ना कामाला,म्हणून मला स्वतः हाला घरी जाऊन आधी आंघोळ पाणी करायची असते.माझी छोटीशी देव पूजा करून मगच माझ्या एकटी साठी जे पाहिजे ते,करून खायचं असते.एकटीच जेवण बनवायला कशाला आळस करायचा तो.कोणाकडून काही नेल तर घरी कुणी खाणारे पण नाही.म्हणून तुम्हाला सांगते माझ्या साठी काही ठेवू नका अन् आग्रह पण करू नका.एवढीच विनंती तुम्हाला.. 

.
आई;-. खरंय की ओ शांताबाई,तुमच्या ही दृष्टिकोनातून विचारच केला नाही आम्ही.तुमचं बरोबर आहे.आणि एक गोष्ट.......
असं आईने बोलताच शांताबाई ने आईला बोलण्याचे मधेच थांबवले म्हणाली.... 


अजून एक विनंती आहे.माझे नाव शांता बाई आहे हे खरय ,मला छोटी छोटी नातवंडे पण आहेत,पण जिथे जिथे मी कामासाठी जाते.तिथल्या चील्या पिल्याना मी मला "शांता आत्या"म्हणायला सांगते.त्याला कारण असं की,पोरांना शाळेतल्या सवयी इतक्या लागल्यात की,धुण्यापुसण्याच काम म्हणजे "मावशी"असं समीकरणच करून ठेवलंय त्यांनी.....


आई,माधुरी,पप्पा,अन् माधुरीचा भाऊ मधेच हसायला लागले हे ऐकल्यावर.सगळ्यांना एव्हढे का पटले..?का हास्यास्पद वाटले असावे...?शांताबाई सगळ्यांचे हसणे बघून थोडी गंभीर झाली होती.तिच्या आवाजाचा ठेका बदलला होता.आवाजामध्ये एक धमक आल्यासारखी जाणवली 

.शांताबाई;-. बघा की तुम्ही सगळे विचार करून.एक बाई माणूस घरात भावाची बहिण असते,अन् बहिणीची पण बहिण असते.भावाची मुलं तिला आत्या म्हणतात.आणि बहिणीची मुलं मावशी म्हणतात.पण आपली पुरुष प्रधान संस्कृती ,परंपरा,इतकी खोलवर रुजली आहे की, समाजतल्या सगळ्या ,शाळा, कॉलेज, दफ्तरे, ऑफिसे,दवाखाने,अगदी भाजी विकणाऱ्या,सगळ्यांनाच मावशीच लेबल देऊन टाकलंय की.मी म्हणते का पण...??कशासाठी...?? जी सासरी जाते,ती आत्या पण असते,अन् मावशी पण असतेच की.मला ही गोष्ट काय पटत नाही.त्यामुळं मी सगळ्यांना मला शांता आत्या च म्हणायला सागितले आहे.


शांता बाईचे हे बोलणे ऐकून आई आणि मधुरीही जरा खुलल्या सारख्या झाल्या होत्या.का माहित नाही पण...असे वाटत होतं की,आयुष्या मध्ये त्यांनाही समाजाने जिव्हाळ्याच्या,आपुलकीच्या,माणुसकीच्या नावाखाली या मावशी या नात्याचाच उपयोग करून घेतला असावा.

*सामाजिक राजकीय , व आर्थिक क्षेत्रात स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करणारी प्रणाली/व्यवस्था म्हणजे फेमिनिझम*. ....उर्वरित bhag-3 मध्ये

🎭 Series Post

View all