पाहिले जेव्हा मी तुला,
मी न माझी राहिले.
जाणीवेची उणीव होती,
भांडताना तुझ्याशी
उगा शब्दांची नुसती चिवचिव होती.
भांडताना तुझ्याशी
उगा शब्दांची नुसती चिवचिव होती.
गत क्षण आठवणीत
पेरले,
आठवता आजही ते
मी न माझी राहिले.
पेरले,
आठवता आजही ते
मी न माझी राहिले.
मौनही बोलके झाले,
वादातही मन हलके झाले.
हरवताना तुझ्या शब्दात
मी न माझी राहिले.
वादातही मन हलके झाले.
हरवताना तुझ्या शब्दात
मी न माझी राहिले.
ठाऊक नाही मला
काय होते नाते आपुले,
संवाद नसला आज जरी
तरी त्या एका निखळ हाकेसाठी
मन आसुसलेले.
काय होते नाते आपुले,
संवाद नसला आज जरी
तरी त्या एका निखळ हाकेसाठी
मन आसुसलेले.
सुटता सोडवेना ही वीण
"नाहीच काही नातं",
कशी पटवावी ही खूण?
"नाहीच काही नातं",
कशी पटवावी ही खूण?
विचारांच्या गर्तेत
निखळ साथ
या भावनेने सुखावले,
मन बुद्धीच्या लपंडावात
मी न माझी राहिले.
निखळ साथ
या भावनेने सुखावले,
मन बुद्धीच्या लपंडावात
मी न माझी राहिले.
-श्रद्धा गायकवाड ✨️✨️❤️विश्वकांक्षिका❤️✨️✨️
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा