विचारांनी माणूस ओळखा

वागण्याने नव्हे तर विचारांनी माणूस ओळखा.


विचार



माणसाला जन्मतःच नैसर्गिक देणगी लाभली आहे ती म्हणजे विचार करण्याची.म्हणून माणूस हा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे.विचारांनी माणूस प्रगल्भ बनतो,विचार माणसाला जगण्याची दिशा दाखवतात,विचार माणसाला समाजात एक विशिष्ठ ओळख देतात.जितके आपले विचार चांगले तितकेच आपले आयुष्य सुकर आणि सहज होत.



कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा माणसाचा वैचारिक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो.चांगल्या विचारांमुळे आयुष्याकडे बघण्याचा नव्हे तर आयुष्यात येणाऱ्या अडचणींना आणि संघर्षाला सामोरे जाण्याची वेगळीच ऊर्जा प्राप्त होते माणसाला.


विचार हे दोन प्रकारचे असतात.

- सकारात्मक विचार

- नकारात्मक विचार.


समजा तुमच्यासमोर अर्धा ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं की या ग्लास कडे पाहून काय वाटतं ते सांगा.आता इथे फक्त दोन च गोष्टी सांगता येतील त्या म्हणजे


- अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे.

- अर्धा ग्लास रिकामा आहे.


या दोन्हीही गोष्टी अगदी बरोबर आहेत.पण जे लोक ग्लास भरलाय असं सांगतील त्यांचा वैचारिक दृष्टिकोन किंवा विचार हे सकारात्मक आहेत आणि जे लोक अर्धा ग्लास रिकामा आहे असं सांगतील त्यांचे विचार नकारात्मक आहेत असं सांगतील.


रोंडा ब्रन यांच्या रहस्य या कादंबरीत त्यांनी हेच सांगितलं आहे की माणूस जसा विचार करतो तसच त्याच्या आयुष्यात घडत.म्हणून आपला जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक हवा त्यासाठी आपले विचार सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे.



आपल्या आयुष्यात खूप लोकं असतात.प्रत्येकाची वागण्याची,प्रतिक्रिया देण्याची पद्धत वेगळी असते.काही जण शांत असतात,काही बोलकी,काही उत्साही,काही उदास,काही लोक बोलून व्यक्त होऊ शकत नाहीत तर काही बोलून मोकळे होतात.व्यक्ती तितक्या प्रकृती.त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो.काही लोकांना स्वतःला बदलायच असत तर काही लोकांवर आसपासच्या,घरातील वातावरणाचा आणि संसाराचा इतका पगडा असतो की प्रयत्न करूनही बदलणं कठीण जातं.



त्यामुळे माणसाचे वागणं कधी कधी चुकत असेल पण त्याला इतर गोष्टी जबाबदार असतील जसं की घरातील वातावरण,मित्रांची संगत.त्यामुळे त्या व्यक्तीची ओळख आपल्या मनात कोरण्याआधी त्याचे विचार कसे आहेत याचा विचार व्हायला हवा.


एखाद्या कठीण परिस्थिती मध्ये आपण कसा विचार करतो आणि संयमाने कसे वागतो यावर ती व्यक्ती कशी आहे हे ठरवायला हवं.


कधी कधी माणसाचं वागणं चुकू शकते.आपण माणसं आहोत चुकीला पात्र आहोत.कोणीच सर्वगुणसंपन्न किंवा परिपूर्ण नसतं.पण एखादी व्यक्ती वागण्यातून चुकली म्हणजे ती व्यक्ती चुकीची आहे असं होत नाही मी तर म्हणेन तस व्ह्यायला नकोय.आपलं वागणं हे कठीण परिसथितीतून घडलेलं असेल,ताण तणावामुळे घडलेलं असेल,मानसिक त्रासातून झालेली कृती असेल.पण म्हणून काय ती व्यक्ती चुकीची होते का? 



बऱ्याचदा आपल्याही बाबतीत असं घडत की आपण कोणालातरी बोलून दुखावतो,एखाद्याचा अपमान करतो,घरात विनाकारण भांडत राहतो,उगाच चिडचिड करतो आणि नंतर आपल्याला आपली चूक समजते आणि आपण माफी मागतो.हो ना ?? म्हणून काय आपण पूर्णपणे चुकीचेच असतो का? किंवा आपले विचार चुकीचे आहेत असं होतं का ?? तर नाही नक्कीच नाही.


काही गोष्टी आपल्याही नकळत आपण करून जातो आणि उशिरा लक्षात येतं. होतं असं सगळ्यांचाच.पण वागण्यातून त्या माणसाची ओळख ठरवण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा,त्याच्या वागण्या मागचं कारण लक्षात घ्या आणि त्याचे विचार समजून घेऊन त्याची ओळख ठरवा.