Login

वेदनेचा गाव

वेदनांची भावना सांगणारी कविता

काव्य प्रकार:- नवकाव्य

शीर्षक:- व्रण

वेदना
कोणास कळल्या
अंतरास छळल्या
सखीच्या

वेदनेस
व्रण नसे
मुक असे
शब्दही

भावना
वेदनेचे जाणले
मलम लावले
आसवांचे

मुक
वेदनेचा गाव
अंतरीचा ठाव
घेई