मोठी तिची सावली ...

मोठी गरज तुझी ,मोठी गरज माझी

योगिता आणि समीर एका इंटरव्ह्यू साठी एका कंपनी मध्ये आले होते, समीर पुण्याहून आला होता तर योगिता नाशिक हुन आली होती.

दोघांचे ही मुंबईत येण्याची हा पहिलाच अनुभव होता आणि पहिलीच वेळ होती.

त्यांचे दोघांचे ही कोणी नातेवाईक मुंबईला नव्हते... ती डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे ह्या हेतून ने आली होती आणि तिला वाटत होतं की,ही नौकरी मिळाली की मी घराची जबाबदारी घ्यायला तयार होईल, बाबांना आता आराम करायला सांगेन,आणि त्यांच्या वरचा घराचा भार मी माझ्या खांद्यावर घेईल..

योगिता एका मध्यमवर्गीय घरात वाढलेली, घरची परिस्थिती बेताची कधी तिने बाबाकडे कसला हट्ट केला नाही की काही कमी पडले हाताची तक्रार ही केली नाही, बाबाचा जितका जीव योगिता मध्ये होता तितकाच योगीताचा ही जीव तिच्या बाबा मध्ये होता.

सगळ्या जगाने जरी तिची साथ सोडली तरी बाबा होते जे नेहमी म्हणायचे योगिता माझी मुलगी नाही बर मुलगाच आहे, आणि माझा योगीतावर पूर्ण विश्वास आहे, जगाच्या पाठीवर योगिता कुठे ही जाऊ दे, ती माझ्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही.

बाबांनी तिला गावातील इतर मुलीप्रमाणे लवकर लग्नाच्या मागे न लागता तिला तिच्या पायावर उभे राहण्याची संधी दिली होती, तिला ही बाबाचे असलेले कर्ज लग्नाआधीच सासरी जाताना फेडायचे होते,त्यांच्या account वर निदान काही रक्कम त्यांच्या म्हतारपणातील आधार म्हणून ठेवायची होती, घराची राहिलेली डाग डुजी करायची होती, आजीचे operation करायचे होते, भावाची admission fees भरायची होती आणि इतके सगळे कर्तव्य उराशी घेऊन ती आपले शिक्षण पूर्ण करून आज ह्या मुलाखतीसाठी मुंबईला आली होती...

निदान सगळेच स्वप्न नाही पण काही तरी स्वप्न मी नक्कीच पयर्न करेल हे तिने तिच्या मनाशी पक्के केले होते... त्यासाठी तिचा निर्धार पक्का होता की आपले घरगुती प्रश्न सुटल्याशिवाय लग्न करायचे नाही.   

तिला आज मनापासून असे वाटत होते की ही नौकरी माझीच व्हावी मला खूप गरज आहे, इकडे ह्याच इंटरव्ह्यू साठी आलेला समीर ही हाच विचार करत होता, मला माझ्या घरच्या जबाबदाऱ्या आता माझ्या खांद्यावर घ्यायच्या आहेत ,आणि आज कसे ही करून रिकाम्या हाती जायचे नाही, ही नौकरी कशी ही करून मिळवायची आहे

ते दोघे खूप सकाळीच ट्रेन ने मुंबईला आलेले असतात,आणि दोघांनी ही सोबत खाण्यासाठी काहीच आणलेले नसते, ऑफिस उघडायला वेळ असतो, आणि दोघे ही gate वर उभे असतात..

अजून त्यांच्या हातात 2 तास असतात, त्यात योगिता आपले सगळे doccument तपासून घेते ,त्यात तिचा नेमका graduationचे मार्क्स शीट खाली पडते आणि ती ते पडलेले मार्क्स शीट न घेताच पुढे निघून जाते.... ते मार्कशीट पडलेले पाहून समीर उचलून आपल्या कडे ठेवून घेत ऑफिस च्या दिशेने जातो....

तो ते मार्कशीट उघडून बघतो तर त्यात तिचे गुण पाहून तो जरा विचार करतो की मी जर हे तिला दिले तर माझी नौकरी तिला दिली जाईल हे नक्की... 

थोडावेळ त्याच्या मनात विचार आला की हिचे मार्कशीट जर दिलेच नाही तर तिला मिळणारी संधी मला मिळेल..

बराच वेळ शिल्लक असल्यामुळे त्याने आता तिच्या शी ओळख करून घेतली होती... तिला नौकरी का हवी हे जाणून घेतले, आणि त्याला नौकरी का हवी हे ही सांगितले,दोघांच्या ही बोलण्यातून कुठे तरी एकमेकांना असे वाटू लागले होते की माझ्यापेक्षा नौकरीची गरज समोरच्याला आहे.... योगीताला आता वाटत होते की माझ्यापेक्षा त्याला नौकरीची गरज आहे.. आणि त्याला वाटत होते की मला नही मिळाली तरी चालेल पण तिला मिळावी ...

जोपर्यंत दोघे अनोळखी होते तोपर्यंत दोघांना वाटत होते की ह्या नौकरीची सगळ्यात जास्त गरज मलाच आहे, माझे problems सगळ्यात मोठे आहेत.... आणि आता जेव्हा दोघांनी एकमेकांचे problems जाणून घेतले तेव्हा कळले की माझ्या ऐवजी नौकरी त्यालाच मिळावी ...त्याला वाटत होते की नौकरी तिलाच मिळावी.... हळूच समीर ने तिचे पडलेले मार्कशीट तिच्याकडे दिले....

समीर खूप गरीब घरचा,घरी पडीक शेती... होती ती पाण्याविना वायाला जाताना तो पाहू शकत नव्हता, बहिणींचे लग्न ठरले होते पण सोने खरेदी करायला ही जवळ पैसा नव्हता, शेवटी होती ती जमीन ही त्याच्या वडिलांनी गहाण टाकली होती... ती सोडवायला निदान नौकरी हवी होती.... घर सोडले तरच चार पैसे हातात येतील म्हणून तो मुंबईला आला होता... आपली व्यथा कोणाला सांगून ही खरी वाटणार नाही हे त्याला माहित होते... म्हणून कोणाकडून पैसे घेणे ही त्याला योग्य वाटत नव्हते....

वडिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं तर उत्पन्ना पेक्षा खर्च जास्त होत होता,सगळा पैसा बिल भरण्यात आणि मजुराला देण्यात जात ....खाणारी तोंड 4.....

त्यामुळे जेव्हा तो नौकरीसाठी आला तेव्हा त्याला वाटत होते की नौकरी त्यालाच मिळावी....

इकडे योगीताला वाटते होते...मी कुठे ही नौकरी करेल पण सगळ्यात जास्त गरज समीर ला होती.... तिला आठवलं आपला भाऊ कसा नौकरी साठी वन वन फिरत होता आणि नौकरी मिळाली तर नाही पण त्याला मानसिक आजारात स्वतःच जीव घ्यावा लागला होता.... तसे समीर सोबत होऊ नये...

ती आत जाऊन इंटरव्ह्यू देऊन आली,तिचा इंटरव्ह्यू छान ही गेला, पण ती select झाली नाही..... त्या दिवशी कोरोना मुळे खूप कमी जण हजर होते... पण त्यात फक्त योगिता select केली होती..... पण जेव्हा तिला विचारले तुम्हाला एखादे चांगले काम करायचे असेल ....जस्ट इथे तर तुम्ही काय कराल.....तिने सांगितले कोणाचा जीव जाण्याचा पासून वाचवले......त्यांनी विचारले ते कसे....... योगीताने सांगितले माझ्या नंतरचा जो candidate आहे तो माझ्यापेक्षा ही हुशार ,मेहनती आहे.. पण तुम्ही जर माझे मार्क्स बघून मला निवडला तर ....तर त्याचे आयुष्य पूर्णपणे खराब होईल...आणि पर्यायी त्याला जीवाशी मुकावे लागेल.... आणि तेच मला नको..... म्हणून मी त्याचा जीव जाण्यापासून आत्ता वाचवले..... आमच्या दोघांमध्ये फकीर फक्त काही मार्क्स चा आहे...... जो जर तुम्ही मिटवला तर एक जीव मी वाचवला आणि सोबत त्याच्या घरच्यांचा ही जीव मी वाचवला असे समजेल....

Chairmen ला योगीताचा हा confidence आणि जाणीव असलेली वृत्ती खूप भावली..... त्यांनी समीर चा इंटरव्ह्यू तर घेतला त्याची ही निवड केली.... सोबत आपल्या कंपनी ला एक होतकरू गुणी स्टाफसोबत काम करायला आवडेल पाहून त्यांनी योगीताला ही नौकरीत निवड केली ...?