वेडे मन

I like to read.

वेडे मन 

समजले ना तुला कधी 
            वेडे मन माझे!
निःशब्द डोळे अबोल ओठ हे
अन त्यातले मुके बोल
पाहूनही न ओळखलेस कधी
                   वेडे मन माझे !

तुझ्या हास्यात असे हसू
अन उदास होता तू
माझ्या डोळ्यातून येई अश्रू
हळूच रडी उगीच
                  वेडे मन  माझे !

का कळले नाही तुला कधी 
कसे शक्य  आहे  हे
ना समजणे तुझे
                  वेडे मन माझे !

********
मधुरा  कीजबिले