शब्द ही निःशब्द

This is story of sparrow which died in car accident .

शब्द ही निःशब्द

माझ्या डोळ्यातील टिप टिप ओघळणाऱ्या अश्रूमधे माझ्या घरट्यात असणाऱ्या दोन जीवांची होणारी घालमेल तुला समजली नाही का? माझी दोन पिल्ले माझ्या परतीच्या वाटेला डोळे लावून बसले असतील . जेव्हा त्यांचे बाबा घरी येतील आणि माझी लेकरे बोबड्या आवाजात रडवेला चेहऱ्याने बाबांना विचारतील ,"बाबा बाबा आई कुते आहे?" ज्यांना अजूनही आई , बाबा , हे ,ते , च्या शिवाय त्याची शब्दभाषा ही अपरिचीत आहे .शिवाय त्यांना रात्री अंगाई गीत गात झोपण्याची जबाबदारी, सकाळी उठवून तयार करण्याची गडबड , त्यांचे पालनपोषण , त्यांचे संरक्षण करणे हे त्यांचे बाबा एकटे करू शकतील का ? शिवाय ते संरक्षणासाठी थांबले तर त्यांना खाऊ कोण घालेल? किती या असंख्य प्रश्नांची मनात होणारी उलाढाल ! माझ्या पिल्लांना उडायला आकाशात उंच भरारी घेण्यासाठी द्यावा लागणार धक्का आणि नाही जमलं तर झेलण्यासाठी त्यांच्या बाबांची होणारी अनंत पाराकाष्ठा. किती अवघड होऊन जाईल एकट्याने करणे. किती आनंदाने नवीन घराचे स्वप्न आम्ही दोघांनी सजवले होते . हायटेक सिटी मध्ये टू बीएचके घेऊन पार्किंग मध्ये फोर व्हीलर लावून वैकेशन साठी लंडन अमेरीका किंवा सीओल जायचे स्वप्न नव्हते , माझे तर गवतची काडी ,कापूस यापासून बणलेल्या नव्या घरट्यात ग्रह प्रवेश करून मला माझ्या दोन पिल्लांसह सुखी समाधानात जगायचे होते ,हेही माझ्या नशिबात नसावे का ? परमेश्वरा.

किती आनंदाने आले होते मी आणि माझा थवा . इथे खाऊ खायला , अन्न गोळा करायला. धन्य ती माऊली जी रोज आम्हाला इथे आपुलकीने साद घालून घालून आम्हा चिमान्यांना जेवू घालते . पण तिला तरी कुठे माहिती होतं की , तिला आज हे दृश्य असं बघावं लागेल . आम्ही खात असताना पटकन वेगाने धावून येणारी चार चाकी गाडी माझा एक्सीडेंट करेल आणि मला क्षणाचाही वेळ मिळणार नाही भूरकण उडायला . तिच्या डोळ्यातल्या अश्रुनी आज आमच्या चिमान्यांन वर असलेले अफाट प्रेम व्यक्त केल होत.

माझे सगळे सखेसोयरे शोक व्यक्त करत आहेत ते ही विद्युत खांबाच्या तारेवर बसून. माझ्या रक्तबंबाळ शरीरात असणाऱ्या वेदनेपेक्षा मला माझ्या कुटुंबाच्या वेदना माझ्या मनाला टोचत आहेत आणि जीव तडफडत आहे हे परमेश्वरा...

माऊली पसरशील तुझ्या अंगणात उद्या परत तू दाणे

तुझ्या चेहऱ्यावर असेल स्मिता हास्य पुन्हा तेच

चिवचिवाट करत येईल माझ्या सख्यासोयऱ्यांचा थवा तुझ्या दारी

मारशील तू हाका मायेने चिमण्या करतील अन्नाची वारी

माझी वारी मात्र इतर संपते त्या थव्यात मी आता नसेल

मी आता नसेल, मी आता नसेल.

चिमणी हा प्राणी हा पक्षी आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त आढळून येतो . प्रदूषण, वृक्षांची तोड , आधुनिकरण, विद्युत चुंबकीय लहरी यामुळे पक्षी जीवन धोक्यात आलेले आहे . 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो . पण सहा ते तीन वर्ष एवढाच जीवन कालावधी असणाऱ्या चिमणीला सुखाने तिचे आयुष्य जगण्याचा अधिकार नाही का? प्राणी, पक्षी नाही तर आपणच त्यांच्या जागेत अतिक्रमण केले आहे किंवा करत आहोत याचा साधा आभासही राहू नये का? आपल्याला . हे चमचमणाऱ्या टोलेजंग इमारतीमध्ये पक्षी जीवनाचे अस्तित्व कुठेतरी खूप आधीच हरवले आहे आणि हरवत आहे .

निसर्ग हाच देव आणि याच देवाने निर्माण केलेला निसर्ग. निसर्ग म्हणजे हिरवेगार डोंगर ,पांढरे शुभ्र पाण्याचे दुधासारखे धबधबे , महासागर एवढेच नव्हे तर दर्या खोऱ्यातून किलबिलनारे पक्षी आणि विविध जीवित प्रजाती सुद्धा. मग प्रत्येकाचे निसर्गातील स्थान , अन्नसाखळीतले स्थान तेवढेच महत्त्वाचे आहे . मग त्या जीवांना कळत नकळत ईजा पोहोचवण्याचा अधिकार आपल्याला आहे का ? नाही तर मग आपण त्यांच्या संरक्षणासाठी व्यक्तिगत असं काहीच प्रयत्न करत नसू तर त्यांना इजा पोहोचावे असे हानिकारक कृत्याही करू नये एवढी आणि सरळ गोष्ट बुद्धिमान मानव प्रजातीला समजू नये का ?

तिची उलिशीच चोच

तेच दात , तेच ओठ

तुला रे दिले देवाने

दोन हात दहा बोटे ?

निशब्द झाले माझे हे शब्द

तुझ्या या कृत्यापुढे...