लव विथ अरेंज मॅरेज भाग२

पालकांनी मुलांना व मुलांनी पालकांना समजून घेतलं तर सगळंसगळ सोपं होतं.

शलाका आणि नरेश या दोघांच प्रेम खरं होतं.शलाका एक दिवस लॅपटॉप मध्ये दोघांचे फोटो बघत असताना तिचा चुलत भाऊ पाहतो आणि घरात सगळ्यांना सांगतो.काका -काकी शलाकाला खूप सुनावतात आणि घरातून बाहेर जायला सांगतात.आता शलाकाच्या आई-वडिलांना देखील नरेशविषयी समजते पण सध्या परीक्षा होईपर्यंत तू त्याचा विचार करू नकोस असं सांगतात.शलाका आता सहा महिने रूम करून राहत होती.परीक्षा संपली की नरेशला शेवटचं भेटून घरी जाते कारण पुण्यात राहण्याच कारण म्हणजे आता कॉलेज संपल होतं.शलाका जेव्हा घरी जाते तेव्हा तिला कोणीच काहीच बोलत नाही.चार पाच दिवसांनी तिला तिचे वडिल समजावतात की तुला पाहुणे बघायला येणार आहेत.शलाका वडिलांकडे नरेशचा विषय काढते ,त्यांना सांगत होती की तो खूप चांगला आहे ,चांगली नोकरीही आहे ,घरी आई-वडिल , मोठा भाऊ -वहिणी , घरी १० एकर जमीन सगळं काही आहे.वडिल शांततेने ऐकत होते.पण त्यांना हे पटत नव्हत कारण एकच.....मुलगा आपल्या जातीचा नाही.तिने खूप छान पद्धतीने वडिलांना समजावलं होत की ,बाबा मुलाची जात पाहण्यापेक्षा त्याची कर्तबगारी बघा,त्याचे गुण बघा ,आणि मी त्याच्यासोबतच आयुष्यभर सुखी राहू शकते.जो मुलगा बघायला येणारे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती असेलचं??आणि तो तुमची निवड आहे म्हटल्यावर चांगलाच असणारच कारण , कोणतेही आई-वडिल आपल्या मुलांचा वाईट विचार करत नाहीत.त्यांना नेहमीच वाटत असतं ,आपल्या  मुलांच भलं व्हावं.पण बाबा एकदा विचार करा मला लग्न करून जायचयं मग माझ्या मनाचा विचार करा कारण मी नरेशशिवाय दुसरया कोणाचाही विचार करू शकत नाही.प्लीज , एकदा नरेशला भेटा आणि तुम्हाला जर तो योग्य वाटला नाही तर तुम्ही म्हणाल तिथे मी लग्न करीन.
शलाकाच्या वडिलांनी रात्रभर विचार केला.शलाकाचं सुखचं तर हवय मला मग एकदा त्या मुलाला भेटायला काय हरकत आहे आणि तसंही शलाकाने माझा विचार केला म्हणूनच पळून न जाता मोकळेपणाने तिने सर्व कबूल केलं.मग दुसरया दिवशी शलाकाचे बाबा नरेशच्या घरी जातात त्याला भेटतात त्याचं घर छोटं असल तरी मन मात्र मोठ आहे हे कळलं आणि याच्यासोबत माझी मुलगी खूष राहील .घर काय आज ना उद्या होईलच की???आणि तिथेच शलाका आणि नरेशच लग्न पक्क करून घरी येतात.ही बातमी ऐकल्यावर शलाकाच्या आनंदाला पारावारच राहत नाही.त्यांच लग्न थाटामाटात होतं.आज त्यांचा ६ वर्षांचा सुखी संसार  आहे.एक २ वर्षांचा गोड मुलगा आहे.शलाकाने माहेराला न दुरावता वडिलांचा स्वाभिमान न दुखावता सासरच्या लोकांचीही मन जिंकली.नवरयाला हातभार म्हणून शिक्षीकेची नोकरीही करतेय.अशा पद्धतीने दोघांच प्रेम तर जिंकल पण याबरोबरचं माणसही जोडली गेली कोणालाही न दुखावता.
यातून एवढच समजतं की थोड मुलांनी पालकांना आणि पालकांनी मुलांना समजून घेतल तर सगळ सोपं होऊन जातं.