हाय, मी काच बोलतोय..

आत्मवृत्त.. मी काच बोलतोय..

# आत्मवृत्त

हाय, 

       ओळखलंत का? नाहीच कदाचित असो.. मीच सांगतो, मी आहे काच.. हो तोच काच ज्याच्यावर गाणं निघलंय ते नाही का.. ' शीशा हो या दिल हो.. आखिर टूट जाता है.. ' तर या गाण्याचं प्रेरणास्थान मीच आहे, असं निदान मला तरी वाटतं.. मला नव्हतं हा वाटलं कधी की, माझ्यासारख्या जीवाला बोलकं करेल एखादा कारागीर ते.. 

       अं आज मला बोलायची संधी मिळाली आहे त्याबद्दल नाही बोलत आहे मी.. एक मिनिट थांबा.. मी ना असं करेन तर तुम्हालाही कंन्फ्यूज करेन आणि स्वतःही कंन्फ्यूज व्हायची. म्हणून सुरुवातीपासून सांगते की, मला काय म्हणायचं आहे ते. चालेल ना? 

       बघा.. जसं तुम्हा माणसांना कुणी विचारलं की, तुम्हाला भविष्यात काय व्हायचं आहे ते, तर तेव्हा तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसार सांगता की, मला अमुक व्हायचंय तमुक व्हायचंय. तर समजा मला कुणी विचारले ना की, मला काय व्हायचंय तर तेव्हा माझं एकंच ठाम मत असेल की, मला आरसा व्हायचंय. म्हणजे पाहतो म्हटलं तर आरसा खूप स्वस्त असतो, त्याच्याहून महागडी तर माझी बाकी रूपे आहेत. उदाहरणार्थ विविध प्रकारच्या, विभिन्न आकाराच्या काचेच्या मूर्ती वा वस्तू. 

         पण मला नाही त्याचं काहीच आकर्षण! कारण काय असतं ना, त्या काचेच्या सुशोभित वस्तू एकदा फुटल्या की, त्या अर्थहीन, अस्तित्वहीन होतात! पण आरसा; तो मात्र अखेरपर्यंत त्याचं काम चोख करतो. आरसा हा माणसाला माणसाचं प्रतिबिंब दाखवतो. त्याला खोटे मुखवटे धारण करता येत नाही, तो आपल्याला आपण जसं आहे तसंच स्विकारतो आणि तेच आपल्याला दाखवतो. तो नेहमी पारदर्शी असतो. मनात एक, तोंडात एक.. अशी काही कॉन्सेप्ट माहितीच नाही त्याला.. तो परखडपणे मत मांडतो स्वतःचं! 

          दुसरं असं की, आपण आरशापासून दूर पळून जाऊ नाही शकत. कारण आरसा हा फक्त आपल्या चेहऱ्याचं प्रतिबिंब दाखवतो असं नव्हे तर तो आपल्या मनातले सारे भेद खोलतो. आपल्या मनातली धांदल हळूच टिपतो आणि आपल्याच प्रतिबिंबापासून आपल्याला अवगत करतो. आपण जसे असतो, तसंच तो आपल्या स्वतःपुढे आपलं प्रतिबिंब सादर करतो. कधीकधी नाईलाज होतो त्याचा की, काही धक्कादायक वास्तवाची जाणीव तो करून देतो पण शेवटी त्याचे नियत कर्म तो करतोच.. मला हीच त्याची गुणवैशिष्ट्ये आवडतात. आणि म्हणून मी आधी म्हणालो की, माझ्यासारख्या काचाला बोलतं करतो कारागीर जेव्हा माझं रुपांतर आरशात होतं.. 

           माझ्यासारखा काच आरशात रुपांतरित होताच मी नकळत बोलका होतो. मूक संवाद साधतो माणसांशी, तेही त्यांच्या नकळत.. त्यांच्या मनातही वास करायला लागतो. म्हणून आरसा बनणे माझं स्वप्न आहे. मला आरशासारखं आयुष्य जगायचंय.. माहिती आहे कठीण आहे पण मला करायचंय. काचेच्या सुशोभित वस्तू बसण्याऐवजी मी नक्कीच आताच काय नंतरही आरसाच बनणे पसंत करणार.. 



✍️

✨❣️श्रावणी ❣️✨