थींड

थींड

शाळा सुरू झाली होती. प्रत्येक वर्गातील शिक्षक विद्यार्थ्यांना

शिकवत होते. असेच वर्ग आठ मधील इंग्रजी विषयाचे शिक्षक

विद्यार्थ्यांना शिकवत असताना मध्येच एक विद्यार्थी उठून उभा

राहिला. ' सर , मला थींड या शब्दाचा अर्थ सांगा ना. '

शिक्षक विचारात पडले. कारण त्यांनी हा शब्द कधी ऐकला नव्हता.

तरीसुद्धा त्यांनी कशीबशी वेळ मारून दिली.

दुसऱ्या दिवशी त्याच मुलाने तोच प्रश्न पुन्हा विचारला.

आता मात्र सरांना दरदरून घाम सुटला. काय करावं त्यांना सूचेना.

प्रकरण मुख्याध्यापकापर्यंत गेलं. अखेर मुख्याध्यापकांनी

त्या मुलाला केबिनमध्ये बोलावले. आणि विचारले '  बेटा,

मला सांग हा शब्द तू कशाच्या संदर्भात विचारत आहे.

कुठे मिळाला तुला हा शब्द. तेव्हा त्या मुलाने सांगितले.

सर, मी काल चित्रपट पाहायला गेलो होतो. चित्रपट संपल्यावर

शेवटी स्क्रीनवर ' Theend ' थींड असे लिहिले होते.

आता मात्र सर्वांनी कपाळावर हात मारून घेतला.

हसावं की रडावं त्यांना समजेना.शेवटी मुख्याध्यापकांनी

त्या मुलाला समजावून सांगितले. बेटा तो शब्द असा आहे.

'  The end ' म्हणजे चित्रपटाचा शेवट झाला, चित्रपट संपला.

तेव्हा त्या मुलाचे समाधान झाले.