रसिका भाग ४

रसिका ही आज आनंदी आहे.

कथेचे नाव : रसिका

विषय : कौटुंबिक कथामालिका

फेरी : राज्यस्तरीय करंडक कथामालिका

भाग : ४

रसिकाच्या मुलींना जनुकाय तुम्ही फक्त काम करणे,जबाबदारीने वागणे, स्वतःचे इच्छा,आकांशा, प्रगट होऊ न देणे.आणि घरातील जे सांगतील ते तसेच वागणे.असे दुय्यम प्रतीचे संस्कार दिले जात आहेत.हे रसिकाला समजून चुकले होते.तिच्या जीवाची तडफड वाढू लागली होती.परंतु तिला अजूनही एक आशा होती ,ती रवी ची.रवी देखील या मुलींचा बाप आहे.कदाचित तो आतातरी बदलेल,आणि मुली देखील माझ्याच वारस आहेत.हे तो स्वीकारेल आणि त्यांच्या साठी घरातील भेद भावाचे वातावरण बदलण्यास सांगेल.या आशेने रसिकाने रवी सोबत या विषयावर अगदीच स्पष्ट च आणि सडेतोड पने बोलणे चालू केले.त्यांच्यात चर्चा,वादविवाद वारंवार होऊ लागले .रसिकाने तिच्या मुलींसाठी ...त्यांच्या हक्कासाठी...त्यांच्या निरागस बालपणा साठी......त्यांच्या बालमनावर होणाऱ्या विचित्र संस्करासाठी......पुढे येणाऱ्या भविष्यासाठी....एक प्रकारचे विरोधाचे युद्धच पुकारले होते.

रसिकाच्या लग्ना पासून ती जे स्वतः अनुभवत आली होती.त्यावरून तिला चांगला अंदाज आला होताच.आपण एवढे कर्तबगार, निर्धारी,असून सुद्धा किती संकोचीत जीवन पद्धतीने जगू लागलो आहोत,मग आपल्या मुलींना तर हे शिक्षण संस्कार आता पासून च दिले जात आहेत.त्यांची अवस्था तर माझ्याहून बिकट होऊन जाईल .

     आयुष्यात येणाऱ्या गंभीर प्रसंगाना ध्येयाने तोंड देण्याचे संस्कार आता आपणच मुलींना दिले पाहिजे.हा निश्चय तिने मनाशी पक्का करून घेतला.

         आपल्या मुलीचं तर आपले खरे भविष्य आहेत.आपण स्वताला लग्नानंतर होणारा सर्व त्रास ह्या मुलींसाठी ,हा संसार टिकवण्यासाठी,मुलींच्या भवितव्या साठी ,सहन केला होता.पण रवीच्या ह्या घरामधे आपल्या मुलींचे काहीही भविष्य उज्जल दिसत नाही.तर आपला ही सर्व त्याग , संयम,सहनशक्ती, वाया गेल्या सारखेच होईल.हीच वेळ आहे,स्वतः ला सावरण्याची...... हीच वेळ आहे,मनोबल वाढवण्याची.....हीच वेळ आहे, स्वतः च्या भावणांवर,भीती वर विजय मिळवण्याची......हीच वेळ आहे,आपल्यातील खरी,कर्तबगार, निर्धारि,स्त्री मुलींना दाखवण्याची.....!!!

आणि रसिकाने त्याबद्दल रवी कडे बोलणे केले.आज रसिका सर्व शक्ती एकवटून,त्याच्या पुढे ठाम पणाने उभी राहिली.

       पुरुष मात्र बाहेर, समाजात,त्याच्या कामावर,त्याचे पौरुषत्व सोडत नाही.तसेच घरातही त्याचे पुरुषार्थ अहंकार,बदलत नाहीत.मग स्त्रियांनी सुध्दा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी स्वीकारलेली असते,त्याच्या प्रत्येक कर्तव्यात तीबरोबरीची भागीदार असते.मग समाजात एक,कामावर एक,आणि घरात म्हणजे स्वतः च्या संसारात , कुटुंबात तिने दुय्यम किंवा गृहीत का असावे...??!!

अनाथ आश्रमामध्ये राहूनही रसिकाला कधीही कौटुंबिक आधाराची ,कमतरता भासली नव्हती.जिव्हाळ्याची कमतरता भासली नव्हती .असुरक्षिततेची भितिमय भावना रुजवली गेली नव्हती.

मग इथे मात्र रसिकाच्या स्व तः च्या मुलींना कौटुंबिक आधाराची,जिव्हाळ्याची,उणीव का भासावी.स्वतः च्याच रक्ताची नाते असलेल्या लोकांमध्ये एव्हढा परकीपाना का असावा....??!

जी एक स्त्री समाजा मध्ये कर्तबगारी,सामर्थ्य शाली महिला म्हणून वावरते,तशीच तिच्या घर संसारमध्ये एक सहनशील ,संयमी,सोज्वळ स्त्री म्हणून जगू शकते.अशा दोन विरुद्ध असणाऱ्या भूमिका स्त्री जगू शकते.तर....

तर हीच स्त्री ,आपल्या मुलांना,आई बाप आणि इतर नातेवाईक यांचे आधार,देऊ शकणार नाही का...?!

एक स्त्री एव्हढ्या मोठ्या कंपनी मध्ये ,इतकी मोठी जबाबदारी पेलू शकते ,किती तरी लोकांचे आयुष्य घडवू शकते तर स्वतःचे च मुलांना घडवू शकणार नाही का.....?!

रसिकाला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती.....!!!

रसिकाने रवी पुढे एकच निर्णय घेण्याची संधी ठेवली होती.ती म्हणजे..."" एक तर तू बदल,म्हणजे तुझे घरचे ही बदलतील..."" 

नाहीतर ...."" मलाच बदलावे लागेल..."" मी बदलते,आणि मी स्वतः स्वावलंबी होते, म्हणजे माझी सर्व मुलेही स्वावलंबी होतील.

अर्थातच रवी त्याच्या अहंकारामुळे बदलू शकत नव्हताच.

आणि रसिकाने रवी पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

तिच्या तीनही मुलांना ,तिने एक सारखेच संस्कार दिले....! 

त्यांची शिक्षणे त्यांच्या इच्छे प्रमाणे,त्यांच्या योग्य ते प्रमाणे,करून दिले.....!

एक स्त्री किंवा एक पुरुष म्हणून जगण्यापेक्षा ....एक चांगला माणूस म्हणून जगता आले पाहिजे,असे संस्कार दिले....!

आज रसीकाची मुले आनंदी आहेत.आणि रासिकाही आनंदी जीवन जगत आहे..!!!!

उर्वरित भाग - ५ मध्ये

©®Sush

पुणे जिल्हा.

🎭 Series Post

View all