विरुद्ध तो आणि ती

Decision Change Life

प्रिया:काय मग काय नवरीबाई काय म्हणतायत तुमचे होणारे पतीदेव????
नेहा:कसलं काय शांतच असतो तो .तोंडातून एक शब्द निघेल तर शप्पथ.

प्रिया:"आता शांतच बसेल गं लग्न झाले की बोलेल. तू एक्सपर्ट करशील त्याला...

नेहा:"काय कसलं expert दहा वाक्य बोलायची मी आणि त्याने एका शब्दात बोलून मोकळं व्हायचे..?मला वाटतं नको त्याच्याशी लग्न करायला. त्याला माझ्यात इंटरेस्ट नाही...

प्रिया:"ए बाई वेडयासारखी काही बोलू नको,असेल त्याचा स्वभाव शांत पण लगेच लग्न मोडण्यावर काय आलीस तू..भेट त्याला मग कळेल तो कसा आहे..

नेहा:"हो गं बरोबर बोलते आहेस तू....भेटतेच आता...

नेहाने अमोलला फोन लावला तिचा होणारा नवरा...

नेहा:"अमोल आपण भेटूया का उद्या???

अमोल:"हो भेटूया पण उद्या रात्री आठ वाजता....

नेहा:"रात्री... लवकर भेटूया ना सकाळी म्हणजे पूर्ण दिवस आपल्याला वेळ मिळेल...

अमोल:"भेटलो असतो पण जरा काम आहे,भेटल्यावर सांगतो"..

नेहा:"बरं चालेल"...

नेहा तंद्रीत गुंग झाली ..हा असा काय ह्याला तर भेटायची ओढ पण नाही .काय माझ्या मैत्रिणी किती एन्जॉय करतात आणि मेली मी .उद्या भेटल्यावर बघतेच त्याला..


नेहा ठरलेल्या ठिकाणी येऊन पोहोचली..अजून अमोल आला न्हवता. तिला रागच आला .एकतर रात्री बोलावतो आणि वरून स्वतः late येतो...तिने मनोमन ठरवले ह्याला लग्नाला नाहीच बोलायचे आता.

अर्धा तास वाट पाहिल्यावर नेहा जायला निघाली..पाठून अमोल धावत पळत आला..

नेहाने रागानेच पाहिले त्याला..

अमोल:"सॉरी नेहा..late झाला आणि माझा फोनसुद्धा स्विच ऑफ होता"...

नेहा:"अमोल मला ना विचार करावा लागेल आपल्या लग्नाविषयी .तू खूप वेगळा आहेस. अबोल आहेस..आणि मला जसा नवरा हवा तसा एकही गुण नाही तुझ्यात..आपले स्वभाव खूप विरुद्ध आहेत.. त्यामुळे लग्न न केलेले बरे.एका श्वासात बोलून मोकळी झाली

अमोल:"एकदा ऐक नेहा".

नेहा:"सॉरी अमोल मला काहीच ऐकायचे नाही"..bye.....

नेहा निघून गेली..अमोल तिच्याकडे आशेने पहात होता पण तिने पाठी वळून बघीतले नाही.....


घरी आल्यावर तिने आई बाबांना सांगितले मला अमोलशी लग्न करायचे नाही. त्याचा स्वभाव वेगळा आहे आणि माझं काही त्याच्याशी जमणार नाही..

आई:"नेहा असा रोखठोक निर्णय घेणे योग्य नाही"..काय झालं नक्की..

नेहा:"अगं आई तो किती शांत आहे बोलतच नाही...त्याला माझ्यात इंटरेस्ट नाही मला जाणवून येते ....

आई:"मी त्याच्या आईशी बोलते एकदा..

नेहा:"तुला जे बोलायचे ते बोल पण मी काही लग्न करणार नाही..ती रूममध्ये निघून गेली

दारावरची बेल वाजली... अमोल आला होता..


नेहाच्या बाबांनी त्याला विचारले...."काय झाले नेहा लग्न का नको म्हणतेय "

अमोल बोलू लागला...
तितक्यात नेहा आली...

अमोल:"मी अबोल आहे हे मलाही माहीत आहे पण त्याचा इतका त्रास नेहाला होतो माहीत न्हवतं.. माझा स्वभाव बदलेले किंवा नाही हे मी सांगू शकत नाही पण जर सुरवातीलाच माझ्याविषयी नेहाच्या मनात इतका राग आहे तर ते नातं पुढे न नेहलेले बरे..हेच सांगायला मी आलो होतो..

आई बाबा एकेमकांकडे पाहू लागले..

नेहा काल तू मला फोन केला .मला भेटायला बोलावले .मला उशीर झाला.मी सांगत होतो पण तू तर तडक निघून आली..खरंतर तुला भेटण्याच्या condition मध्ये न्हवतो कालच माझ्या मित्राचा ऍकसिडेंट झाला होता आणि त्याचं आज ओपरेशन होते..त्याला रक्ताची गरज होती म्हणून आम्ही मित्र दिवसभर दवाखान्यात होतो.. जशी त्याची सर्जरी झाली तसा मी तुला भेटायला आलो..तुला राग येणे सहाजिक आहे..विचार केला भेटूनच तुला सर्व सांगावे.त्यात माझा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ झाला..असो तू बरोबर आहेस. आपण लग्न नकोच करायला..

नेहा:"खरंच सॉरी मी ऐकून घ्यायला हवे होते"...i am so sorry अमोल...

अमोल:"its ok neha"....

पण तू बरोबर म्हणाली आपलं काही जमणार नाही...आपण दोघेही विरुद्ध स्वभावाचे आहोत.. त्यामुळे हे लग्न नकोच.मी हे रागात नाही बोलत. मी सर्व विचार करून बोलतोय..तू तुझ्या स्वभावाला साजेसा मुलगा शोध आणि मी माझा स्वभाव accept करेल अशी मुलगी शोधतो..बाय ..काळजी घे...


नेहा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती...
मनोमन स्वतःला दोष देत होती आज तिने अमोल सारख्या मुलाला गमावले होते..


©®अश्विनी पाखरे ओगले
लेख आवडल्यास लाईक, शेअर, कंमेंट करा..
मला फॉलो करायला विसरू नका..