रंगभूमी रंगवताना कधी आयुष्य माझे रंगभूमी झाले कळलंच नाही..

नटसम्राट या चित्रपटाच्या कथानकाला अनुसरून ही कविता मी लिहिली आहे.

( नटसम्राट या चित्रपटाच्या कथानकाला अनुसरून ही कविता मी लिहिली आहे, काही चुकल्यास क्षमस्व..) 

आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात रंगभूमीची सांगता मी घेतली, 

ठेवून लेकरांवर विश्वास, प्रॉपर्टीची विल्हेवाट मी लावली.. 

✨✨✨

लेकरांना सर्वस्व अर्पण करत भविष्याची चिंता मी न केली, 

इतरांच्या अनुभवांना तुच्छ लेखत कदाचित मी स्वतःच्याच विश्वासाची होळी केली.. 

✨✨✨

माझ्या संस्कारांचा होता मला अभिमान,म्हणून ही भेट मला लाभली, 

कारण मुलगा आणि सूनेनेच शेवटी माझ्या संस्कारांविषयीच्या अभिमानाची पायधूळ केली.. 

✨✨✨

 लेकरांना मानले मी भविष्याची आधारकाठी, कदाचित हीच माझी चूक होती.. 

फक्त लाभावा सहवास मज माझ्या नातीचा बस एवढीच काय मी अपेक्षा ठेवली.. 

✨✨✨

मी माझ्या नातीवर करत असलेल्या संस्कारांवर त्या हाय क्लास स्टेट्सच्या शुद्ध संस्कारांचा पगडा भारी ठरताच रवानगी माझी लेकीकडे केली गेली, 

पण तिच्या अन् माझ्या नात्यात दुरावा अंतराचा त्यांनी पेरूनंही मनाची जवळीकता तोडण्यास त्यांना निराशाच आली.. 

✨✨✨

माझ्यापासून दूर झालेली नात माझी, दुराव्यात रडली;

अश्रू तिचे पुसण्यासाठी मी तिच्यापाशी नव्हतो, हीच खंत माझ्या मनाला मात्र जास्त शिवून गेली.. 

✨✨✨

पण विसरून सारे, म्हटले लेकीकडे करावी सुरुवात नवी.. 

उच्चभ्रू लोकांच्या पंगतीत बसून करावी तजवीज जराशी.. 

✨✨✨

पण मूळ स्वभाव माझा मी बदलण्यात अपात्र ठरलो, 

लेकीच्या संसारात चुळबुळ करणारा गिधाडंच मी शेवटी बनलो.. 

✨✨✨

कारण माझ्या चिमणीलाही आता माझी चिमणी असल्याची कदाचित लाज वाटू लागली, 

तीही उच्चपदस्थ लोकांमध्ये मलाच कमी लेखू लागली.. 

✨✨✨

कधी च्याऊ म्याऊ चे खेळ खेळणारी माझी चिऊ कधी मला एकटं सोडेल असा विचार न करवणाऱ्या मला अख्खी तालीम तिने दाखवली,

सहज माझ्या विश्वासाची राखरांगोळी करण्यात माझ्या चिमणीनेही आगेकूच केली.. 

✨✨✨

आलेल्या सर्व अनुभवांची राणी सरकारांनी शिदोरी बांधली, 

होणारे माझे सारे अपमान पाहून राणी सरकारांनीच लेकीच्या घरून निरोप घेण्याची शपथ मनोमन घेतली.. 

✨✨✨

शपथ त्यांची ऐकून नाईलाज माझा झाला,

पहिल्यांदा त्यांनी भेट मागितली म्हणून ती भेट देण्यासाठी त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा अट्टाहास मी केला.. 

✨✨✨

'गावी जाऊन जगूया उर्वरित आयुष्य एकमेकांच्या सहवासात' ही इच्छा होती राणी सरकारांची, 

ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मीही कंबर कसली.. 

✨✨✨

केली निरोपाची जय्यत तयारी आणि पैशाची जुळवाजुळव, 

न सांगताच निरोप घेण्याचं ठरवलं मनोमन.. 

✨✨✨

पण निघण्याआधी आला एक उच्चभ्रू अनुभव, माझ्या पैशाबद्दल आरोप करून लेक माझी मला चोर ठरवून मोकळी झाली;

जेव्हा झाली तिला शाश्वती तिला, मी चोर नसल्याची; तेव्हा माफी मागून विषय संपवून ती गेली पण मनात मात्र वादळ उठवून गेली.. 

✨✨✨

म्हणून तिथे एक क्षणंही राहणे राणी सरकारांना पटले नाही, 

सुर्योदयाची वाट न पाहता तेथून प्रस्थान करण्याची विनवणी केली.. 

✨✨✨

मीही त्यांच्या इच्छेला मानला परमादेश, 

काढता पाय घेतला न सांगता कुणालाही पण शेवटी जयंताशी झालीच जरा नजरभेट.. 

✨✨✨

केले त्याने प्रयत्न आम्हाला थांबविण्याचे, 

पण आम्हीही त्याला समजवून निवडली वाट वेगळी कारण आता पाय चालत होते, गावी जाऊन नवी सुरुवात करण्याच्या ओढीने.. 

✨✨✨

तब्येत होती बिघडलेली राणी सरकारांची पण फिकीर नव्हती त्यांना,

म्हणे तुम्ही फक्त माझा हात हातात घेऊन आधार द्या..

✨✨✨

 होती गरज त्यांना उपचाराची,

पण त्यांचा होता मनिषा, लेकरांच्या सावटातून पसार होण्याची, आलेल्या अनुभवांना दूर सारण्याची..

✨✨✨

दुसरे माझे नशीब, जेव्हा गरज होती मज पैशांची घेण्या राणी सरकारच्या तब्येतीची खुशाली,

नेमके त्याच वेळी मला पैशांची उणीव भासली.. 

✨✨✨

पण मनात करून निर्धार ठरवले बसस्टॉपला पोहोचताच आधी उपचार राणी सरकरचा करणार, 

आयुष्याच्या या वळणावर त्यांना फुलासारखं जपणार.. 

✨✨✨

वचन देऊन मी त्यांना मिठी एक मारली, त्यांनीही ती मिठी घट्ट करत शाश्वती मज दिली.. 

मिठीत त्यांच्या शांत झोप कधी लागली कळलेच नाही..

✨✨✨

पण सकाळी उठताच जाणवले राणी सरकारांनी मिठीत माझ्या  अखेरचा श्वास घेऊन सोबत माझी सोडली, 

त्यांना जागवण्यासाठी अविरत प्रयत्न करूनही हाती माझ्या निराशा आली.. 

✨✨✨

राणी सरकारांविना झाली जीवाची माझ्या अवनती, 

जगण्याची माझी सारी उमेदंच सरली.. 

✨✨✨

रंगभूमीवर छाप सोडणारा असा नटसम्राट मी, 

अधांतरी वळणावर आयुष्याच्या रंगभूमीवर ठरलो मी भिकारी.. 

✨✨✨

खरंच रंगभूमी रंगवताना कधी आयुष्य माझे रंगभूमी झाले कळलंच नाही.. 

रंगभूमी गाजवणारा मी, उभ्या आयुष्यात, नियतीच्या नाटकात ठरलो मी अपयशी.. 

✨✨✨

©®

✍️

✨❣️ श्रावणी ❣️✨