Login

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें चा अर्थ Vriksha Valli Aham Soyari Vanchare meaning in Marathi

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें चा अर्थ Vriksha Valli Aham Soyari Vanchare meaning in Marathi
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें चा अर्थ Vriksha Valli Aham Soyari Vanchare meaning in Marathi

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें हा संत तुकारामांनी लिखित अभंग आहे पण या ओळींचा अर्थ जाणून घेण्याअगोदर आपण पूर्णच्या पूर्ण अभंग पाहूया कारण या अभंगाच्या ओळी एकमेकांशी संलग्न आहेत.

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।

पक्षी ही सुस्वरें आळविती ।।

येणें सुखें रुचे एकांताचा वास ।

नाही गुण दोष अंगा येत।।

आकाश मंडप पृथुवी आसन ।

रमे तेथें मन क्रीडा करी ।।

कंथाकुमंडलु देहउपचारा ।

जाणवितो वारा अवसरु ।।

हरिकथा भोजन परवडी विस्तार ।

करोनि प्रकार सेवूं रुची ।।

तुका म्हणे होय मनासी संवाद ।

आपुला चि वाद आपणांसी।।

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें चा अर्थ meaning of Vriksha Valli Aham Soyari Vanchare

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें चा अर्थ Vriksha Valli Aham Soyari Vanchare meaning in Marathi

मराठीत लिहिलेल्या संत तुकारामांच्या ग्रंथातील ही ओळ झाडांचे महत्त्व दर्शवते. या ओळीनुसार, झाडे पृथ्वीवरील आपले सर्वोत्तम मित्र आहेत. आपण झाडांशिवाय जगू शकत नाही.हा अभंग तुकाराम महाराजांनी वृक्ष वल्ली यांच्या पासून आपल्याला खुप फायदे आहेत, म्हणून तेच आपले सगे सोयरे आहेत ही महाराजांची धारणा आहे. वनातील पशु - पक्षी हे सुध्दा पांडुरंग विठ्ठलाचे नाम स्मरण करीत आहे, असे अभंगातुन सांगत आहे. आपले या वनाशी खर तर नातंच आहे.

चला आता जाणून घेऊया प्रत्येक ओळीचा अर्थ.

या वणांचे आवरण / मंडप म्हणजे आकाश आहे तर ही धरा एक प्रकारचे अंथरुण आहे. कोणी या आणि एकांत वास, सावली, वाऱ्याची झुळूक, पानांची सळसळ याचा मनसोक्त आनंद लुटा.
या ओळींमध्ये महाराज वृक्षांच्या सानिध्यात जीवनाचा घेता येणारा आनंद व्यक्त करतात.

याच वृक्ष वल्लींच्या सानिध्यात ऋषी - मुनी आपले आसन व कमंडलु घेऊन राहिले व याच एकांत वासात त्यांनी कथा रुपी कमंडलु ओतपात भरले.
ध्यान साधनेला या वृक्षांच्या मध्ये बसून शांतीचा अनुभव करण्याचे महत्त्व या ओळीतून साध्य होते.

जर तुम्ही कोण आहात, काय करत आहात, याचा जरी ओळख करून घ्यायची असेल, या वनांच्या सानिध्यात येऊन भजन कीर्तन करा, तेव्हा तुम्हाला तुमचा जन्म कशासाठी आहे याची उकल होईल. थोडक्यात आत्मज्ञान हवे असेल तर वृक्षांच्या स्थानी त्यात जाऊन स्वतःचे चिंतन करा असं महाराज म्हणतात ‌

मनाचा मनाशी संवाद साधायचा असेल तर हीच एकांत व योग्य जागा आहे. आयुष्य अजून सुंदर बनवायचे असेल समाधानाने जगायचे असेल तर वृक्षांच्या सानिध्यातच एकमात्र योग्य जागा आहे ‌.

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें चा अर्थ Vriksha Valli Aham Soyari Vanchare meaning in Marathi

0