रेशीमगाठ भाग ५

love story

राज चे मित्र राज ला विचारत होते कि काय झालं आजकाल तुझं लक्ष नाही राहत कोणत्या गोष्टीत. तर राज म्हणाला, “काही नाही सर्व ठीक आहे”. मग तो विचार करू लागला कि खरचं, “माझं लक्ष नाही आहे  का कुठे?”  परी ला वाटत होत कि राज चा फोन येईल म्हणून ती फोन हातात घेऊन होती, तितक्यातच  तिच्या फोन ची रिंग वाजली तिला वाटलं राज चा फोन असेल. तिने पाहिलं तर रोहिणी चा फोन होता.

परी: हॅलो, बोल रोहिणी.

रोहिणी: फोन हातातच घेऊन बसली होती वाटतं. कुणाच्या फोन ची वाट पाहत होती का?

परी: नाही ग कुणाच्या च फोन ची वाट नव्हती पाहत. तू बोलणं काय म्हणते?

रोहिणी: काही नाही ग तुझी तब्येत कशी आहे हे विचारायला फोन केला.

परी: माझी तब्येत तर ठीक आहे. आणि उद्या पासून मी कॉलेज ला पण येणार आहे.

रोहिणी: नक्की न. बघ तब्येत पूर्णपणे बरी नसेल झाली तर तू अजून काही दिवस आराम कर .

परी: नाही ग, आता मी ठीक आहे.येईल मी उद्या कॉलेज ला.

रोहिणी: बर भेटू मग उद्या, बाय.

परी: ओके बाय.

दुसऱ्या दिवशी राज नेहमी प्रमाणे मित्रांसोबत कॉलेज ला आला. आणि परी पण कॉलेज ला आली होती. परी ला पाहून राज खुश झाला. तस राज च्या मित्रांनी त्याला चिडवणं सुरु केलं,”काय झालं राज आता अचानक तू कसा काय खुश झाला”.  त्यावर राज  “काही नाही “ इतकंच म्हणून चूप झाला कारण त्याला  माहित होत आता काहीही बोलून फायदा नाही आहे, मित्र तर काही ऐकणार नाही. आणि परी पण इतक्या  दिवसानंतर राज ला पाहून खुश झाली आणि थोडी लाजली सुद्धा. तीच ते लाजणं राज ला खूप आवडलं होत. त्या नंतर सर्वजण आपल्या क्लास रूम मध्ये गेले. परी आणि राज एकमेकांसोबत बोलायची वाट  बघत होते. लंच टाईम झाल्यावर राज त्याच्या क्लास रूम च्या बाहेर निघाला तेव्हा च त्याला परी दिसली. परी राज कडे गेली आणि “हाय” म्हणाली. राज नि पण "हाय" केलं आणि तिच्या तब्येती बद्दल विचारलं.

राज: परी तुझे असाइन्मेंट लिहायचं बाकी असेल नं तर मी काही मदत करू का?

परी: नाही, मी लिहिलं न, होईल माझं पटकन. खरं तर रोहिणी पण म्हणत होती कि लिहिण्यात मदत करते म्हणून. पण मी तिला पण नाही म्हटलं. माझे असाइन्मेंट मीच लिहायला पाहिजे न.

राज: हो, बरोबर आहे तुझं, पण आता जास्त लिहायचं काम असेल म्हणून म्हणत होतो.

परी: इट्स ओके राज मी लिहिलं.

राज: ओके.

परी: अजून सांग, काय म्हणतो सर्व ठीक आहे?

राज: हो.

तितक्यातच राज चे मित्र त्याला आवाज देतात. तर तो परी ला बाय म्हणून जातो. दोघेही  एकमेकांसोबत बोलून मनातून खूप खुश झाले होते, पण त्यांनी एकमेकांना तस दाखवलं नाही.

असेच दिवस निघून गेले कॉलेज सुरु होत परी आणि राज च थोडंफार बोलणं सुरु होत. आता कॉलेज ची परीक्षा जवळ आली होती सर्वांची चांगली तयारी सुरु होती. परी नि पण राज च्या मदतीने छान तयारी केली.  पण तरी ती परीक्षेसाठी थोडी नर्वस होती. परीक्षेचा दिवस आला परी आणि रोहिणी कॉलेज मध्ये गेल्यावर  आपले आपले रोल नंबर शोधून बेंच वर जाऊन बसल्या. पेपर सुरु झाला आणि बऱ्या पैकी लिहिला सुद्धा. पहिला पेपर तर छान गेला पण बाकी च्या पेपर च टेन्शन अजूनही होतच. एक एक करता करता सर्व  पेपर झाले आणि सर्व पेपर छान गेले होते तरी सुद्धा पेपर कसे चेक होईल आणि किती पर्सेंटेज मिळतील हे  मात्र टेन्शन होत. फर्स्ट सेमिस्टर ची परीक्षा सम्पली सुट्ट्या पण सुरु झाल्या होत्या, कोणी गावाला गेले तर  रूम करून राहणारे आपल्या आपल्या घरी गेले.

🎭 Series Post

View all