राणी अत्यंत हुशार , गुणी , समजुतदार आणि दिसायला देखणी अशी मुलगी.पण घरची परिस्थिती खूप हलाकीची.तिला अजून दोन छोटे भाऊ होते.दररोज काम केल्याशिवाय घरात चूल पेटत नव्हती.वडिल जेवढ कमवायचे तेवढ सगळ दारूवारी उडवून टाकायचे.मग राहीली कोण तर राणीची आई तिच्याच जीवावर घर चालायचं.राणीची आई रोज दुसरयाच्या शेतात कामाला जायची.राणी अभ्यासात हुशार होती पण तिला वेळेवर कधीच शाळेचा ड्रेस , वह्या ,पुस्तके ,फी मिळत नव्हती.उलट ज्या दिवशी शाळेला सुट्टी असेल त्या दिवशी ती आईसोबत शेतात कामाला जायची.अशा परिस्थितीत तिचं शिक्षण कसबस पुर्ण झालं.पैसे नसल्याने तिने बी ए केलं.आता तिचं लग्नाचं वय झालं होतं पण वडिलांना दारूपुढे दुसर काहीच दिसत नव्हतं पण तिच्या आईला मुलीची काळजी लागून राहीली होती.
राणीला खूप स्थळ येत होती पण अजूनपर्यंत नकारच येत होते कारण काय तर तब्येत जास्त नव्हती पण गुटगुटीत होती तिला शोभायचं ते.तेव्हा तिच्याच एका खास मैञिणीचं सानुचं लग्न १ महिन्यावर होतं.तिच्या मैञिणीला स्थळ आल पण , होकार आला पण आणि लग्न ठरलं पण.अशीच एक दिवस राणी सानुकडे गेली आणि खूप रडू लागली.सानुने विचारल काय झालं. राणी बोलू लागली ,बघ ना आत्तापर्यंत खूप सहन केल पण काहीच वाटल नाही पण माझ्यात काय कमी आहे की कोणताच मुलगा मला होकार देत नाही.सानुने तिला खूप समजावल आणि बोलली की, बघ लग्नानंतर तुझं सगळ एकदम भारी होणारे आणि जो मुलगा तुला हो बोलेल त्याच भाग्यच उजळेल ,खोटं हसून राणी घरी गेली.दुसरयाच दिवशी तिला एक मुलगा बघायला येणार होता.दुसरया दिवशी कांदेपोह्याचा कार्यक्रम झाला लगेचच त्यांचा होकार आला.राणी खूप आनंदात होती.नंतर त्या मुलाचे फोन येऊ लागले त्याने तिला पटवून दिलं होत की त्याच राणीवर किती प्रेम आहे.अखेर लग्नाचा दिवस उजाडला .
राणीला तीन चुलते होते सगळ्यांनी थोडा थोडा खर्च उचलून तिचं लग्न थाटात लाऊन दिलं.लग्नानंतर फक्त एकदाच आणि तेही एकच दिवस तिला माहेरी पाठवलं.नंतर नव्या नवरीला पहिल्या सणाला माहेरी पाठवतात अशी रीत असते पण ती कधीच माहेरी आली नाही.एक दिवस तिचा एक चुलता वारल्याचं त्यांना सांगितल तर फक्त एक तास तिला नवरा घेऊन आला आणि लगेच परत घेऊन गेला.राणीने खूप स्वप्न रंगवली होती, तिने तिची सुख -दु:ख लग्नाच्या आधीच नवरयाला सांगितली पण त्याने तिचा गैरफायदा घेतला.लग्नानंतर राणीला समजलं की तिचा नवरा काहीच काम करत नाही फक्त लोळत असतो दिवसभर घरात.जे काही फोनवर बोलायचा त्यातला शब्द न शब्द खोटा होता.राणीच्या सासरचे मुंबईत राहायचे आणि गावी घर , जमीन सगळ होतं.राणीशी लग्न यासाठीच केल होत कारण तिला गावी ठेऊन शेती करायला लावायची आणि तसचं झाल तिला गावी पाठवलं.नवरा एक दिवस गावी जायचा आणि परत मुंबईला निघायचा.पण शेतात कष्ट माञ एकटी राणीच करायची तिचा नाईलाज होता माहेरची परिस्थिती पण अशी नव्हती की आयुष्यभर तिला कोणी सांभाळेल.राणीला स्वत:च्या आईला फोन करायचीही मुभा नव्हती किंवा माहेराला जायचीही .ती मुकाट्याने सगळ सहन करत होती.तिला मोठी जाऊ होती पण तिनेही कधीच राणीची बाजू घेतली नाही , ती मस्त आरामात मुंबईत राहत होती .घरातलेही तिला काही बोलत नव्हते कारण तिचा नवरा कमावत होता.पण राणीचा नवरा रिकामटेकडा त्याला कोणाला काही बोलायला तोंडच नव्हतं.राणीचं माञ आयुष्य उध्वस्त झालं. "इकडे आड आणि तिकडे विहीर " अशी परिस्थिती झाली होती.तोंड दाबून बुक्क्यांचा मार ती सहन करत होती. तिला कामाच काहीच वाटत नव्हत , शेती करुया पण नवरा बायको दोघे मिळून करू असं तिच मत होत.पण तिचं कोणासमोरच काहीच चालत नव्हत.राणीच आयुष्य माञ बरबाद झालं होतं.तिचा बाहेरच्या जगाशी संबंधच उरला नव्हता , ती पार बिथरून गेली होती.राणीसारख्या खूप मुली समाजात अशाच झगडत असतील पण त्यांच्या व्यथा कळणार कशा...आणि ही सत्यघटना आहे.
राणीच्या नवरयाला बहीण असती आणि तिच्याबाबतीत हे घडल असतं तर राणीचे सासु-सासरे शांत बसले असते का?? मग मुलाला खडसावण्यापेक्षा सुनेला कसं ताबलून घ्यायचं हे अशा सासु सासरयांकडून शिकावं ??? मुलाने काम केले नाही तरी चालेल पण त्याच लग्न माञ झाल पाहीजे.स्वत:ची जबाबदारी स्वत:लाच घेता येत नाही तो बायकोला काय सांभाळणार , मुलं तर लांबची गोष्ट......... मग प्रश्न पडतो की लग्न करताना पालकांची निवड योग्य की स्वत:ची.
प्रिय वाचकहो,ही घटना तुमच्या मनाला भावली असेल तर मला फॉलो करा , मी असेच अजून सामाजिक प्रश्न समोर आणण्याचा प्रयत्न करीन आणि लाईक करा , याविषयी तुमच मत कमेंन्ट करून कळवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा