परी हि एक साधारण मुलगी वेग वेगळ्या गावाला राहिलेली कारण तिचे पापा गव्हर्नमेंट सेर्व्हन्ट होते त्यामुळे नेहमी ट्रान्सफर होत असायची.परी स्वभावाने खूपच लाजाळू मुलगी होती. बारावी पर्यंत च शिक्षण पूर्ण झाल्यावर ती फॅमिली सोबत नाशिक ला राहायला आली. तिला एक मोठा भाऊ एक लहान बहीण मम्मी पप्पा आणि ती अशी ५ मेंबर ची फॅमिली होती. नाशिक ला तिने पॉलीटेकनिक कॉलेज ला ऍडमिशन घेतली ऑगस्ट महिन्यात कॉलेज सुरु झालं. नवीन कॉलेज मध्ये कोणी ओळखीचे नसताना जाण्यासाठी ती खूप घाबरली होती तरी सुद्धा तिला जावं तर लागणार होत. कॉलेज ला जाण्यासाठी तिला या वर्षी स्कूटी घेऊन दिली होती. कॉलेज चा पहिल्या दिवशी परी तयार झाली थोडी घाबरली होती पण मम्मी पप्पा चा सपोर्ट ने ती कॉलेज ला गेली. कॉलेज ला गेल्यावर गाडी पार्क करून watchman चा मदतीने तिला तिचा क्लास कुठे आहे ते कळलं. ती क्लास मध्ये गेली, क्लास मध्ये मुले जास्त आणि मुली कमी होत्या ती एका मुली जवळ जाऊन बसली त्या क्लास मध्ये कोणी च तिच्या ओळखीचे नव्हते. त्या मुळे ती ज्या मुली जवळ बसली त्या मुलीचं नाव सुद्धा तिला माहित नव्हतं. क्लास मध्ये जात बरोबर lecture सुरु झालं त्यांनतर पुन्हा 2 lectures झाले मग लंच time होता. तेव्हा तिने त्या मुलीला नाव विचारलं त्या मुलीने रोहिणी नाव सांगितलं आणि रोहिणी ने सुद्धा परी ला नाव विचारून कुठे राहते वगरे विचारलं. असं बोलणं सुरु असताना ….
रोहिणी – तू कॉलेज ला कशी आली?
परी- मी स्कूटी नि आली काबरं?
रोहिणी- अग मला न कॉलेज ला यायला साधन नाही आहे एक तर माझ्या कडे गाडी नाही आणि बस नि यायचं झालं तर माझ्या घरा जवळ बस थांबत नाही. तू मला रोज पिक अप आणि ड्रॉप करशील का ग परी? मी पेट्रोल चे पैसे देणार. तस हि मी बस ने किंवा गाडीने आली असती तर मला पैसे लागलेच असते न.
परी- हो अग चालेल ना मला पण तुझी सोबत होणार एकटी येण्या पेक्षा मला पण बर होईल तू सोबत राहशील तर.
रोहिणी- ठीक आहे मग आज मी घरी जाताना तुझ्या बरोबर येते म्हणजे तुला मी माझं घर दाखवून देते उद्या पासून तू मला पिक अप करू शकशील.
परी- हो चालेल. आज तर मी घाबरली होती कॉलेज चा पहिला दिवस कसा जाईल पण तू मिळाली म्हणून बर झालं.
रोहिणी- हो मला पण तसंच वाटत आहे खरं तर मी गर्ल्स स्कूल मध्ये शिकली आणि कॉलेज मध्ये boys पण असणार या विचाराने मी जास्त घाबरली.
परी- होका अग मी पण गर्ल्स स्कूल मध्ये शिकलेली आणि मी सुद्धा याच कारणाने जास्त घाबरली होती.
कॉलेज संपल्यावर ठरल्या प्रमाणे परी ने रोहिणी ला घरी सोडलं मग ती आपल्या घरी गेली.
आता पुढे कॉलेज मध्ये काय होते ते आपण पुढील भागात पाहू.