ये दिल है मुश्किल भाग - 10

"दादा, तुला माहिती नाहीये का मी नाही का म्हणतेय?" नमू. "माहितीये नमू, आपण एकदा तर प्रयत्न करायलाच ?

ये दिल है मुश्किल 

भाग -10

(https://www.irablogging.com/blog/ye-dil-hai-mushkil_15832 

मागच्या भागाची लिंक)

पुढे -

"काय सांगताय! खरचं का?" राजीवला विश्वास बसत नव्हता.

"हो." सर्व एकसुरात म्हणाले.

"तुला बघायचं आहे ना! तिला शुद्धीवर येऊ दे आणि तिला प्रेमाने हाक मार बस्सं मग पहा." नमन म्हणाला आणि झालंही तसेच. नमू हळहळू शुद्धीवर येत होती. तिने डोळे उघडले आणि तिच्यासमोर राजीव हसत तिच्याकडेच बघत होता.

"राजीव" तिने हाक मारली. तिच्या डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर हसू होते. तिने सरकन हाताला लावलेली ड्रिप काढून फेकली आणि त्याच्या बेडजवळ गेली. तोही बसलेला होता . तीही त्याच्या बेडवर बसली.

"आय लव्ह यू राजीव." म्हणून ती त्याला मिठी मारली. त्याला हे अनपेक्षित होते. तिच्या मिठीने तो सुखावला तरीही त्याचे हात खालीच होते. नमन, अन्या, शंतनू, विनी बाहेर निघून गेले आणि जाताना दार लावून गेले.

"राजीव सॉरीऽऽ. मला माफ करा, मला सगळं कळतं

होतं. तुमचा त्रास तरीही मी तुम्हाला आणखीनच त्रास दिला. सॉरी राजीव." ती मिठीतच रडत म्हणत होती. त्याच्या डोळ्यांतून एक अश्रू बाहेर आला आणि तिने तिच्या ओठानेच टिपला. मग नंतर तिने डोळ्यावर ओठ टेकवून किस केले मग त्या डोळ्यावर, मग ह्या गालावर त्या गालावर , कपाळावर , नाकावर सगळीकडे त्याला किशी मिळत होती. तो तर शॉक मूडमध्ये गेला होता. नमूची कृती त्याला अनपेक्षित होती. शेवटी तिने नजर त्याच्या ओठांवर स्थिर केली आणि तिने त्यावर ओठ टेकवले जसे तिने ओठ टेकवले तसे त्याचे डोळे मोठे झाले. आता ते बाहेरच यायचे बाकी होते. नमू असं काही करेल हे तर त्याच्या कल्पनेच्या बाहेरचे होते. त्यांचा पहिला वहिला किस तो ही हॉस्पिटल बेडवर होत होता. तिचे मुलायम ओठ त्याच्या ओठांना स्पर्श होताच त्याच्या अंगात चारशे चाळीस व्होल्टचा झटका बसला. तिने हळूवार त्यांच्या ओठांना तिच्या ओठांमध्ये कैद केले. तो ओलसर मखमली स्पर्श त्याला धुंद करत होता. त्याचे डोळे मिटले गेले. त्याने तिच्याभोवती हातांचा विळखा घातला. तिला त्याच्या घट्ट मिठीत घेतले. तो ही तितकाच प्रतिसाद देऊ लागला. तिचा सुंगधित श्वास तो स्वतः च्या श्वासात भरत होता. अंगावर रोमांच उभे राहत होते. तो ही पॅशेनटेली किस करत होता. श्वास जड झाल्यावर दोघे दूर झाले.

"राजीव, आज मी तुम्हाला माझं सर्वस्व अर्पण केलं आहे. तुम्ही माझ्यासाठी काय आहेत हे मी माझ्या कृतीतून दाखवून दिले आहे. एका मुलीचा पहिला किस काय असतो हे तुम्हालाही माहिती आहे. मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही राजीव." ती खाली मान घालत लाजत म्हणाली.

"अशी कशी गाडी चालवत होता तुम्ही आणि असा फोन कुणी करत का? किती घाबरले होते मी, जीव गेला असता माझा." आता तिच्या चेहऱ्यावर थोडा राग दिसत होता. ती त्याच्यापासून दूर झाली आणि मागे फिरली आणि तितक्याच वेगाने ती त्याच्या अंगावर आदळली अन् त्याने तिला त्यांच्या मजबूत दंडामध्ये कैद केले.

"सोडा मला, मला नाही बोलायचं तुमच्यासोबत !" नमू रागे भरत म्हणाली.

"ऐकून घे नमू, मला यातलं काहीच माहिती नव्हतं गं,

तुझ्याच विचारात असतांना गाडी चालवत होतो. समोर एक मुलगी आली आणि तिला वाचावायला गेल्यामुळे मी गाडी वळवली आणि समोर असणाऱ्या झाडावर जाऊन आदळली. मला डोक्याला लागले. रक्त वाहू लागले आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो. मला इथे कोणी आणलं हे सुद्धा माहिती नाही.जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा तू माझ्या छातीवर बेशुद्ध पडली होती. मग डॉक्टरांनी तुझं चेकअप करून सलाईन लावले. मग मी नमन ला विचारले तेव्हा त्याने मला सर्व सांगितले. मला यातलं काहीच माहिती नव्हतं नमू." राजीव.

"हो नमू, याला काहीच माहिती नव्हतं त्यातलं, जेव्हा अन्याचा फोन आला तेव्हा मला कळलं, मी खूप घाबरलो होतो. कुणालाच सांगितलं नव्हतं आम्ही काकू काकांनाही नाही आणि त्यालाही खूप डोक्याला लागलेलं होतं. तो बेशुद्धच होता मग मीच विनीचा फोन आल्यावर तसं म्हणालो. जर खोटं नाही म्हटले असते तर तू आली असती आणि बोलली असती का? एक वर्ष तो तुला न पाहून फक्त तुझ्या विचारांवर प्रेम करत राहिला. जेव्हा ही तो तुला समोर आणण्यासाठी प्रयत्न करायचा तेव्हा तू काहीनाकाही करून त्याच्या समोर यायची नाही. किती त्रास दिलाय तू त्याला याचा काही अंदाज ही नसणार तुला, आम्ही पाहिलाय त्याचा त्रास, तुला समोर आणण्यासाठी त्याला दुसऱ्या मुलीबरोबर प्रेमाचे नाटक करायला भाग पाडले आम्ही. तरीही तू समोर यायला तयार झाली नाही. तोच तुझ्यासमोर आला तूला सांगितले तर तू तिथूनही पळून गेलीस. त्याच विचारात असतांना त्याचा अपघात झाला हे ही तितकचं खरं आहे. त्यातून तो वाचला मग मीच तुला खोटी बातमी देण्याचा विचार केला आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यात यश ही आले. तू तशी आलीच नसती इथे आणि प्रेम ही कबूल केले नसतं. म्हणून इतकं करावं लागलं मला." नमन हलकासा सुस्कारा सोडत म्हणाला. 

"दादा, तुला माहिती नाहीये का मी नाही का म्हणतेय?" नमू.

"माहितीये नमू, आपण एकदा तर प्रयत्न करायलाच पाहिजे ना, कदाचित बाबांचे विचार बदलतील." नमन.

"हम्म दादा तुला एक सांगते, मी लग्न करेल तर यांच्याशीच नाहीतर मी आजन्म लग्न करणार नाही. आता बाबांना कसं मनवायचं ते तू पहा मला यात ओढायचं नाही." नमू नमनला म्हणाली आणि राजीवला भेटून ती विनीला घेऊन बाहेर निघून गेली. ती गेल्यावर मात्र नमन डोक्याला हात लावून विचार करत बसला होता.

"नम्या, तू असा कसा डोक्याला हात लावून बसलाय?" शंतनू .

"मग काय करू, बघितलं नाही तू, किकू कशी धमकी देऊन 

गेली." नमन.

"धमकी तर ते देणारच रेऽऽ, म्हणून ती कन्फेस करत नव्हती आणि आपण ती जबरदस्ती करवून घेतली. आधीच ती बाबांना घाबरते म्हणाली आणि आता हे सर्व कसं होणार? म्हणून ती.." राजीव.

"मी आधीच घाबरलेला तू आणखीनच मला घाबरवं." नमन.

"मी घाबरवत नाही रेऽ तू काही एकटाच नाही मी आहेच की, प्रयत्न तर मला करायचे आहेत. त्याआधी मला माझ्या स्वकर्तृत्वावर काही करून दाखवायचं आहे. त्यानंतरच मी बाबासोबत बोलणार आहे." राजीव मनाशी निश्चय करत म्हणाला. 

"आम्ही आहोत तुझ्यासोबत !" सर्व एकत्र म्हणाले आणि त्यांनी राजीवला मिठी मारली. संध्याकाळी राजीवला डिस्चार्ज देण्यात आला. तिघे मिळून त्याला घरी सोडायला गेले होते. आरती राजीवला पाहून घाबरून गेली. राजीवने तिला कसेबसे शांत केले. आरतीने चौघांना खायला दिले. खाऊन झाले तसे तिघे घरी गेले आणि राजीव गोळ्या घेऊन बेडवर आडवा झाला. क्षणात त्याच्यासमोर किस करतांनाची नमू आली. तिने घेतलेला पुढाकार, तो त्या गुलाबी आठवणीत रमला आणि त्यातच त्याला झोप लागली.

हॉस्पिटलमधून आल्यानंतर नमू कधीच राजीवला भेटली नाही की त्याच्याशी फोनवर संभाषण केले नाही, मात्र नमनजवळ त्याची चौकशी करत होती. राजीवची तब्बेत सुधारली होती. त्याचा यू एस ए ला जाण्याचा दिवस उद्यावर येऊन ठेपला होता. त्याआधी त्याला एकदा नमूला भेटावं वाटत होतं. पण ती भेटणार नाही हे ही तितकचं खर होतं. राजीवने नमनला फोन केला.

"नम्या मला एकदा नमू सोबत बोलायचं आहे. दे ना तिच्याजवळ माझा हा संदेशा.." राजीव.

"हो हो .. मी काय तुला कबूतर वाटलो का तुझा संदेशा द्यायला?"

"आज कबूतर झाला तर बिघडणार आहे का तुझं?"

"नाही पण त्याबद्दल्यात मला काय देणार?" नमन.

"आजची डिनर पार्टी! खुश !" राजीव.

"हो हो डबल खुश . थांब लगेच देतो. ." नमनने नमूला फोन देऊन त्याने बोलायला सांगितले.

"हॅलोऽऽ." ती मधाळ आवाजात म्हणाली. आणि तो तिच्या मधाळ आवाजात ऐकण्यात गुंग झाला.

क्रमश ..

©®धनदिपा ..

🎭 Series Post

View all