कलियुगातील रावण

आणि ती हसली

लघुकथा


राधा

त्रिकोणी कुटुंब
दृष्ट लागावा असा संसार होता
राधा चा .
मकरंद तीचा नवरा IT सेक्टर मध्ये गडगंज पगारावर होता .
आणि एकुलती एक कन्या
गौरी ....
अभ्यासात अगदी तल्लख
सारं काही आनंदात सुरू होतं .
पण म्हणतात ना ,
आपल्या सुखाला आपलीच दृष्ट लागते
तसंच झालं ...

एका कार अपघातात मकरंद जागीच ठार झाला .
दुःखाचा डोंगर कोसळणे म्हणजे काय याची प्रचिती राधा ला आली होती .
पूर्ण कोसळली होती ती .
वेड लागलं होतं तिला
रात्ररात्रभर जागून इंटरनेटवर
मृत्यू नंतर काय
हे बघत बसायची .
घरच्यांनाही तिची ती अवस्था बघवेना .
गौरी जेमतेम चौथ्या वर्गात होती.
नि राधेचं वयही जेमतेम 28 होतं .

तिला पुर्व कल्पना न देता घरच्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार करायला घेतला ,
ती पेटून उठली

हे शरीर फक्त माझ्या मकरंदचं होतं नि राहील 
कुणाचं काहीही ऐकाला ती तयार नव्हती .
बरेच समजावले नातेवाईकांनि आणि
मैत्रिणीनेही
शेवटे सरती ती दुसऱ्या लग्नाला तयार झाली खरी पण फ़क्त हा निर्णय तिने
गौरी साठी घेतला होता .
तिचं शरीर नि मन अजूनही तयार नव्हते या सर्वाला .


आनंद
याच स्थळ सांगून आलं राधाला .
त्याच्याही पहिल्या बायकोची कॅन्सर ने मृत्यू झालेला ,
पण मुलबाळ काहीही नव्हते
म्हणून त्याने गौरी सह राधेचा स्वीकार केला .
अगदी साधेपणाने लग्न लावून राधेने
आनंदच्या आयुष्यात गौरीसह प्रवेश केला .
पण राधेला आनंदच वागणं अगदी पहिल्यादिवशी पासूनच खटकत होतं .
गौरीचा लाड जरा वेगळ्या प्रकारे करायचा तो .
बहुतेक वेळा शंकेची पाल चुकचुकली तिच्या मनात ,
परंतु तिची तिनेच समजूत काढली ,
दरवेळी ...

आज दशमीचा दिवस होता .
सकाळपासूनच राधा कामात व्यस्त होती .
गौरी कडेही लक्ष दयायला तिला वेळ नव्हता .
पण नंतर बऱ्याच वेळेनंतर तिच्या लक्षात आले गौरी दिसत नाहीये .
घरभर पाहून झाल्यावर ती
बाहेर अंगणात आली तिथेही गौरीचा पत्ता नव्हता .
काही वेळ थांबून तिला आठवण झाली
वरच्या मजल्यावरील खोलीची ...

तडक धाव घेतली तिने .
पण त्या अडगळीच्या खोलीतील दृश्य पाहून ती उभ्या जागी थिजली होती .
आनंद गौरीला नको त्या अवस्थेत पकडून होता .
हा सख्खा नसला तरी बापच आहे न तिचा .
मग ......
डोळ्यासमोर अंधारी दाटून आली होती .
डोक्यात नि शरीरात आग लागली तिच्या
जवळच पडलेला अडगळीतला एक रॉड उचलून जोरात मागून डोक्यात वार केला तिने त्याच्या .
तो जागेवरच निपचित पडला .

आज एका कलयुगातील रावणाचा तिने खरोखरच अंत केला होता ,
नि आपल्या गोळ्याला वाचविले होते
नि ते ही
समोरच्या परिणामाची पर्वा न करता ...

©®मीनल ठवरे