रणरागिणी एक धाडसी स्री-भाग २

जिवनाचे संघर्ष

         "  त्यांना नाव नाही विचारले त्या बाहेर बसल्या आहेत. "

        "  बर मी आले इथे कोण आले असेल मला भेटायला ? त्या किंचित विचारात पडतात. "

आता पुढे

             पण लगेच विचार बाजूला सारून दोघीही घरात येतात . तर समोर एक स्री असते त्या स्रीला बघुन त्यांना खूप आनंद होतो .

         "  ताई तुम्ही इथे कशा काय ?  आणि तुम्ही बसा ना मि तुमच्या साठी गोड शिरा घेऊन येते .  तुम्ही बस दोन मिनिटे बसा . " दामिनी

       "  अग दामिनी !  मला काही नको तु फक्त माझ्या शेजारी बस मला तुझ्याशी बोलायचे आहे .आणि ही अनु ना ? किती मोठी झाली .  " मालतीबाई

          "  हो खुप मोठी झाली आणि आता तर डॉक्टर ही झाली . " दामिनी

          "  बाईसाहेब  ! तुम्ही बसा मी सगळ्याना नाश्ता घेऊन येते. "  रमा   

         "  हो चालेल आणि ताईना आल्याचा चहा करा त्यांना खूप आवडतो . " दामिनी

        "  ‌ताई तुम्ही इथे अचानक कशा ? मला बोलवायचे ना मी आले असते ." दामिनी

       "  खुप दिवसांपासुन मनात विचार येत होता .  तुला येऊन भेटावे एकदा तुझी माफी मागावी म्हणजे मरायला मोकळी . " मालतीबाई

         "  ताई ! तुम्ही काय बोलताय . आणि तुम्ही कशाला माझी माफी मागताय तुमचे खुप उपकार आहेत माझयावर तुम्ही एका गरीब निराधार स्रीला आसरा दिला ."

        "   ‌‌‌‌‌‌हो‌  ! आणि नंतर तुला घर सोडून निघून जा बोलले. खरच मी खूप स्वार्थी झाले होते. पण मनात आशा होती तु परत येशील व माझे म्हणणे ऐकशील आज जेव्हा तुझे नाव ऐकते एक समाजसेविका म्हणून तुझी प्रसिद्धी होते तेव्हा मनाला एक समाधान मिळते. खुप दिवसांपासुन मनात एक विचार येत होता की तुला भेटायला यावे अनुला बघावे पण नंतर मन स्वतः केलेल्या चुकीची आठवण करून देत होते म्हणून तुला भेटायला येणारी  पाउले आपोआप मागे फिरायची. " 

           "   मग म्हटले एकदा हे पुस्तक तुझ्या तोंडून ऐकावे तुला माहित आहे मला वाचण्याची किती आवड आहे पण हे पुस्तक मला तुझ्या तोंडून ऐकायचे आहे वाचशील ना माझ्यासाठी ? " मालतीबाई

        "   ‌‌‌‌‌हो‌‌ मम्मा ! वाच ना मला ही ऐकायचे आहे .अनु 

         "   हो ताई  वाचतेना तुमचा शब्द मी कधीच खाली पडु देणार नाही . "

              "  रणरागिणी एक धाडसी स्री.  "

             शिवापुर नावाचे एक गाव होते . अगदी दुष्काळ ग्रस्त तेथे लोकांना पिण्यासाठीही पाणी नाही. तर तेथे शेती कशी करणार त्यामुळे गावात नेहमी पैशाची चणचण भासे व प्रत्येक जण बेरोजगार होता .कारण करायला शेती असली तरी पाणी नाही जेव्हा पाऊस पडेल तेव्हा शेती होत असे. शिक्षण ही नाही. की नोकरी करुन आपल्या परिवाराचे पोट भरू शकेल त्यामुळे नेहमी सावकाराकडे कर्ज घ्यावे लागे .

          ‌‌  अशाच एका गरीब कुटुंबात एका परीचा  जन्म झाला.  जन्म झाला म्हणण्यापेक्षा मृत्यूला मागे सारून ती जन्माला आली पण आता ती किती वेळ जिवंत राहिल हे त्या परमेश्वराला माहित किंवा तिच्या बापाला हो बरोबर ऐकले तुम्ही कारण तिचा जन्म दाता बापच तिला मारायला निघाला होता . विचार करा ज्या चिमुकल्या जिवाने आजुन डोळे उघडून जगही बघीतले नाही त्यांच्या च मरणाची तयारी चालू होती .  पण ही तयारी तर आईच्या पोटात असल्या पासूनच चालु होती . पण मृत्यूशी लढुन व सर्व संकटांना मात देऊन ति जन्माला आली होती .आणि आज तिला तिच्या बापाने दुधाने भरलेल्या तपेल्यात टाकाले व पुढच्या जन्मी मुलगा होउन ये असे म्हटले तसे तेथे एक जोरदार किंकाळी ऐकु आली एक नुकतीच प्रसुती झालेली स्री तेथेच चक्कर येऊन खाली पडली होती .

            तेथे गावातील काही स्त्रीया आल्या व त्यांनी त्या महिलेला पाणी दिले. तसे तिने आपल्या मुलीला बघण्यासाठी डोळे उघडले तर समोर एक नवजात बालक श्वास घेण्यासाठी तडफडत होते त्या महिलेने  पटकन तिला आपल्या हृदयाशी लावले एवढा वेळ रडणारे ते बाळ आपल्या आईचा स्पर्श ओळखताच  तिला बिलगुन शांत झाले. त्या गावातील सरपंच बाईंनी तिला वाचवले असते. नेमक्याच त्या शेजारुन जात असताना त्यांना खूप गोंधळ ऐकू आला म्हणून त्या तेथे आल्या आणि बाळाला दुधात टाकताना बघतात व पटकन बाळाला बाहेर काढतात.

           "  अरे पाडबा ! आपल्या लेकिला कोणी मारते का ? "

           सरपंच बाईंनी त्याला जाब विचारला त्या वयाने मोठ्या होत्या व त्यांचा गावातील सर्व लोक त्याचा आदर करत असे .

          " मग काय करणार होतो म्या पदरात तिन तिनं पोरी  आणि घरात खायला अन्नाचा कण ही नाही कसं वाढवणार म्या ? "

🎭 Series Post

View all