रेशीमगाठ भाग ६

love story

परी आणि राज ला आता एकमेकांशिवाय करमत नव्हतं, त्यांना वाटत होत कि कधी कॉलेज सुरु होईल आणि कधी आपण भेटू. त्यांना एकमेकांचा सहवास हवा हवासा वाटत होता. एक महिन्यानंतर कॉलेज  सुरु झालं. तस तर कॉलेज १५ दिवसानंतरच सुरु झालं पण एक महिन्यापर्यंत कोणी अटेंड केलं नव्हतं. म्हणून एक महिन्यानंतर सर्व जण कॉलेज ला आले. राज आणि परी एकमेकांना पाहून खुश झाले. इतक्या  दिवसानंतर भेटले होते काय बोलावं हेच त्यांना समजत नव्हतं. पण राज च्या मनात काहीतरी सुरु होत. आणि परी च्या ते दुरूनच लक्षात आलं. राज च्या जवळ गेल्यावर परी त्याला विचारणारच होती कि काय झालं काही प्रॉब्लेम आहे का? तितक्यातच राज बोलला.

राज: हाय परी.

परी: हाय राज.

राज: कशी आहे?

परी: मी ठीक आहे. तू कसा आहे?

राज: मी पण ठीक आहे. खूप दिवसानंतर भेटलो.

परी: होण.

राज: कुठे गावाला वगरे गेली होती का सुट्ट्यां मध्ये?

परी: नाही मी गावाला नव्हती गेली. तुझ्या कश्या गेल्या सुट्ट्या?

राज: काही नाही ग मी पण घरी च होतो. मला तुला एक गोष्ट सांगायची आहे.

परी: होका. मला वाटलंच तुझा कडे बघून.

राज: म्हणजे.

परी: तुझ्या मनात काहीतरी सुरु आहे असं वाटलं मला. बर सांग न काय सांगायचं आहे.

राज: इथे नको. कॉलेज झाल्यावर कॅन्टीन मध्ये भेटूया का थोडं बोलायचं होत.

परी: ओके चालेल.

असं बोलून दोघेही आपल्या आपल्या क्लास रूम मध्ये गेले. सॅटर्डे असल्यामुळे कॉलेज चा हाफ डे होता तर लवकर सुट्टी होणार होती म्हणून राज ला वाटल कि ३ लेक्चर नंतर बोलता येईल परी सोबत. ३ लेक्चर नंतर सुट्टी झाली. राज कॅन्टीन मध्ये गेला, परी पण कॅन्टीन कडे जाणार होती पण पायरी उतरताना रोहिणी पायरी वरून पडली. तिच्या पायाला लागलं होत म्हणून परी मग कॅन्टीन मध्ये न जाता रोहिणी ला घरी सोडून द्यायला गेली. आणि या गडबडी मुळे ती राज ला फोन करून सांगायचं विसरली. राज ने थोडा वेळ वाट पाहली पण परी आली नाही म्हणून त्याने तिला फोन केला. परी गाडी चालवत होती  आणि फोन बॅग मध्ये होता म्हणून तिने फोन उचलला नाही. राज ला वाटलं कि काय झालं असेल परी का बरं नाही आली? थोड्या वेळानी तो कॅन्टीन मधून निघाला  आणि घरी गेला. परी रोहिणी च्या घरी होती तिच्या आई सोबत बोलत होती. काकू सोबत बोलता बोलता परी ला आठवलं कि राज ला कॅन्टीन मध्ये भेटायचं होत म्हणून , तिने वेळ बघितला तर खूप उशीर झाला  होता. “बर काकू आता निघते रोहिणी ची काळजी घ्या” असं म्हणून परी तिथून निघाली आणि राज ला  फोन केला.

राज: हॅलो

परी: हॅलो राज आय एम सॉरी मी कॅन्टीन मध्ये नाही आली.

राज: का बर नाही आली तू? तू ठीक तर आहे न?

परी: हो मी ठीक आहे. कॉलेज मध्ये रोहिणी पायरी वरून पडली, तिच्या पायाला लागलं होत म्हणून त्या  गडबडी मुळे मी कॅन्टीन मध्ये नाही येऊ शकली. आणि तिला आधी घरी सोडून द्यायचं होत त्या घाई  मुळे मी तुला फोन पण करायचं विसरली.

राज: होका. आता कशी आहे रोहिणी.

परी: आता घरी गेल्यावर बँडेज केलं आहे तिच्या  पायाला आणि पेन किलर घेतली तिने. बर सांग न तुला काहीतरी  सांगायचं होत न?

राज: आता नको नंतर सांगिल कधीतरी. आता बघ किती उशीर झाला आहे तू आधी घरी जा.

परी: बर ठीक आहे. बाय

राज: बाय.

परीला वाटलं कि राज किती केयरिंग आहे सर्वात आधी त्याने मला विचारलं कि “तू ठीक आहे न?”. खूप छान आहे राज. राज ला पण वाटलं कि उशीर झाला तरी तिने फोन करून मला कालावल कि काय झालं होत म्हणून. दोघांनाहि एकमेकांच्या या छोट्या छोट्या गोष्टी आवडायच्या. दुसऱ्या दिवशी संडे होता  परी आपल्या फॅमिली सोबत पिकनिक ला गेली होती. तिथे नेटवर्क बरोबर नव्हतं. त्यामुळे राज आणि परी चा कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता. पण राज ला माहित नव्हतं कि परी पिकनिक ला गेली आहे म्हणून. त्याने  तिला मेसेज केला पण काही रिप्लाय आला नाही, त्याने परत मेसेज केला तरी सुद्धा रिप्लाय नाही आला. काही वेळा नंतर थोडं नेटवर्क आलं तर परी ला ते मेसेज मिळाले. तिने पण मेसेज टाईप केला कि “मी पिकनिक ला आली आहे फॅमिली सोबत” पण नेटवर्क गेल्या मुळे  तिचा तो मेसेज सेंड नाही झाला. परी अपसेट झाली तिला वाटलं कि राज वाट बघत असेल. राज ला वाटत  होत कि काय झालं असेल अर्धा दिवस गेला पण परी चा अजून पर्यंत काही रिप्लाय नाही आला. परी आणि  राज दोघेही विचारातच होते. पण नेटवर्क नव्हतं तर त्यातच काय राहायचं म्हणून तिने विचार केला कि  घरी गेल्यावर राज सोबत बोलून घेईल आणि मग तिने पिकनिक एन्जॉय केली. पिकनिक वरून घरी  वापस यायला खूप उशीर झाला होता आणि दिवसभऱयाची थकून होती म्हणून परी आल्या बरोबर झोपून  गेली.

🎭 Series Post

View all