लग्न एक करार

लग्न हा अत्यंत वैचारिक प्रश्न आहे त्याचा विचार करावा

लग्न म्हणजे नेमकं काय?

मुलगा असो किंवा मुलगी लग्न हे जबरदस्ती आहे मुलीची इच्छा नसताना तिच्या सोबत जो गैरव्यवहार केला जातो त्याला लग्न म्हणतात खूप कमी मुली अशा आहे ज्यांना मनासारखं जगायला मिळत स्वतंत्र आयुष्य जगायला फक्त  आणि फक्त मुलगा म्हणून जन्माला यावं लागतं कारण मुलगी थोडी मोठी झाली म्हणजे आईबाबा यांच्यावर कस ओझ आहे हे समाज पावलोपावली त्यांना जाणीव करून देत असत .

सतत होणारा मनस्ताप आई वडिलांना नको असतो म्हणून मग तेही लग्न लाऊन द्याला निघतात मनाविरुद्ध होणारी कोणतीही गोष्ट असो समाज म्हणतो विरोध करा पण या समाजात एक मोठी गोष्ट मनाविरुद्ध घडते ती म्हणजे लग्न आणि १०० पैकी फक्त १० मुलींचे लग्न त्यांच्या मनाप्रमाणे होतात बाकी सगळ्यांचे मनाविरुद्ध आणि आवाज उठवायचा कोणाच्या विरुद्ध तर घरच्यांच्या ज्यांनी आपल्याला लहानच मोठ केलं प्रत्येकाच्या घरचे लग्न हा विषय जरा खूपच गंभीरतेने घेतात कारण त्यांना मुलीला स्वतःच्या मनाने लग्न करू द्यायचं नसत तिला तिच्या आवडीच्या जोडीदाराशी नाई तर त्यांनी आणलेल्या भरमसाठ पैसा असणाऱ्या मुलासोबत लग्न लाऊन द्यायचं असत त्यात त्यांची इज्जत शान आणि मान अभादित असतो हे प्रत्येक मुलीच्या बाबतीत घडतं मग ती कितीही उच्च शिक्षित का असेना पण तिने लग्न घरच्यांचं मर्जीने करावं .

.        तस तर घरचे करारच करतात लग्नाचं मुलीशी तिला ठणकावून सांगत असतात बाहेर संबंध ठेवू नको आम्हाला मन खाली घालायला लाऊ नको कळत नाई काय मन काय अपमान का वागतात प्रत्येक घरातले मंडळी असे खूप उदाहरण आहे खूप साऱ्या घटना अशा आहे की मनाविरुद्ध लाऊन दिलेल्या लग्नातून मुली पळून जातात मग तेव्हा घरचे कसे जगतात आणि त्या आधी मुलींनी सांगितलं की माझ अशा मुलावर प्रेम आहे तर घरून सरळ नकार का येतो.

हा कुठला करर आहे मुलींच्या आयुष्याचा आणि त्याच नाव आहे लग्न.

मनाविरुद्ध घडणारी आयुष्यातली सगळ्यात दुःखद घटना म्हणजे लग्न.

त्यातून समाज आणि परिवाराच्या इज्जतीचा विचार करून आयुष्य संपे पर्यंत खूप मुली आयुष्याची काटकसर करत असतात कारण त्यांनी करार केलेला असतो कधीही मार्ग सोडून न वागण्याचा . असा हा लग्न करार प्रत्येक स्त्री पुरुषाने विचार करावा आणि मुलींना लग्न हे स्व मर्जीने करण्याचं स्वातंत्र्य द्यावं तिचा जोडीदार तिला निवडू द्यावा.

निवड चुकली तर तुम्ही साथ द्या पण निवड करण्या आधीच त्यांचा निर्णय कसा चुकीचा हे त्यांना निर्णय बदलण्यास भाग पाडल्यासारखं  

.                                    ( तुमचीच एक मुलगी)

🎭 Series Post

View all