मुलीचा काळा रंग

Kalyani rajage shinde....... I am from satara

काल सहज टीव्ही पुढे बसले होते.. काहीतरी रंग माझा  वेगळा नावाचा कार्यक्रमाची जाहिरात लागली होती..मी शोधलं त्या मालिकेबद्दल तर काय तर म्हणे मुलगा डॉक्टर आणि तो काळ्या मुलीचा प्रेमात पडतो पण मुलगी काळी असल्या कारणाने घरातल्या लोकांना पटत नाही... मला अजून एक हे कळलं नाहीये की यांना कुणी सांगितलं की काळ्या मुली सुंदर दिसत नाहीत..ज्याला सौन्दर्याची खरी पारख  असते  मला वाटतंय त्याला नक्की कळेल की कृष्णवर्णीय मुली या जास्त रेखीव असतात......
        आजही कित्येक ठिकाणी मुलं स्थळ पाहायला गेली की मुलगी गोरी आहे कां पाहतात??? मग तो मुलगा स्वतः कसा कां असेना पण लग्न जुळवताना त्याची पहिली अट मुलगी गोरी असायला हवी.. आणि अजून एक, गोरी असली की म्हणे तीच बाकी सगळं झाकून जात.. नाक वगैरे... मुलगी दिसायला काळी असली की तिला उपरोधातमक काळी बोलणयात जणू यांना अधिकारच मिळालेला असतो.. मग ती मुलगी कितीही कर्तृत्ववान असली तरी कित्येक मुलं नाकारतात..
        चित्रपट त्यातलया नायिका कायम   गोर्या... कोणी एखादि सावळ्या रंगाची नसते..जाहिराती बाप रे... एक से बढकर एक.. ही क्रिम लावा  2 दिवसात गोरे व्हा.कित्येक कंपनी मधे ही अगदी पर्सनॅलिटी हा गोंडस शब्द वापरला जातो.. आणि या नावाखाली काळ्या लोकांना आजही नाकारलं जात... मूर्खपणाचा कळस असतो..
        सगळे एकसारखे च  असतात...दोन् डोळे दोन् हात दोन् कान सगळं  सारखं फरक फक्त रंगाचा. पण रंगाचा त्याचं बुद्धिमत्ता आणि संस्कार किंवा आचार विचार याच्याशी काहीही संबन्ध नाही तेव्हा मुलगी काळी आहे की गोरी हे बगु नका..ती कसे आहे ते पहा....सावळ्या निखळ सौन्दर्यापेक्षा मेकअप थापून गोर्या होणाऱ्या मुली चालतात...पण खरं तर काळसर  मेघ दाटून आलेले पाहिलेत का कधी... किती सुंदर दिसत ते चित्र... अमावास्येची रात्र शांत निश्चल...मोहक वाटत हे सार.... आणि  देव कृष्णा काळा चा होता की... युगे युगे विटेवरी उभा विठ्ठल ही काळा च  आहे..त्यामुळं  मी तर नक्की म्हणेन काळा रंग आहे म्हणून बुजून जाऊ नका.. तुमी  तुमच्यात काय आहे ते शोधा... आणि मस्त आयुष्य जगा.....

कल्याणी राजगे शिंदे...
लेख आवडल्यास like आणि नावासकट shere  करा....