लव विथ अरेंज मॅरेज भाग१

घरच्यांची संमती मिळवून अखेरीस तिने लग्न केले.

"तुला दिलेला शब्द पाळायचा आहे
   आयुष्याच्या शेवटपर्यंत तुझ्यासाठीच जगायचं आहे......."
असा मॅसेज शलाका नरेशला पाठवते आणि तेवढ्यात शलाकाचे बाबा तिचा मोबाइल हिसकावून  घेतात.शलाका अत्यंत हुशार , अतिशय सुंदर ,एकदा बघताच क्षणी समोरच्याला मोहून टाकणारी होती.शाळेत असताना पहिला नंबर कधीच न सोडणारी , कोणत्याही मुलाशी न बोलणारी , फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करणारी ,कोणी विचारचं केला नव्हता की ती लव मॅरेज करेन.बारावीनंतर इंजिनियरींगसाठी तिने पुण्याला अॅडमिशन घेतलं होतं आणि काका-काकीकडे राहत होती.काकी सारखी आजारी असायची म्हणून सगळा कामाचा लोड शलाकाच्या अंगावर यायचा कधी कंटाळा केलाच तर तिला काकी एवढं टोचून बोलायची की शलाकाच्या सहनशक्तीपलिकडे जायचं.कॉलेज,काम आणि स्टडी हे सगळं करताना तिची दमछाक व्हायची.कॉलेजमध्ये नवीन असल्याने मन मोकळं करायलाही मित्र - मैत्रिणी नव्हते.तिच्याशी घरातलेही कोणीच प्रेमाने वागत नव्हते, अशातचं नरेशची fb ला फ्रेंड रिक्वेस्ट येते.ती नरेशची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करते.दोघांच्याही प्रोफाइलला फोटो नव्हते.दोघांनाही माहित नव्हतं कोण कसं आहे दिसायला.दोघाचं रोज बोलण व्हायचं मॅसेजवर.हळूहळू त्यांच बोलण वाढत चाललं होतं.दोघेही एकमेकांत गुंतत चालले होते.शलाका मनमोकळेपणाने नरेशशी बोलायची , सगळ शेयर करायची.तिला नरेशशी बोलून खूप हलकं वाटायचं.
एक दिवस नरेश मॅसेजवरच तिला प्रपोज करतो.तेव्हा ती नरेशला बोलते की, तू मला पाहिल देखील नाहीस आणि माझ्यावर प्रेम......जर मी दिसायला चांगली नसेल, तर तू मला सोडून देशील त्यापेक्षा आपण बेस्ट फ्रेंडस म्हणूनच राहूयात.नरेश तिला खूप छान उत्तर देतो आणि शलाकाही त्याच्या प्रेमात अखंड बुडून जाते.नरेश तिला सांगतो मी जर तुला पाहिले असते तर तुझं अंर्तमन मला कळल नसतं आणि तुझा चेहरा कसा आहे मला माहीत नाही पण तुझ्या मनाचे सौंदर्य खूप सुंदर आहे .आणि यामुळेच माझं मन तुझ्यावर जडले आहे.शलाकाने देखील नरेशला पाहिले नसते पण मनोमन तिलाही तो आवडत असतो आणि खूप विचार करून ती त्याला होकार देते.नकार देण्यासारखं काहीच नव्हतं कारण त्याला मुंबईला फार्मसी कंपनीत चांगला जॉब होता , घरी जमीन होती.त्यांच नातं बहरत होतं.सारखी टेंन्शन मध्ये असणारी , प्रत्येक सेमिस्टरला के.टी लागणारी शलाका आता आनंदी वाटत होती , के.टी न लागता फर्स्ट  क्लास मिळवत होती.त्या दोघांच बोलणं आता फोनवर होत होतं.चौथ्या वर्षीची पहिली सेम झाल्यावर ते दोघे भेटायचं ठरवतात.
नरेश रविवारी सुट्टीच्या दिवशी तिला भेटायला पुण्याला येतो.शलाकाही मैत्रीणीकडे चाललेय असं सांगून घराबाहेर पडते.दोघांचीही भेट होते , समोर काय बोलायचं दोघांनाही समजत नव्हते पण जणू नजरेनेच एकमेकांशी सगळं काही बोलत होते.नरेशला ती खूप आवडली होती कारण मनाप्रमाणेच तिचा चेहराही सुंदर होता.नंतर हळूहळू रिलॅक्स होऊन, गप्पा मारून ,फोटो काढून थोडंस फिरून घरी परत जायला निघतात.शलाकाही सावळा पण रूबाबदार नरेशचाच विचार करत करत बसमध्ये चढते.तिच्या स्टॉपचं कंडक्टरने नाव घेताचं विचारातून ती बाहेर येते आणि आनंदाने घरी जाते.
या दोघांच लग्न होतयं की नाही किंवा त्या दोघांना आपलं प्रेम मिळवण्यासाठी कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतयं हे पुढच्या भागात पाहू.